स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अजय ब्रम्हेचा यांचे प्रतिपादन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : सहकारात संस्थेचा विश्वास, कर्जदाराचा प्रामाणिकपणा हे महत्त्वाचे आहे, असे मत व्याख्याते अध्यक्ष दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई, संचालक नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, अध्यक्ष लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव अजय ब्रम्हेचा यांनी मांडले. ते दि चोपडा पीपल को ऑप बँक लि.च्यावतीने, बँकिंग क्षेत्रातील सहकाऱ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकाराची वाटचाल’ विषयावर बोलताना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख पाहुणे संचालक दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन मुंबई, अध्यक्ष जनकल्याण को-ऑप बँक लि. नाशिक…
Author: Sharad Bhalerao
सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी धरला ठेका, पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाला चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पाचव्या दिवशी वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गावातील सदगुरू मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, संभाजी राजे मित्र मंडळ, राॅयल ग्रुप, स्वस्तिक ग्रुप, महर्षी वाल्मीक मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर मित्र मंडळ, परवानगीधारक सात मंडळे सहभागी झाले होते. अडावद पोलिसांचा भव्य असा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. सर्व गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दुपारी तीन वाजेदरम्यान सुरू झालेली ही मिरवणूक रात्री साडेदहा वाजता समाप्त झाली. ही मिरवणूक माळीवाडा, शिव गल्ली,…
‘एक घर एक साडी’ मोहिमेद्वारे विविध भागात साड्यांचे वाटप साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा-भडगाव तालुक्यासह पाचोरा शहरात रक्षाबंधनाचे औचित्य साधून आ. किशोर पाटील यांच्याकडून ‘लाडक्या बहिणीला’ अनोखी भेट म्हणून साडी वाटप करण्यात येत आहे. ‘एक घर एक साडी’ या पद्धतीने पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रमाता नगर, मुकुंद नगर, वृंदावन नगर, पवन नगर, चिंतामणी कॉलनी, जय किसान सोसायटी, दत्त कॉलनी, जयराम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, मल्हार नगर, शांतीनगर, लक्ष्मीबाई वाघ नगर, सावित्रीबाई नगर, जिजामाता दुर्गा नगर, भवरलाल नगर, गजानन महाराज ठाकरे नगर, श्री कृपा कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर अशा विविध भागात ‘एक घर एक साडी’ देण्यात आली आहे. काही…
गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी केली रस्त्यांची कोंडी साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या महत्वाचे प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी रस्त्याची कोंडी केली आहे. या रस्त्यावरून मोटार सायकल जाण्यासही कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाच्या आडमुठे धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या प्रशासकीय इमारत आहे. प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती कार्यालय, वन विभाग, महिला बाल कल्याण, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग आदी महत्वाची कार्यालये आहेत. तसेच परिसरात जिल्हा ग्राहक न्यायालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आहे. अशा…
वरणगाव नजिकच्या हॉटेलवरून चोरी झाला होता ट्रक साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील एका हॉटेलवरून रात्रीच्या वेळी चोरी गेलेल्या ट्रक प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.याप्रकरणी पोलिसांनी फिरविलेल्या तपास चक्रात फिर्यादी ट्रक चालकासह पोलिसांनी अन्य दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेला ट्रक अद्याप जप्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, पाळधी येथील ट्रक चालक अरबाज खान तस्लीम ( वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एम. एच. ४३ -वाय-८०८७ ) भुसावळ – वरणगाव महामार्गाने येत असतांना वरणगाव नजिकच्या महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी रात्री थांबला होता. मात्र, रात्री ट्रक चोरीला गेल्याचे…
खड्डेमय रस्त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचेही आंदोलन साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील खड्डेमय रस्त्याची अंत्ययात्रा गुरुवारी बसस्थानक ते नाहाटा कॉलेज चौफुलीपर्यंत काढण्यात आली. सर्वप्रथम गणरायाचे पूजन करून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. संविधान आर्मीचे कामगार नेते जगन सोनवणे, पुष्पा सोनवणे यांच्या माध्यमातून खड्डेमय रस्त्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. खड्डयाच्या रस्त्याची अंत्ययात्रा डॉ.बाबासाहेब पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अमर स्टोअर मॉर्डन रोड, अष्टभुजा देवी मंदिर मार्गे, शहीद राकेश शिंदेच्या स्मारकास वंदन करून नाहाटा कॉलेज चौफुली लगत खड्डेमय रस्त्याच्या विरोधातील अंत्ययात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी भुसावळ शहरात पडलेले खड्डे संबंधित अनोख्या पध्दतीचे जन आंदोलन…
वरणगाव फॅक्टरीतील घटनेप्रकरणी मयताच्या भावाला सुनावली पाच दिवसांची कोठडी साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : वरणगाव फॅक्टरीच्या क्वार्टर थ्री टाईप ४४ मध्ये रहिवास करणाऱ्या लहान भावाची कौटुंबिक प्लॉटच्या आर्थिक वादातून मोठ्या भावाने त्याच्याच निवासस्थानी हत्या करुन भावाला ‘यमसदनी’ धाडले आहे. या घटनेमुळे ‘भाऊच झाला भावाचा वैरी’ अशी परिवाराची स्थिती निर्माण झाली आहे.घटनेतील मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, मयताचे वडील जयसिंग इंगळे हे वरणगाव फॅक्टरीतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांची दोन्ही मुले सतीष आणि प्रदीप हे याच फॅक्टरीतील वेगवेगळ्या विभागात उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत. सतीष जयसिंग इंगळे (वय ५१)…
गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी नरेंद्र नारखेडे यांचे आवाहन साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन आपला विकास करून आपले ध्येय साध्य करावे, असे सातपुडा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. फैजपूर येथील सातपुडा अर्बन सहकारी पतसंस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपासह गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म.स.सा.कारखानाचे माजी चेअरमन शरद महाजन यांनीही मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संस्था करीत असलेल्या सामाजिक आर्थिक विकासाचे कार्याचा गौरव केला. संस्थापक-चेअरमन प्रा.एस.जे.पाटील, दूध संघाचे जिल्हा संचालक नितीन चौधरी, सिनेट सदस्य प्रा.पद्माकर पाटील, चंद्रशेखर चौधरी, माजी चेअरमन के.डी.भंगाळे, माजी नगराध्यक्ष चोलदास…
तीन वर्षांपासून खंडु वाघे स्वखर्चाने राबविताहेत ‘भुतदया’ उपक्रम साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : पशु, पक्षी व मुक्या प्राण्यांवर ‘प्रेम हीच खरी ईश्वर सेवा’ ही मनोभावना मनाशी बाळगून वरणगावातील सत्य साई सेवा मंडळाचे सदस्य खंडु वाघे दैनंदिन सकाळी स्वखर्चाने सातमोरी पुलाजवळ कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ टाकुन त्यांची काऊ घासाने भुक भागवित आहेत. त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण या जगात अनेक माणसांना विविध पशु, पक्षी, प्राण्यांवर प्रेम करतांना पाहिले आहेच. त्यामध्ये काही जणांकडून कावळ्यांना अशुभ मानले जात असले तरी याच कावळ्यांना पितृपक्षात तसेच दशक्रिया विधीच्यावेळी तांदुळाच्या भाताने केलेल्या पिंडदानाला कावळ्यांनी काऊ घास खावा आपल्या दिवंगत माता – पित्यांना मोक्ष मिळावा, यासाठी त्यांना…
सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी धरला ठेका, पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाला चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पाचव्या दिवशी वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गावातील सदगुरू मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, संभाजी राजे मित्र मंडळ, राॅयल ग्रुप, स्वस्तिक ग्रुप, महर्षी वाल्मीक मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर मित्र मंडळ, परवानगीधारक सात मंडळे सहभागी झाले होते. अडावद पोलिसांचा भव्य असा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. सर्व गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दुपारी तीन वाजेदरम्यान सुरू झालेली ही मिरवणूक रात्री साडेदहा वाजता समाप्त झाली. ही मिरवणूक माळीवाडा, शिव गल्ली,…