Author: Sharad Bhalerao

लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी ; धरणे, रस्ते निर्मितीसाठी ४६ हजार कोटी रुपये द्या साईमत।मुक्ताईनगर।प्रतिनिधी आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआयसारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत. लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी द्या आणि त्यासोबतच ४६ हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल. त्यामुळं हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे…

Read More

गांजा पिल्याच्या वादातून घडली घटना : सात दिवसात ठोकल्या बेड्या साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील अडावद येथे शेतमजूराच्या झालेल्या खुनानंतर अडावद पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयित गांजा पित असताना त्यांना हटकल्यानंतर त्यातून झालेल्या वादातून मजूराचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या तपास पथकाला पोलीस रिवॉर्ड देत त्यांचा गौरव केला. सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील अडावद गावालगतच्या पीक पाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जगदीश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा.पाटचारी, अडावद, ता.चोपडा) याचा खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. मयताला मारहाण झाल्याचे अंगावरील वळांवरून स्पष्ट झाल्यानंतर मयताचा मुलगा…

Read More

आ.एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत घेतला आ.चंद्रकांत पाटलांचा समाचार साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : ‘हमारे अंगणे में तुम्हारा क्या काम है…’ असा फिल्मी डायलॉग मारत आ.चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गावी चाळीसगावला पाठवावे, असा टोला विधान परिषदेचे आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. नुकतीच आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.एकनाथराव खडसे यांनी तीस वर्षात काय केले, यासह अनेक तारे तोडले होते. त्यावर आ.खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संवेदना फाउंडेशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते. मतदारसंघात नव्हे…

Read More

तरुणांसह चिमुकल्यांमध्ये पसरले होते उत्साहाचे वातावरण साईमत/एरंडोल/प्रतिनिधी : तालुक्यातील कासोदा येथे शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांसह लहान-मोठ्या सुमारे ३० ते ३५ खासगी गणेश मंडळांनी सवाद्य मिरवणुका काढून ‘गणपती बाप्पा मोरया…’च्या जयघोषात ‘श्रीं’ची जल्लोषात स्थापना केली. तसेच शहरातील सार्वजनिक मंडळांनी मेनरोडपासून वाजतगाजत मिरवणुका काढून जल्लोषात गणेशमूर्तीची स्थापना केली. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ट्रॅक्टरवर ठेवलेल्या मूर्तीसमोर ढोलताशांच्या गजरात थिरकत होते. यावेळी गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. शहरात सर्वत्र गल्लीबोळात तरुणांसह चिमुकल्यांमध्ये उत्साहाला उधाण आल्याचे वातावरण पसरले होतेे. सार्वजनिक गणेश मंडळात जय शिवराय मित्र मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, कासोदा कुस्तीगीर महासंघ (बजरंग गृप), जय सियाराम मित्र मंडळ, राम राज्य ग्रुप, संघर्ष…

Read More

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली माहिती साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहरात ६९ तर शहर पोलीस स्टेशनच्या ग्रामीण हद्दीत २९ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झालेली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली. अजून आठ ते दहा गणेश मंडळ नोंदणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी सांगितले. शहरात पाच दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या गणेश मंडळांची काल सायंकाळ पाच वाजेपर्यंत सर्वत्र श्रींची स्थापना उत्साहात पार पडली. कचेरीजवळील राणी लक्ष्मीबाई चौक गणेश मंडळातर्फे स्थापनेच्यावेळी हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा भाविकांना देण्यात आली.

Read More

यशाबद्दल अन्वरदे बु. गावात अनेकांनी केला सत्कार साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील अन्वरदे बु.।। गावातील वैभव पाटील यास नीट परीक्षेत ६४० गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. पहिल्याच प्रवेश फेरीत त्याचा रत्नागिरी शासकीय मेडिकल कॉलेजला नंबर लागला. वैभव हा सर्व साधारण शेतकरीचा कुटुंबातील, पोलीस पाटील शंकर पाटील यांचा नातू तर मा.सरपंच तथा विद्यमान उपसरपंच गणेश पाटील (वाघ परिवार) यांचा चिरंजीव आहे. वैभव पाटील एमबीबीएस झाल्यास हा अन्वरदे बु.गावासह परिवारातील पहिला डॉक्टर असणार आहे. या यशाबद्दल वैभवचा माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा, राष्ट्रवादी तालुका शशिकांत पाटील (शरद पवार गट), अन्वरदे बु. सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read More

शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. त्यांनी शिक्षकांच्या तासिका घेतल्या. त्यानंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.जे.जी.पंडित, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी दिवसभरातील कामकाजाचे अनुभव मांडले. त्यात सुमित क्षीरसागर, खुशी गोंधळे, भाग्यश्री हडप यांचा समावेश होता. शिक्षक दिन…

Read More

जुनी पेन्शन योजना, शाळेची वेळ बदलण्याची मागणी साईमत/चोपडा/प्रतिनिधी : शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष विक्रम गायकवाड तथा राज्याध्यक्ष राजेश पाटील यांच्या समन्वयातून आदिवासी विकास विभाग कर्मचाऱ्यांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिक्षक दिनाचे औचित्य साधून निषेध व्यक्त केला. अन्यायकारक अशी शाळेची वेळ बदलण्यात यावी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशा प्रमुख मागणीसाठी निषेध व्यक्त करताना सर्व कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून कामकाज केले. यावल प्रकल्पातील संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासकीय तथा अनुदानित आश्रमशाळा यांनी निषेध व्यक्त केला होता. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २३ सप्टेंबर रोजी नाशिक येथील अपर आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही मत जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे…

Read More

सचिवपदी अनिकेत सोनवणे यांची निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामनगरातील श्रीराम नगर मित्र मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेशाची मूर्ती स्थापन करुन विविध उपक्रम राबविण्याचे नियाेजन करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मंडळाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी अजय पाटील, उपाध्यक्ष अजय सोनवणे, सचिव अनिकेत सोनवणे, खजिनदार विशाल राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या सदस्यांमध्ये किसन राजपूत, करण वानखेडकर, लखन शेळके, कृष्णा भोई, शंकर काळे, वैभव केदार, प्रभु केदार, सोनू कोळी, गोलु पाटील, विशाल सूर्यवंशी, हर्षल सोनगिरे यांचा समावेश आहे. आठ फुटाची रामलल्लाच्या रुपातील मूर्ती स्थापन मंडळातर्फे शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी आठ फुटाची…

Read More

विद्यार्थ्यांना जयेश पाटील यांनी केले मार्गदर्शन साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी : येथील नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा म्युन्सिपल हायस्कुल येथे आयोजित केली होती. कार्यशाळेत विद्यार्थी व शिक्षक यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शाडू मातीपासून कशी तयार करावी. याविषयी जयेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे किती महत्त्व आहे, हे सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगापासून पर्यावरणाची होणारी हानी किती घातक आहे. त्याचीही माहिती दिली. गणेशमूर्ती कशी तयार करावी, त्याचेही प्रात्यक्षिक करून दाखविले. शाडू मातीपासून बनविलेली गणपतीची मूर्ती प्रत्येकाने बसवावी, असे आवाहन करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी…

Read More