Author: Sharad Bhalerao

कब्जा हक्काची रक्कम ५० रुपये चौरस मीटर प्रमाणे कमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांची झाली वचनपूर्ती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील मेंढोदे (खडकाचे) हे गाव हतनूर प्रकल्पांतर्गत मेंढोदे गावाचे पुनर्वसन १९७३ मध्ये झालेले होते. २०१२ मध्ये भूखंड आकारणी झालेली होती. या भूखंडाचे एकूण क्षेत्र १३०७१.५१ चौरस मीटर आहे. यासाठी भूखंड धारकांना एकूण भरणा करावयाचे कब्जा हक्क रक्कम १०३ रुपये चौरस फुटाप्रमाणे होती. परंतु, गावातील भूखंड धारक हे हात मजूर असल्याने कब्जा हक्क रक्कम जास्त होत असल्याने कब्जाची रक्कम भरू शकत नसल्याने कुणीही भूखंड ताब्यात घेतले नव्हते. गावातील ११७ रहिवासी यांना भूखंड वाटप करण्याचा आदेश ६ मार्च २०१२ रोजी काढण्यात आला होता.…

Read More

साहित्यिक, रसिकांसह भाषाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता काव्यरत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्यिक, रसिक व भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भंडारी, भगवान भटकर, भास्करराव चव्हाण, डी. बी. महाजन, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, अशोक पारधे, वर्षा अहिरराव, ज्योती राणे, आर. जे. सुरवाडे आदींनी केले आहे.

Read More

गणेश माळीच्या जीवनावर आधारीत ३५ ते ४० मिनिटांचा असणार चित्रपट साईमत/असलोद, ता.शहादा/प्रतिनिधी शहादा तालुक्यातील असलोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील दोन्ही हाताने अपंग असलेला गणेश अनिल माळीच्या जीवनावर आधारीत ३५ ते ४० मिनिटांचा चित्रपटाच्या चित्रीकरणाची शुटींगची सुरुवात असलोद गावातून येणाऱ्या बुधवारी, ९ तारखेला होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक सुनील कुमार देवरे तर चित्रपटाचे निर्माते पंढरीनाथ धनगर आहेत. चित्रपटातील कलाकार असे आहेत ‘गणु’ चित्रपटात मुख्य कलाकार सुनील कुमार देवरे, ऋतिका कुमारी राजपूत, प्रणाली भावसार, ललिता माळी, गणेश अनिल माळी, अनिल माळी, गणेश सोनवणे, शाम राजपूत, राज कोळी तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असलोद येथील बालकलाकार व कनकेश्वरी…

Read More

विधानसभा निवडणूक देवकर ‘तुतारीवरच’ लढणार अन्‌ जिंकणारच : पक्ष निरीक्षक भास्करराव काळे साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जागा अमाची असून आम्ही ती मित्र पक्ष उध्दव सेनेला सोडण्याचा प्रश्नच नाही. अशी ठाम भूमिका रा.काँ.(शरद पवार गटाचे) पक्ष निरीक्षक भास्करराव काळे यांनी धरणगाव येथे पक्षाच्या सभेत जाहीर केली आहे. शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी रा.काँ.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री.काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यात त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून यापूर्वीही ते जळगाव ग्रामीणमधून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे जळगाव ग्रामीणची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघ जिल्ह्याच्या राजकीय…

Read More

एमआयडीसी पोलिसांची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा बसस्थानकासमोरून दुचाकीसह दोन चोरट्यांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण ३ दुचाकी जप्त केल्या आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी दुपारी केली आहे. अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असून याबाबत चौकशीला सुरूवात केली आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामानिमित्त (क्र.एमएच १९ बीएल ९३३४) या दुचाकीवरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान कुसुंबा शिवारातील काही मुलांनी उमाळा गाव…

Read More

ईशान, जोहान, शरयू, झाईन, आद्या, राजवर्धन अन्य गटांचे विजेते साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेत मुंबई उपनगरच्या दिव्यांशी भौमिकने मुलींच्या १५ व १७ या दोन्ही गटांचे विजेतेपद प्राप्त केले तर ईशान खांडकेकर (पुणे), जोहान चेलीपरमबील (ठाणे), शरयू टेकाळे (परभणी), झाईन शेख (मुंबई उपनगर), आद्या बाहेती (परभणी) आणि राजवर्धन तिवारी (सोलापूर) ह्यांनी विविध गटांचे विजेतेपद मिळविले. राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल येथे ह्या स्पर्धा पार पडल्या. महिला गटाची उपविजेती ठाण्याची काव्या भट १७ वर्षाखालील मुलींच्या गटातही उपविजेती राहिली तर मुंबई उपनगरची वेदिका जैस्वाल ही मुलींच्या ११ आणि १३ या दोन्ही वयोगटात उपविजयी राहिली. शेवटच्या…

Read More

टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शांतीसुत पी.टी.पाटील सेवानिवृत्त साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शांतीसुत म्हणून परिचित असलेले प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) ३३ वर्ष १ महिना २८ दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयाच्या ५८ व्यावर्षी नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा मुलगा स्वप्नील पाटील (आयटी इंजिनिअर, पुणे) यांनी स्वखर्चाने वडिलांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या १७० विद्यार्थ्यांसाठी उजळणीचे पुस्तके तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची डिक्शनरी असे १९८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून राजगिऱ्याचे लाडूचे वाटप केले. तसेच शाळेतील स्वयंपाकी आशा कोळी व मदतनीस श्रीमती लताबाई तायडे यांना भेटवस्तू म्हणून साडी वाटप केले. अध्यक्षस्थानी शालेय…

Read More

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षात अनेक इच्छूक साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी पितृपक्ष आटोपल्यानंतर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आपआपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी खलबते सुरु झाली आहेत. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षात अनेक इच्छूक आहेत. काही इच्छुकांनी प्राथमिक तयारीही सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्याबाबतीत सांगायचे झाल्यास भाजपाचे चार विद्यमान आमदार आहेत. चार जागा व्यतिरिक्त रावेर-यावलच्या जागेसाठी पक्ष योग्य व तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. तथापि, ज्या चार जागांवर भाजपचे आमदार आहे. त्यात जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव या जागांचा समावेश असून या चारही जागांवर विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी द्यावी, असा प्रवाह पक्षश्रेष्ठींमध्ये आहे. तसा या चारही जागांना कुठलाही धोका नाही.…

Read More

मिडजेट, कॅडेट गटाच्या सामन्यांना गुरुवारी सुरुवात होणार साईमत/जळगाव/न.प्र.: जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित आमदार चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आज १५ व १७ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या सामन्यांना प्रारंभ झाला. ह्या दोन्ही गटातील मानांकित खेळाडूंनी आपापले सामने सहज जिंकत आगेकूच केली आहे. राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल येथे स्पर्धा सुरू आहे. बाद पद्धतीने सामने येथे खेळविण्यात येत आहे. पुण्याच्या नायशा रेवस्कर हिने काल झालेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. आज ती १५ आणि १७ वर्ष वयोगटात देखील आघाडीवर आहे. मुलींच्या दोन्ही गटात तिने सुरेख खेळाचे प्रदर्शन करतांना विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी…

Read More

सेवानिवृत्तीबद्दल शाळेतर्फे निरोप समारंभाचा कार्यक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक तथा शांतीसुत म्हणून परिचित असलेले प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेतर्फे निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मिराबाई पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, मलकापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी नंदकिशोर शिंदे, केंद्रप्रमुख संजय पाटील, विकास वराडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करुन ईशस्तवन, स्वागत गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे स्वागत तथा सत्कार करण्यात आला. टाकरखेडा शाळेचे उपशिक्षक रामेश्वर आहेर यांची बदली झाल्याबद्दल तसेच तळेगाव शाळेचे उपशिक्षक नंदकिशोर शिंदे यांची मलकापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी…

Read More