घराघरात संविधान जागृतीसाठी संमेलनाचे बहुआयामी नियोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संविधानाचे मूल्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून घराघरात जागृती निर्माण करण्याचे कार्य संविधान सन्मान संमेलन प्रभावीपणे पार पाडणार आहे. त्यामुळे संमेलन देशासाठी ‘आयडॉल’ ठरेल, असे मत संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजनाची माहिती देत आवश्यक मार्गदर्शन केले. बैठकीत प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचा प्रचार वाड्या–वस्त्यांपर्यंत कसा पोहोचवायचा त्याचे नियोजन मांडले. बैठकीत संमेलन स्थळ, शहरातील स्वागत कमानी, प्रचार व्यवस्थापन याबाबत प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, ॲड. आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे, पुष्पा साळवे,…
Author: Sharad Bhalerao
मायमाती फाउंडेशनचा ‘वाचन–गप्पांचा’ अभिनव उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील ममुराबादजवळील धामणगावातील कै. बाबडू सुपडू सपकाळे माध्यमिक विद्यालयात ‘बालदिन’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मायमाती फाउंडेशन संचलित ‘गंमत जोडशब्दांची रिडिंग अँड लर्निंग सेंटर’ तर्फे कट्ट्यावरच्या गप्पा पुस्तक मेळावा “पुस्तकातून ज्ञान घेऊन, गप्पांमधून व्यक्त होऊ” असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या आवारात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिवंत पुस्तकालय उभे करण्यात आले. तब्बल दहा विषयाधारित कॉर्नर सजवून विद्यार्थ्यांना विविध साहित्य जगताचा प्रवास घडविण्यात आला. गोष्टी, चित्र पुस्तके, कविता, माहितीपूर्ण साहित्य, कुल्की मासिक, गरवारे बालभवनची पुस्तके यांसह ज्योत्स्ना प्रकाशन आणि प्रथम बुक्स यांच्या दर्जेदार साहित्याचा समावेश होता. उपक्रमात प्रभावती पाटील यांनी उपस्थित सर्व…
बालरंगभूमी परिषदेतर्फे २८, २९ नोव्हेंबरला आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृती आणि परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी अशा उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यातील बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे महाराष्ट्राची कला व परंपरा जपतांना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता या…
आकाशवाणी चौकातील सर्कलसह परिसरात पसरली अस्वच्छता साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून परिसरात कचरा साचत असल्याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. सर्कल मोडकळीस आलेले असताना आणि परिसराची नियमित स्वच्छता न ठेवता झालेल्या निष्काळजीपणाबद्दल आंदोलनकर्त्यांनी जळगाव महानगरपालिका तसेच नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. आंदोलनात सर्कलमध्ये उगवलेल्या गवतावर पंपाच्या सहाय्याने तणनाशक रसायनाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील साचलेला कचरा गोळा करून एका बाजूला हलवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परिसराची साफसफाई नेहमीप्रमाणे ठेवण्यात यावी आणि भविष्यात गवताची वाढ रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी…
जिल्हाधिकारी कार्यालयात सौर ऊर्जेवर आधारित शाश्वत विकास उपक्रमांवर चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सौर ऊर्जेवर आधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सौर ऊर्जा व वीज व्यवस्थापन’ विषयावर सविस्तर बैठक पार पडली. यावेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण) यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत सौर ऊर्जा वापर, ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकास यासंबंधी विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला जळगाव महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता उपस्थित होते. बैठकीतील प्रमुख मुद्यांमध्ये ‘PM Suryaghar मोफत वीज योजना’-शहरी आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये सौर पॅनल स्थापनेद्वारे घरगुती वीज खर्च कमी करणे आणि…
स्वावलंबनाच्या स्वप्नांवर पाणी, हजारो युवकांचे आर्थिक नुकसान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री अर्थसहाय्य योजना आणि इतर शासकीय अर्थसहाय्य योजनांतील बेरोजगार तरुणांची प्रकरणे थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे हजारो युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या स्वावलंबनाच्या स्वप्नांवर पाणी फिरत आहे. त्यामुळे आचारसंहिता बेरोजगारांचा कोणताही हक्क हिरावू शकत नाही, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैंदाणे, दीपक राठोड, प्रदीप पाटील तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील आदी उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, या…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उधाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा…
जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ऑनलाईन युगात महिलांवर वाढत्या फसवणूक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी ऑनलाईन सतर्कता पंधरवड्याचा अभिनव उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात जामनेर तालुक्यातील महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्तींशी ऑनलाईन संवाद साधून सोमवारी झाली. जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानांतर्गत तब्बल दोन हजार २५० समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) कार्यरत आहेत. ६७ प्रभाग संघ, एक हजार ४३० ग्राम संघ आणि ३३ हजार स्वयंसहायता समूहातून सुमारे ३ लाख ३० हजार महिला सक्रियपणे सहभागी आहेत.…
‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे १५ नोव्हेंबरपर्यंत कथेचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय सनातन संस्कृतीत पवित्रतेचे आणि मातृत्वाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौमातेची सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते. धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही गोवंशाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘श्री गौ कृपा कथा’ भव्य धार्मिक कथा ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केली आहे. ही कथा श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे, नेरी नाक्याजवळील पांजरापोळ प्रांगणात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित केली आहे. कथेत कथा वाचक, संगणक अभियंता आणि गौसेवेचा प्रचार करणाऱ्या पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी गौमातेच्या सेवेमागील धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलूंवर प्रकाश टाकतील. दीदींनी केवळ वयाच्या विसाव्या वर्षी संन्यास स्वीकारून अध्यात्माच्या मार्गावर पदार्पण केले…
आकाशवाणी सर्कल स्वच्छतेने उजळले, नागरिकांकडून स्वागत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रमुख आकाशवाणी सर्कल, इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड गवत, झुडपे व जंगली झाडे उगवून परिसर विद्रूप बनला होता. अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नव्हती. अशा निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (न्हाई) यांना निवेदन देत तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली. निवेदनात मनसेने स्पष्ट इशारा दिला होता की, आकाशवाणी चौक हा शहराचा चेहरा आहे. जर तीन दिवसात परिसर स्वच्छ केला नाही तर मनसे सर्कलमध्ये प्रतीकात्मक निषेध म्हणून बकऱ्या चारु, अशा कठोर इशाऱ्याची शहरभर चर्चा झाली.…