Author: Sharad Bhalerao

गणेशपूर, वलठाण शिवारात वाढला होता वावर साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील गणेशपूर आणि वलठाण शिवारात गणेशपूर येथील जाधव यांच्या शेतात नरभक्षक बिबट्याला जेरबंद केल्याचे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात वन अधिकारी शितल नगराळे यांच्यासह पथकाची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्याचेही सांगण्यात आले. बिबट्याचा गणेशपूर आणि वलठाण शिवारात वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. नरभक्षक बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच वनविभागाच्या पथकाला यश मिळून बिबट्याला अखेर जेरबंद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Read More

संशयित पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : येथील आठवडे बाजाराच्या ओट्यांवर धार्मिक सणानिमित्त १८ सप्टेंबर रोजी रात्री आयोजित सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमात स्थानिक दोन तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद उफाळला होता. याप्रकरणी आरोपी शेख हैदरला रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपीला न्यायालयात हजर केल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, आरोपी शेख हैदर शेख मंजूर (वय ३७, रा. मोठा आखाडा, सावदा) याने फिर्यादी सैय्यद मोईन सैय्यद सलीम या तरुणाला बघून आरोपीने हातात लोखंडी हातोडा (घन) घेऊन आला होता. फिर्यादीला मारणार या भीतीपोटी फिर्यादी तेथून पळून जात असताना शेख हैदरने फिर्यादीच्या…

Read More

पाचोरा तालुक्यातील भयावह वास्तव; ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। ‘आम्हाला साधा रस्ताही चांगला करून मिळत नाही. आधी आम्हाला नेते आश्वासन देऊन गेलेत. मात्र, ती केवळ ‘कागदावरच’ राहिले !’’ अशी व्यथा व्यक्त करत तालुक्यातील ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वैशालीताई सूर्यवंशी यांनी काढलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यात परधाडे येथे स्व. आर. ओ. तात्यासाहेब पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या आज अतिशय सुस्थितीत असलेल्या सभागृहात वैशालीताई सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात ज्येष्ठ ग्रामस्थांनी परधाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था असल्याच्या तक्रारी केल्या. आजवर नेत्यांनी आश्वासन देऊनही काम…

Read More

मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई महाविद्यालयात युवती संवाद कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : महिलांना न्याय व हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान महिलांना वाचता यावे, म्हणून सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण दिले, असे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई महाविद्यालयात आयोजित युवती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, भारतातील बेपत्ता मुली कुठे जातात, त्याचा शोध आयोगामार्फत घेण्यात आला. आखाती देशातून आतापर्यंत ७२ मुली देशात परत आणलेल्या आहे. मुलींनी नाव मोठे करावे. कर्तुत्व मोठे केले म्हणजेच की आपले नाव मोठे होते. सोशल मीडियावर ओळख करून प्रेमाने गोड-गोड बोलणाऱ्या मुली फसतात. त्यामुळे…

Read More

जिल्हाधिकारी, सह आयुक्त प्रशासक तथा प्रांताधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साईमत/यावल/प्रतिनिधी : नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून एक दोन महिन्यात बदली होत असल्याने तसेच प्रभारी मुख्याधिकारी हे फक्त आर्थिक व्यवहाराचे बिल काढण्यासाठी कामकाज करत असले तरी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना नगरपरिषदेच्या कार्यालयासह माहिती अधिकाराची ‘ॲलर्जी’ असल्याचे संपूर्ण यावल शहरात चर्चिले जात आहे. याकडे जिल्हाधिकारी, सह आयुक्त प्रशासक तथा प्रांताधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यावल नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने यावल नगर परिषदेचा ७५ टक्के कारभार विस्कळीत आणि अनियमित झाला आहे. अनेक नागरिकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. प्रभारी मुख्याधिकारी यावल नगरपरिषद कार्यालयात आठवड्यातून दोन-तीन दिवस नियमित थांबत नसल्याने नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना विविध कामासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांच्या मागे भटकंती करावी…

Read More

चाळीसगाव महाविद्यालयात ‘करिअर निवड: यशाच्या मार्गावर नेव्हिगेट करणे’वर व्याख्यान साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। विद्यार्थ्यांनी करियर करत असताना येणारे नैराश्य टाळण्यासाठी त्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांकडून SWOT चाचणी करून मानसिक स्थिरता येण्यासाठी निर्णय क्षमता वाढविण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करावी. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम करियरसाठी मानसिक स्थैर्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. गिरीष भास्कर महाजन यांनी केले. येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात भूगोल विभागाद्वारे “करिअर निवड: यशाच्या मार्गावर नेव्हिगेट करणे” विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर होते. उपप्राचार्य वसईकर यांनी मनोगतात भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक भौगोलिक…

Read More

आ. संजय गायकवाड, खा.अनिल बोंडे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी साईमत। चोपडा।प्रतिनिधी। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्याबाबत बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड आणि खा.अनिल बोंडे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होवून गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येथील चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक देवरे यांना निवेदनही देण्यात आले. आंदोलनावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद…

Read More

कुपोषित बालकांना ‘आहाराचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शन साईमत। जामनेर।प्रतिनिधी। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले. त्यात सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोग तज्ज्ञांकडून तालुकास्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले. बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दाते शोधून पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात बालकांना औषधींचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मोना महाजन, डॉ.मनीषा…

Read More

सर्व शालेय अभिलेखे तपासून व्यक्त केले समाधान साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कुलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा दोन अंतर्गत जिल्हास्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. समितीत प्रमुख प्रतिभा भावसार, सुषमा इंगळे, सरोज गायकवाड, सीमा पाटील यांचा समावेश होता. त्यांनी सर्व शालेय अभिलेखे तपासून समाधानही व्यक्त केले. समितीने शाळेला भेट देऊन विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजना, विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, बास्केटबॉलचे मैदान, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडीचे मैदाने, व्यायामशाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी…

Read More

‘एक पेड माँ के नाम’ राबविला उपक्रम, स्वदेशी झाडांची केली लागवड साईमत। धरणगाव।प्रतिनिधी। येथील प.रा. हायस्कुल सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार १७ सप्टेंबर रोजी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय शिंगाणे, एनसीसीचे विभाग प्रमुख डॉ. अरुण वळवी, धरणगाव शहराचे पी.आय. संतोष पवार यांच्या हस्ते स्वदेशी झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. केंद्रे, डॉ. वारडे, डॉ. कांचन महाजन,…

Read More