Author: Sharad Bhalerao

मुक्ताईनगरातील सकल मुस्लिम समाजाची तहसिलदारांकडे मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी यति नरसिंहानंद यांनी प्रेषित हजरत मोहम्मंद (स.) यांचा असहनीय आणि लज्जास्पद शब्द वापरुन अपमान केला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा कृत्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा आशयाचे निवेदन सकल मुस्लिम समाजातर्फे तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना नुकतेच दिले आहे. निवेदन देतेवेळी मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, शकील खाटीक, अफसर खान, शकुर जमादार, कलीम मनियार, रिजवान चौधरी, समद खाटीक, बशीर काजी, अहमद ठेकेदार, हाजीलाल खाॅ, हाशम शाह, जमील बेपारी, खालील खाटीक, शकील मेकॅनिकल,…

Read More

यावल तहसीलवर धडकला भव्य मोर्चा साईमत/यावल/प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ‘निळे निशाण संघटनेचे’ संस्थापक-अध्यक्ष यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावल्याने संघटनेच्या शेकडो संतप्त कार्यकर्त्यांचा मंगळवारी, ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला होता.शासन-प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करून शासकीय कामात आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून शासन-प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनु. जाती-जमातीच्या अनेकांना आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवून जातीय द्वेष भावनेने मानसिक त्रास देऊन अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांनी कुठल्या विषयांवर शासन – प्रशासनाची दिशाभूल…

Read More

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या चौघांवर काळाचा घाला, यावल-चोपडा रस्त्यावरील घटना साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी व भंडारा देण्यासाठी तिघांवर काळाने घाला घातला आहे. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, ८ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सविस्तर असे की, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीनिमित्त दरवर्षी भंडारा देतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी, ८ ऑक्टोंबरला सकाळी वाणी कुटुंबातील…

Read More

मानाची पैठणी मनीषा मोरे यांनी जिंकली साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम पिलखोड येथे रंगला होता. यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सुरक्षित बहिणी कशा होतील, यासाठी उमंग सृष्टी परिवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका-अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. त्यात मनीषा मोरे यांनी ‘मानाची पैठणी’ जिंकली. तालुक्यातील पिलखोड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सन्मान कर्तुत्वाचा खेळ…

Read More

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई साईमत/चोपडा/प्रतिनिधी तालुक्यातील मालपूर शिवारात रुमाल्या चेचऱ्या पावरा (रा. डेडियापाडा, ता. चोपडा) हा कसत असलेल्या नवाड शेत जमीन कम्पार्टमेंट नंबर २११ मध्ये प्रतिबंधित असलेला मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणारा ७५० किलो वजनाचा ४५ लाख रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे, वनस्पतीच्या झाडांची स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करत होता. त्याठिकाणी पोलीस आल्याचे पाहून आरोपी रुमाल्या चेचऱ्या पावरा हा तेथून पसार झाला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहे.

Read More

भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली मागणी साईमत/रावेर/प्रतिनिधी रावेरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन हे एक सेवाभावी आणि भाजपचे निष्ठावंत कायकर्ते आहेत. तेव्हा रावेर विधानसभेची उमेदवारी त्यांना देण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी करावा, अशी मागणीवजा अपेक्षा रावेर तालुक्यातील महाजन समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे. श्री. महाजन यांच्यावर रा.स्व.संघाचे संस्कार असून त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहे. राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्यापूर्वी ते तब्बल दहा वर्षे माळी समाजाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत सर्वाधिक ७६ सामूहिक विवाह लावण्यात आले. सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी भाजप पक्ष संघटन मजबूत केले. परिणामी ते नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना रावेरचे…

Read More

रा.काँ.त कार्यकर्त्यांच्या प्रवेशाप्रसंगी आ.एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष आहे. संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष आहे. अशा पक्षात सर्व जातीधर्म, गरजूंना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केले. बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी, करंजी गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

विद्यमान सरपंच पतीने काढता पाय घेतला साईमत/भुसावळ/प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथून जवळील कुऱ्हा पानाचे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संतप्त ग्रामस्थांसह युवकांनी एकत्रित येत सोमवारी, ७ रोजी ‘दांगडो’ केला होता. त्यामुळे विद्यमान सरपंच पती यांनी काढता पाय घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबतचा व्हिडीओ कुऱ्हा गावात अनेकांच्या मोबाईलवर दिसत आहे. दरम्यान, सरपंच यांच्यासह काही सदस्य रिकामे राजकारण करत आहे. त्यामुळे त्यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी प्रमुख मागणी सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत चर्चेत आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनावर निवेदने दिली जात आहेत. गावात ग्रामपंचायत सदस्यांची ‘आधे इधर आधे उधर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे की काय? गावाचा…

Read More

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमांप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी मराठी भाषा मुळातच अभिजात भाषा आहे. आता राजमान्यता मिळाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मराठी भाषेबरोबर इतर भाषांचेही ज्ञान मिळविले पाहिजे. जगात इतर भाषांमध्ये जेजे चांगलं साहित्य आहे. ते आपल्या मराठी भाषेत आणले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर यांनी केले. माय मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाला. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. त्यानिमित्त साहित्यिक, रसिक व मराठी भाषाप्रेमींना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’तर्फे भगीरथ इंग्लिश स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ…

Read More

वरखेडला शेतकऱ्यांच्या आयोजित सत्काराप्रसंगी इंजि.कोमल तायडे यांचे प्रतिपादन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी परिसरातील इतर शेतकऱ्यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन प्रगती साध्य करावी, पुरस्कार मिळवावेत व असेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच पेरणीच्या वेळेआधी बियाणे महोत्सव घेण्याची इच्छा व्यक्त करत अशा कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन आर्थिक प्रगती साधावी. कुटुंबाचा, गावाचा मान वाढवावा व विविध पुरस्कारांना गवसणी घालावी, असे प्रतिपादन आयोजकांतर्फे एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या संचालिका इंजिनियर कोमल तायडे यांनी केले. सत्कारमूर्तींचा गुणगौरव करतांना त्यांनी शेतीत केलेल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून समस्त पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सपत्नीक निवृत्ती पाटील-तायडे, सौ.तायडे, सचिन तायडे, इंजि. कोमल तायडे यांनी शाल, श्रीफळ, साडी-चोळीसह सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. वरखेडचे माजी सरपंच…

Read More