चोपड्यात मविआतर्फे तहसिलदारांना निवेदन सादर साईमत/चोपडा /प्रतिनिधी : तालुक्यातील विरवाडे येथे तेरा वर्षाच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने शासकीय विश्रामगृहापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, डॉ.चंद्रकांत बारेला, चोपडा साखर कारखानाचे माजी चेअरमन घन:शाम पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, देवेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील, ओबीसी सेलचे किशोर दुसाने, गोकुळ पाटील, गोपाल पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्यावतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. अत्याचार करणाऱ्या…
Author: Sharad Bhalerao
मतदारसंघातील तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता, शिक्षण आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांना आमदारांचा इशारा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था चालक निवडणूक लढण्याच्या इच्छेने कामाला लागले आहेत. अश्या परिस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात डी.एड्, बी.एड्. बेरोजगार शिक्षक, विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून नोकरी देण्याच्या नावावर त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्यासाठी अश्या बेरोजगार शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या शोधात आहे. त्यांना नियुक्तीचे बोगस अप्रुव्हल देऊन बेरोजगार शिक्षकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन आ.किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, असाच…
अनेक वर्षाची यशस्वी परंपरा, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी : येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेज धानोरा विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो मुलांच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. खो-खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीचे सदस्य वामनराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, ज्येष्ठ संचालक बी. एस.महाजन, योगेश पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक तडवी, पोलीस पाटील रवींद्र कोळी, उपमुख्याध्यापक नवल महाजन, चोपडा तालुका क्रीडासमन्वयक आर.पी.आल्हाट, चोतामाचे संचालक गुणवंत वाघ, एस.पी.महाजन, आर.टी.पाटील, जितेंद्र महाजन, जगदीश जाधव, बिडगावचे तलाठी अरविंद जाधव, ललित सोनवणे, विजय पाटील, स्वाती चौधरी, तालुकास्तरीय शासकीय स्पर्धा नियोजन…
आठ दिवसात मुक्ताईनगर शहर टपरी मुक्त करण्याची ‘घोषणा’ तर आ.खडसे यांची कृष्णकृत्ये समोर आणण्याची केली ‘गर्जना’ साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : विधान परिषदेचे आ.एकनाथराव खडसे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊन आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी, ८ सप्टेंबर रोजी आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात आ.चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंढोळदे ते सूलवाडी पूलासाठी ५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. जमिनी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. पूल लवकरात लवकर पूर्ण होईल मोठी कामे करण्यासाठी वेळ लागतोच तुमच्या काळातील म्हणजे २०१६ मधील कामे आजतागायतही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यात बोदवडची ओडीए प्रकल्प योजना आहे. मी…
७८ हजारांचा ऐवज जप्त, रावेर पोलिसांची कारवाई साईमत/जळगाव/रावेर/प्रतिनिधी : रावेर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्याचे साहित्य, सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ७८ हजार ३६० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने रविवारी, ८ सप्टेंबर रोजी दिली आहे. सविस्तर असे की, रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांचे बंद घर फोडून शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू…
शेतकरी शिवसंवाद कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका साईमत/पाचोरा/प्रतिनिधी मतदार संघात भ्रष्टाचार, दडपशाहीचे वातावरण आहे. यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्याचे कोणतेही प्रयत्न विद्यमान आमदारांकडून होतांना दिसून येत नाही. म्हणून आमच्या मतदार संघांची जर काही खरी समस्या असेल तर ती ‘आमदारच’ आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे मतदारसंघात अनेक समस्या उद्भवल्या असल्याचे प्रतिपादन वैशाली सूर्यवंशी यांनी केले. तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेना- उबाठाच्यावतीने मतदारसंघांत पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिवसंवाद यात्रा रथाचे तात्यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि दोन शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते रथाचे पूजन करून ताईंनी हिरवा झेंडा दाखविला. मतदारसंघातील जनतेशी संवाद…
विरवाडा शेत शिवारात घडली अमानुष घटना, पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या. तेव्हा १३ वर्षीय मुलीला एका २० वर्षीय नराधमाने शेतात ओढून नेत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे मानव समाजात प्रचंड आकोश, पूर्ण चीड निर्माण झालीआहे. त्यामुळे नराधमास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. आदिवासी कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या निदर्शनात सुमारे ४०० ते ५०० आदिवासींचा अमानुष पाशवी कृत्याचा, सैतानी मनोवृत्तीचा जाहीर निषेध, नराधमाला फाशी…
पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शहरातील पोलीस स्टेशनजवळील एका ५२ वर्षीय झेरॉक्स व्यावसायिकाने त्याच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. झेरॉक्स व्यावसायिकाने आत्महत्या का केली? त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, पाचोरा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर परभतसिंग केसरसिंग राजपूत (वय ५२, रा. पांडव नगरी, पाचोरा) यांचे ‘गणेश झेरॉक्स’ नावाने दुकान आहे. झेरॉक्स व तहसील, प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपूत हे सकाळी ८ वाजता घरुन…
नववी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील श्री महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते. सभेत संस्थेचे सचिव डी .डी. पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. ते सर्वानुमते मंजूर केले. आगामी वर्षभरात ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्या संदर्भातही ठराव सचिव यांनी सभेसमोर ठराव मांडले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शंकर बाबुराव मराठे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी वैशाली विलास चौधरी यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे संस्थेचे ज्येष्ठ संचालक नारायण देवचंद महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने…
माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे होतेय सर्वत्र कौतुक साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : शहरातून नळगंगा नदी जाते. या नदीवर गेल्या पाच सहा वर्षांपासून उन्हाळ्यात मातीचा बंधारा टाकून पाणी थांबविण्याचे कार्य लोकसहभागातून नगराध्यक्ष हरीश रावळ करतात. त्यामुळे आज ४५ फूट खोल व एक किलोमीटर लांब व नदीच्या दोन्ही पात्र भरलेला बंधारा तयार झाला आहे. त्यामुळे शहराला गोड पाण्याचा भरपूर फायदा होत आहे. अशा लोकसहभागाच्या कार्यामुळे हरीश रावळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या पाच-सात वर्षापासून नळगंगा नदीमध्ये माता महाकाली प्रभागाजवळ रोहिदास नगरच्या बाजूला नळगंगा नदीपात्रात लोकसहभागातून मातीचा जवळ-जवळ ५० फूट उंचीचा बंधारा नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बांधला.दरवर्षी बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यात पोकलेन लावून…