अनेकांना परतावे लागले रिकाम्या हातांनी, सक्तीच्या वसुलीमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी साईमत/चोपडा/प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्याकरीता आवश्यक स्मार्ट कार्डासाठी दलालांकडून १४०० ते १५०० रूपये सक्तीने वसूल केले जात असल्याने कामगारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरु होते. मात्र, या कामात अनियमितता असल्यामुळे अनेकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले आहे. त्यामुळे कामगार लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सविस्तर असे की, बांधकाम कामगारांना जिल्हा…
Author: Sharad Bhalerao
दोघे कोठडीत, चोपडा तालुक्यातील घटना साईमत/चोपडा/प्रतिनिधी दोन नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अडावद पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुली एकाच गावातील आहेत. संशयितांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात एक विधी संघर्षित १७ वर्षीय बालकाचा समावेश आहे. त्यामुळे त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. दुसऱ्या १९ वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही पीडित मुली ह्या अल्पवयीन…
तीन दिवसानंतर मृत्यूशी झुंज देत प्राणज्योत मालवली साईमत/चोपडा/प्रतिनिधी तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सविताबाई संजीव शिरसाठ यांचा ५ ऑक्टोबर रोजी रात्री १०:२५ वाजता अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचे वृत्त गावभर पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सविताबाई शिरसाठ ह्या सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जायला निघाल्या होत्या. तेव्हा नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्या अंतरावरील जत्रा हॉटेल जवळील हायवे रस्त्यावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली. नाका, तोंड, कानातून अति रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ लोकमान्य हाॅस्पीटलला उपचारार्थ दाखल केले…
शिवाजी चौकात दसऱ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व मेहतर समाज समितीतर्फे नवरात्रीनिमित्त पहाटे चार ते सहा या वेळेत पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिर ते पिंप्राळ्यातील शिवाजी चौक येथे दसऱ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांकडून निर्माल्य तसेच रस्त्यावर कचरा फेकण्यात येत असल्याने रस्त्यावर अस्वच्छता पसरल्याने नवरात्री उत्सवात मंदिर परिसरात तसेच रस्त्यावर कचरा असल्याने येताना-जातांना कचरा पडलेला असतांना परिसरात स्वच्छता असली पाहिजे व माणुसकीच्या नात्याने आपण दररोज निस्वार्थीपणे सामाजिक बांधिलकी जोपासुन सेवा केली पाहिजे, या हेतुने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. असे कर्मचारी घेताहेत परिश्रम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व मेहतर समाज समितीतर्फे…
सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला सुरुवात तालुका वार्तापत्र/मुराद पटेल/चाळीसगाव आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणाला आतापासून सुरुवात होऊन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र सद्यस्थितीला चाळीसगाव तालुक्यात दिसत आहे. अशातच त्यामुळे सोशल मीडियावर भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व इतर पक्ष कार्यकर्ते यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा भाजपाकडून आ.मंगेशदादा चव्हाण हेच उमेदवार असतील. मात्र, त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार उन्मेषदादा पाटील प्रयत्नशील आहेत. ते नुकतेच उद्धव ठाकरे यांना मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन भेटूनही आले. त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले…
जलपर्यटनातून दहा हजार जणांनी अनुभवला हर्षोल्लास सुरेश उज्जैनवाल राज्याच्या पर्यटन विकास विभागातर्फे सध्य जळगाव शहरातील मेहरुण तलावावर सुरु असलेला ‘ॲक्वा फेस्ट’ जलपर्यटन महोत्सव एक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करणारा आणि लोकांना विशेषत: युवक, अबालवृद्ध, दिव्यांग अशा सर्वच घटकांना निखळ आनंदाची अनुभूती करुन देणारा ठरत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी कोणतीही पूर्व घोषणा किंवा फारसा गाजावाजा न करता राज्यातील पहिलाच ‘ॲक्वा फेस्ट’ जलपर्यटन महोत्सव व तोही जळगावमधून प्रारंभ करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या जलपर्यटन महोत्सवातंर्गंत मेहरुण तलावाच्या जलाशयात प्रत्यक्ष बोटींगचा आनंद गेल्या चार दिवसात तब्बल दहा हजार जणांनी घेतला. हर्षोल्हासाचा हा महोत्सव आनंदाची निर्मिती करण्यासह मंत्री महाजन यांच्या धडाडीची ही…
कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या ‘विजय’ ने खेचली विजयश्री साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी पहुरच्या मातीत शनिवारी, ५ ऑक्टोंबर रोजी कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. त्यात वाशिमच्या विजय शिंदे या मल्लाने विजयश्री खेचून आणत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कुस्त्यांच्या दंगलीतून हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. ख्वाजा नगरात मरहुम हाजी जमील खान आखाडा व बजरंग दल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कुस्ती स्पर्धेत वाशिम येथील विजय शिंदे या पैलवानाने ११ हजार १११ रुपयांची अंतीम कुस्ती जिंकली. त्याने जालना येथील जगदीश राजपूत याला काही क्षणातच धूळ चारली. पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्त्यांच्या दंगलीचा आनंद घेतला. उद्घाटन चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते झाले. यांची होती उपस्थिती यावेळी…
सोयगाव तालुक्यातील शेतकरी सापडले अडचणीत साईमत/सोयगाव/प्रतिनिधी: रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्यावतीने फळबाग, गाय गोठा, सिंचन विहीर या योजना राबविल्या जातात. फळबाग लागवडीसाठी सात लाख विहीर व गाय गोठा योजनेसाठी अनुक्रमे दोन व चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु योजनेचे प्रस्ताव मंजूर होऊन अनेक दिवस होऊनही त्याचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकरी वंचित राहिले असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. फळबाग लागवडीसाठी सात लाख रुपयापर्यंत तर विहीर आणि गाय गोठा योजनेसाठी अनुक्रमे दोन लाख व चार लाख रुपये शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. गाय गोठा व विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी…
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ५५ दिवस उलटूनही ठोस निर्णयाला बगल साईमत/मलकापूर/प्रतिनिधी ५५ दिवस उलटूनही उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जमातीच्या प्रमाणपत्राबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने नळगंगा धरणात शनिवारी जमातीच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. जलसमाधी आंदोलनासाठी सकाळी लवकरच गणेश इंगळे धरणावर पोहोचले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. यावेळी आदिवासी कोळी महादेव जमातीचा प्रचंड जनसमुदाय नळगंगा धरणाच्या पात्राजवळ हजर होता. पोलिसांनी गणेश इंगळे यांना ताब्यात घेतले तरी मात्र गंगाधर तायडे यांच्या नेतृत्वात एक गट पोलिसांना हुलकावणी देऊन धरणाच्या मुख्य फाटकापर्यंत पोहोचला. त्यांनी धरणात उड्या घेतल्या. नदीपात्रात अगोदरच SDRFचे कर्मचारी जीवनरक्षक बोटसह उपस्थित होते. त्यांनी लगेच…
गटविकास अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची संघटनेची मागणी साईमत/यावल/प्रतिनिधी येथील पंचायत समिती समोर गेल्या दोन दिवसांपासून ‘निळे निशान संघटनेचे’ विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू होते. परंतु शुक्रवारी, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व संबंधित अधिकारी यांच्याशी झालेली चर्चा निष्पळ ठरल्याने संघटनेने आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आता यावल पंचायत समिती सहसंबंधित अधिकाऱ्यांची डोकेदुखी सुरू झाल्याने शेवटी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण यावल, रावेर तालुक्याचे लक्ष लागून आहे. यावल तालुक्यातील अनु.जाती-जमातीच्या लोकांचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून अनु.जाती-जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता शनिवारी,…