Author: Sharad Bhalerao

आकाशवाणी चौक, इच्छादेवी, अजिंठा चौफुली परिसरातील ‘अस्वच्छते’कडे वेधले लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी सर्कल आणि अजिंठा चौफुली सर्कल अशा प्रमुख परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि जंगली झाडे वाढल्यामुळे परिसर अतिशय अस्वच्छ आणि विद्रूप झाला आहे. याठिकाणाची दुरवस्था लक्षात घेऊन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) यांना निवेदन देत तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने साफसफाईचे काम करावे, अशी नागरिकांनीही अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील आकाशवाणी चौक हा प्रमुख आणि गर्दीचा भाग आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि…

Read More

मंदिरात ट्रस्टतर्फे उत्सवासाठी तयारीला वेग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील निवृत्ती नगरातील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ वाजता होणार आहे. उत्सवासाठी मंदिरात जोरात तयारी सुरू आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी ४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर आहे. येथे प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. प्रत्येकवर्षी कार्तिक पौर्णिमेचा शुभमुहूर्त केरळमधील गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केला जातो, ही मंदिराची खास परंपरा आहे. यावर्षी पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचा योग आहे. पौर्णिमा ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ पासून ते ५ नोव्हेंबर…

Read More

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सरदार पटेलांना अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षीचा कार्यक्रम “सरदार @१५०-एकता मार्च (एक भारत, आत्मनिर्भर भारत)” या थीमनुसार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून आपल्या देशातील विविधतेतून एकता जपण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचा दिवस असल्याचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन…

Read More

२.४६ कोटींचा निधी मंजूर ; तरीही ठेकेदार बेपत्ता, सा.बां.वि.चे दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील पिंप्राळा भागातील सोनीनगर ते ओमकार पार्कदरम्यान सुरू असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. २.४६ कोटींचा निधी मंजूर असूनही ठेकेदाराने काम थांबवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखरेखीत दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रखडला आहे. याठिकाणी अपघातांच्या घटना वाढल्या असल्याने रखडलेला रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पिंप्राळा भागातील सोनीनगरजवळील पुलापासून पुढे रस्ता न उरल्याने खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. कामाचा ठेकेदार अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरातील रहिवासी संभ्रमात आहेत. निधीअभावी काम थांबवले असल्याचा ठेकेदाराचा दावा असला तरी निविदेत काम पूर्ण झाल्यानंतरच देयक…

Read More

जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; विजेत्यांसाठी १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  राज्यातील रंगभूमीवरील तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे तर अंतिम फेरी नागपूर येथे पार पडणार आहे. स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे प्राथमिक फेरीचे आयोजन केले आहे. त्यात अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे रंगणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद केली आहे. प्रथम क्रमांक १ लाख…

Read More

जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांची माहिती, उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्थिर बाजारपेठ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी नमुना सादर केला आहे. जिल्हा पातळीवर भरविण्यात आलेल्या दिवाळी मेळाव्यात महिलांनी तब्बल एक कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली. मेळाव्यात जिल्ह्यातील २०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांनी स्वतः बनवलेले दिवाळी फराळ, हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य, फुलांची आरास, गृहोपयोगी साहित्य आणि स्थानिक कृषी उत्पादनांपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या. नागरिकांनी अशा उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळगाव शहरातील जी.एस. मैदानावरील प्रदर्शन, तसेच नशिराबाद परिसरात…

Read More

“मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठीचा केवळ अभिजात भाषा म्हणून ढोल न वाजवता असे मराठीपण महाराष्ट्राचे वैभव आहे. ते आपण जपले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले. आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन व नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी दिवाळीनिमित्त ‘दाद आणि टिळक’ या कविता प्रारंभी सादर केल्या. महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी माय आणि नोकरी व कौटुंबिक अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांविषयी सादर…

Read More

राज्यस्तरीय रॅंकिंगला जळगाव ग्रामीण विधानसभा प्रथम ; पश्चिम जिल्ह्याने सर्वोत्तम संघटनात्मक जिल्हा म्हणून सलग तिसऱ्यांदा पटकावला मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी थेट संवाद साधतात. समाजातील प्रेरणादायी घटना, सकारात्मक उपक्रम आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देत ते जनतेला प्रेरित करतात. उपक्रमात देशभरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बूथस्तरीय कार्यक्रमांद्वारे नागरिकांना “मन की बात” ऐकण्याची संधी उपलब्ध करून देतात. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या १२७ व्या संस्करणात जळगाव पश्चिम जिल्हा भाजपने संघटनात्मक उत्कृष्टता दाखवत राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जळगाव पश्चिम जिल्हा भाजप अंतर्गत ८ तालुके, ५ विधानसभा आणि २० मंडळातील एक हजार…

Read More

तरुणाईच्या सर्जनशीलतेसह कलागुणांना महोत्सवातून व्यासपीठ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित केलेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव “इंद्रधनुष्य २०२५” स्पर्धेच्या लोगोचे मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यापीठ परिषद सदस्य नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. राम भावसार, प्रा. उज्ज्वल पाटील आणि उपवित्त लेखाधिकारी एस. आर. गोहिल उपस्थित होते. लोगोची संकल्पना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची आहे.…

Read More

समाजातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचावा तसेच एकाच व्यासपीठावर सुयोग्य विवाहस्थळांची माहिती उपलब्ध व्हावी, अशा सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसमागे, एस.टी.स्टँड मागे, जिल्हा पेठ, जळगाव (खान्देश) येथे पार पडणार आहे. उपक्रमात चर्मकार समाजातील विविध जाती-पोटजातीतील युवक-युवतींसोबत घटस्फोटित, विधवा, विधुर, अंध, अपंग, मूकबधिर आदी सर्वसमावेशक घटकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,…

Read More