Author: Sharad Bhalerao

प्रशासकीय काळात संपूर्ण पालिकेचा कारभार वाऱ्यावर साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेत प्रशासकीय कार्यकाळापासून शहरात स्वच्छताचे निकष धाब्यावर ठेवून याकडे सातत्याने पालिकेतील संबंधित विभागाकडून दुर्लक्षित पद्धतीने स्वच्छता ठेवण्याबाबत फक्त औपचारिकता पुरती केली जात असल्याचे दिसून येते. शहरात दलीत वस्ती परिसर, न.पा.उर्दु मुला-मुलींची शाळा मागील महिला व पुरुषांचे सार्वजनिक शौचालय, साळी वाडा येथील शौचालय आयुब भंगार दुकानासमोरील महिलांचे शौचालय, शनीमंदिरासमोरील गटार यावरील ठिकाणी नियमित व वेळेवर साफसफाई केली जात नसल्यामुळे करदात्यांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करणारे अस्वच्छतेचे विदारक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अशा दूषित वातावरणामुळे विषारी डास…

Read More

शांतता समितीच्या बैठकीत डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांचे प्रतिपादन साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरात जातीय सलोखा कायम ठेवून गणेशोत्सव शांततेत साजरा करताना शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी गणेशोत्सव, गणेश विसर्जनाची आणि शासनाची विशेष काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे आगामी दुर्गोत्सवही त्याच पद्धतीने साजरा करणार असल्याने आणि दुर्गोत्सव साजरा करताना आणि विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या समस्या अडीअडचणी, वीज वितरण कंपनी आणि नगरपरिषद यांच्यामार्फत सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांनी सांगितले. यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी, २७ रोजी सकाळी ११ वाजता शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य…

Read More

सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्तम प्रकारे जोपासला समन्वय साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची अचानक बदली आहे. त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय उत्तम प्रकारे जोपासला होता. ज्या दिवसांपासून त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला, तेव्हापासून त्यांनी शहरात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेला सर्वसामान्य माणुस चेहऱ्यावर समाधान घेऊन परत येत होता. चाळीसगाव शहरातील सभ्य व सुज्ञ लोकांमधील पोलीस ही भिती काढून पोलीस हे सभ्य जनतेचे मित्र असतात, असा संदेश त्यांनी दिला आहे. मोहब्बत भी है तुम्ही से, तुम ही से पहचान है, यह खाकी नही है साहब, यही तो मेरा इनाम…

Read More

चोपड्यात शेतकरी कृती समितीतर्फे तहसिलदारांना निवेदन सादर साईमत/चोपडा/प्रतिनिधी : खरीप हंगामात तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील खरीप २०२४ च्या पिकांचे पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकरी कृती समितीची मागणी असून अशा आशयाचे निवेदन त्यांनी चोपडा तहसीलदार यांना नुकतेच सादर केलेले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ओला दुष्काळाचे ट्रिगर काहीही असले तरी नुकसान मात्र साऱ्याच आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्यात वेळ न घालता, गरज असल्यास प्रातिनिधिक पंचनामा करून लवकर निर्णय घेवून नुकसान भरपाई मंजूर करून उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही निवेदनात केली आहे. यासाठी लवकर निर्णय न झाल्यास शेतकरी मोठे आंदोलनही उभारतील, असेही…

Read More

१७० विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाल स्वास्थ्य जामनेर विभागाचे मेडिकलच्या ऑफिसर डॉ. हर्षाली गोसावी यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या १९८ पैकी १७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्य तपासणीवेळी आरोग्य सेविका श्रीमती अनिता बडगुजर उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Read More

जळगाव ग्रामीण आजमावण्याची उद्धव सेनेत जबरदस्त उर्मी…! साईमत।जळगाव।विशेष प्रतिनिधी विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय गणित बदलू लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार महाविकास आघाडी अंतर्गंत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ उद्धव सेनेला हवा आहे, नव्हे राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी ते आमचे आवश्यक टार्गेटच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याचे वृत्त आहे. तथापि, महाविकास आघाडी अंतर्गंत जळगाव जिल्ह्यातील विधानसभांच्या जागांचे अंतिम वाटप अद्याप निश्चित झालेले नसले तरी जळगाव ग्रामीणच्या जागेबाबत नवीन घडामोडी निर्णयाचा संकेत देणारी आहे. गेल्या मंगळवारी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव सेनेच्या पक्षप्रमुखांसोबत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत स्वत: उध्दव ठाकरे यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांना…

Read More

मधुकर कारखान्याची शोकांतिका… भाग ३ कारखान्याचे न्हावी शाखेतील बचत खात अद्यापही गोठविलेलेच सुरेश उज्जैनवाल यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करुनही कारखान्याकडे असलेली विविध घटकांची देणी अद्यापही बाकी आहेत. मे. इंडिया बायो ॲण्ड ॲग्रो पॅसिफिक प्रा.लि.कंपनीने मधुकरची मालमत्ता विकत घेत मालमत्तेचा ताबा घेवून १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला. पण संबंधित खरेदीदार कंपनीने विक्री बाँड अंतर्गंत कामगारांसह इतरांच्या देणीविषयी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कारखाना विक्री करुनही प्रश्न सुटलेला नाही. कामगारांनी थकीत वेतनासाठी राज्याचे सहसंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेवून ‘आमचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु’, असा लेखी स्वरुपात इशाराही दिला…

Read More

जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात मनसेची भक्कम फळी निर्माण करणार साईमत/यावल/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन तसेच मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या अमोल दर्शनामुळे आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत पाडळसे गावातील ५० कट्टर कार्यकर्त्यांनी २ दिवसांपूर्वी मनसेमध्ये स्वयंस्फूर्तीने प्रवेश करून तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करण्याचा संकल्प केला. तालुक्यातील पाडळसे येथील भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक ॲड.जमीलभाई देशपांडे, भुसावळ उप जिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपाध्यक्ष सतिष सैंदाणे आणि यावल शहराध्यक्ष अजय तायडे (पाडळसा, भालोद गटाचे), यावल ता.उपाध्यक्ष पंकज तावडे,…

Read More

भ्रष्ट अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांंच्या चौकशीची मागणी, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याकडून सामान्य जनतेला जो त्रास होतोय, त्यांचे वेळेवर काम करीत नसून अश्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी व्हावी, म्हणून चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, जिल्हा संघटक परेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनासह उपोषणास सुरुवात केली आहे. मुख्यतः तहसीलदार यांच्याकडून प्रलंबित रेशनकार्ड व रेशन संदर्भात अनेक त्रुटी दाखवून नागरिकांना वर्षोनुवर्षे फिरवून त्रास दिला जात आहे. रेशन दुकानदार डिजिटल थंब न घेता धान्य देतात. हा मुख्य मुद्दा असुन चहार्डी व वर्डी येथील पं.स.च्या ग्रामसेवकाच्या अनेक तक्रारी…

Read More

विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींसाठी योजनांचा आढावा आमदारांनी घेतला साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : येथे किशोरआप्पा बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामी लॉन्स येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी १०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. किशोरआप्पा पाटील होते. आ.किशोर पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करिअर केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर नव्हे, प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्याची संधी युवकांना आहे, असे मार्गदर्शन केले. यावेळी राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी योजनांचा आढावा आमदारांनी घेतला.…

Read More