Author: Sharad Bhalerao

‘माझी वसुंधरा’ उपक्रमात पटकाविला विभागीय पुरस्कार साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील तब्बल आठ महिला सदस्य असलेल्या जरंडी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट काम करून गावाचा चेहरा मोहरा बदलवून टाकत निसर्गाशी संबंधित उपक्रम गावात राबवित घनवृक्ष लागवड, हा प्रयोग यशस्वी करून मराठवाड्यात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५० लाख रुपये मिळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयगावच्या जरंडी ग्रामपंचायतीचा झेंडा आता मराठवाडा भर रोवला गेला आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत जरंडी ग्रामपंचायतने राबविले. त्यामध्ये घन वृक्ष लागवड अंतर्गत २५…

Read More

संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत केला प्रवेश साईमत/यावल/प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘निळे निशाण’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रवेश सोहळा आयोजित केला होता. प्रवेश सोहळ्यात यावल तालुक्यातील शेकडो महिलांसह पुरुषांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्यवर कांशिरामजी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या ‘निळे निशाण’ संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर, सदाशिव निकम, जिल्हा सचिव शरद बाविस्कर, ॲड.प्रवीण इंगळे, फैजपूर विभागाचे उपाध्यक्ष अनिल इंधाटे, इकबाल तडवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी यावल तालुकाध्यक्ष विलास तायडे, यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे यांनी परिश्रम घेतले.

Read More

शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांचे प्रतिपादन साईमत/यावल, फैजपूर/प्रतिनिधी : शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. आश्रय फाउंडेशन, यावलच्यावतीने फैजपूर येथे रावेर-यावल तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फैजपूरच्या खंडोबा वाडी देवस्थान परिसरात भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प.पू.पवनदास महाराज, पी.एस.सोनवणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी (न्हावी), मुख्याध्यापक दिलीप पाटील (अभोडा) आणि जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जितेंद्र पाटील (मोरगाव) आणि…

Read More

अनेक पदाधिकाऱ्यांचा ‘शिंदे’ गटात प्रवेश साईमत/बोदवड/प्रतिनिधी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोदवड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बोदवड तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकारी यांनी २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून गजानन खोडके, असलम शेख, संजय महाजन, इस्राईल शेख यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे अफसर शेख, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, मुक्ताईनगरचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, बोदवडचे तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, बोदवड शहर प्रमुख गणेश टोंगे, हर्षल बडगुजर, राजेश शेठ नानवाणी, बोदवड शहरप्रमुख दिनेश माळी, बोदवडचे उपनगराध्यक्ष संजय…

Read More

संयोजकांतर्फे बग्गीला सुंदर फुलांनी सजवले जाणार साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : पोलीस विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेरात अल्पावधीतच लोकाभिमुख अधिकारी म्हणून लौकिक मिळविलेले पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्त त्यांची शहरातून सन्मानपूर्वक मिरवणूक काढण्यात येणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणून विविध सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्रांच्यावतीने त्यांची भव्य सन्मान मिरवणूक सजवलेल्या बग्गीवरून मिरवणुकीचा शुभारंभ सोमवारी, ३० सप्टेबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पैलाडपासून करण्यात येणार आहे. बोरी नदी पुलावरून मिरवणूक शहरात प्रवेश करेल. मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ढेकू रोडमार्गे कलागुरुजवळील पोलीस चौकीपर्यत काढण्यात येणार आहे. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात समारोप कार्यक्रम…

Read More

वहनोत्सवासह रथोत्सवास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव येत्या ३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी व विश्वस्तांनी यांनी दिली. चोपड्याच्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला ३ पासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची शहरातील विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्ताने उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. दररोज एक याप्रमाणे या वर्षाचे निघणारे दहा दिवसांचे वहन व त्याचा मार्ग असा राहील. ३ ऑक्टोबर रोजी – हत्ती (गांधी चौक, बाजारपेठ ), ४ -गरुड (मोठा…

Read More

विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, अनुशासनासह संस्काराची जोपासना करा: खा.स्मिताताई वाघ साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नुकताच सन्मान सोहळा व कृतज्ञता सोहळा पार पडला. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी निवडून आलेल्या `नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ` यांचा तसेच सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले अमळनेर नगरीचे `डीवायएसपी सुनील नंदवाळकर` यांचा संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष युवा नेते अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील यांच्या सूचनेनुसार नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य विजय बोरसे व प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.सुनील गरुड हे होते. याप्रसंगी आर्मी स्कूलचा ‘मुख्यमंत्री…

Read More

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मिळविले नावलौकीक विद्यार्थी हित जोपासणारे आणि विद्यार्थी हेच माझे दैवत मानणारे शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) हे जिल्हा परिषद मराठी शाळा टाकरखेडा ता.जामनेर जि जळगाव येथे ग्रेडेड मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. शालेय कामकाज सांभाळून साहित्य रचनेचे काम सुद्धा करतात. काही माणसे, माझी शाळा, आटोपला खेळ, तरफडा, शेतकरी आदी विषयांवर त्यांच्या कविता वस्तुस्थितीला अनुसरून आहेत. या अगोदर त्यांचा चारोळी काव्यसंग्रह “बालविश्व” तसेच “किलबिल” प्रकाशित झालेला आहे. पी.टी.पाटील यांनी आईबद्दल “माय” आणि वडिलांबद्दल “बाप” हे काव्यसंग्रह संपादित केलेले आहे. माय आणि बाप या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवितांचा समावेश आहे. हे काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केले आहे. नाविन्यपूर्ण…

Read More

पाळीव प्राण्यांपासून घ्यावयाची काळजीविषयी मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक रॅबीज दिनाचे औचित्य साधत आरोग्य स्वच्छता, परिसर स्वच्छता, रॅबिस संसर्ग कसा होतो, भटकंती कुत्रे, प्राणी, पाळीव प्राण्यांपासून घ्यावयाची काळजी, कीटकजन्य आजाराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आरोग्य सेवक गोपाळ पाटील, किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक जी.जी.अत्तरदे, पर्यवेक्षक प्रा.डी.झेड.गायकवाड, कला समन्वयक प्रा.विजय पाटील, माध्य.विभाग पर्यवेक्षक जी.जे.पाटील, पर्यवेक्षक एस.एन.चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जि.आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, प्राथमिक आरोग्य…

Read More

ग्रामस्थांच्यावतीने सन्मान, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी नेहमी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे नांद्रा प्र.लो. येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक रवींद्र सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्य सेवक पुरस्कारासाठी नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ, सचिव ज्ञानेश्वर वाघ, शालिग्राम मालकर, डॉ.महेंद्र काबरा, मीनाक्षी चव्हाण, डॉ.शैलेंद्र भगणे, युवराज पाटील, आदर्श शेतकरी विजय पाटील उपस्थित होते. संस्थेकडून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्वामी विवेकानंदांचे विचारांचे पुस्तक देऊन रवींद्र सूर्यवंशी यांचा व्यासपीठाने सन्मान केला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. याबद्दल…

Read More