Author: Sharad Bhalerao

रंगमंचावरून घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांना चटका लावणारी ठरली जामनेर शहरात नाट्य चळवळीचा पाया रोवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे, सध्या महाराष्ट्रभर विविध शासकीय योजनेचा प्रचार, प्रसार पथनाट्याच्या माध्यमातून करत समाज प्रबोधन करणारे पथनाट्य सम्राट सर्वांचे परिचित असे संतोष सुभाष सराफ यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी जामनेरातील वाकी रस्त्यावर घरी जात असतांना एका डंपरच्या धडकेत अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खडके हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार सुरु होता. मात्र, जखमेमधील इन्फेक्शन वाढत असल्यामुळे त्यांना गिरीषभाऊ महाजन यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ॲडमिट केले होते. तेथे त्यांच्यावर पुढील उपचार सुरु होता. मात्र, दोन महिन्यांपासून सतत मृत्यूची…

Read More

सत्य परिस्थितीशी झुंज देणारा “ढुण्या” लघुचित्रपटाची स्क्रिनिंगसाठी निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी आदिवासी समाजातील रहिवाशी असणाऱ्या सत्य परिस्थितीशी झुंज देणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा जीवन संघर्षमय दाखविल्याने “ढुण्या” लघुपटाची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयमध्ये स्क्रिनिंगसाठी दखल घेतल्याने निवड झाली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयमध्ये निवड होऊन “ढुण्या” चित्रपटाची स्क्रिनिंग होणार आहे. त्यासाठी जळगावचे कलावंत प्रकाश गजाकुश कुटुंबीय गोव्यातील फिल्म फेस्टिव्हल महोत्सवात सहभागी होणार आहे. अनेक गोष्टी तडजोड होत असल्याने एक नवीन काहीतरी उपक्रम करायचा म्हणून जळगाव शहरातील काही तरुण पिढीने कलात्मक गोष्टी करून लघुपट बनवायचे ठरविल्याने जळगावचा डंका फिल्मी दुनियेत वाजु लागला आहे. जळगाव शहरातील युवा अभिनेता, दिग्दर्शक प्रेम बडगुजर “ढुण्या” मराठी लघुपटाचे उदाहरण आहे. सत्य…

Read More

सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन अद्यापही अदा न झाल्याने नवरात्र, दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणांवर विरजण पडले आहे. परिणामी शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा अधिक शिक्षक ऑक्टोबर महिन्याची १५ तारीख उलटून गेल्यावरही सप्टेंबरच्या वेतनापासून वंचित आहेत. वेतनासाठी वेतन पथक कार्यालयात वारंवार संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याबाबत संबंधित वेतन पथक कार्यालयांचे पत्र निर्गमित केले आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यासाठी मात्र सप्टेंबरचे वेतनासाठी अत्यावश्यक २२ कोटी रुपयांची तरतूद अद्यापही न झाल्याने आज अखेरही वेतन…

Read More

२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल   साईमत/नवी दिल्ली/विशेष प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी विधानसभा निवडणूक केव्हा घोषित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तारख्यांची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उमेदवारांना २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. २९ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाईल. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छानणी होईल आणि ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी…

Read More

महाविद्यालयाचा आलेख असाच चढता राहील साईमत/फैजपूर/प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयाला जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित अव्यवसायिक महाविद्यालय गटातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर झाला आहे. यानिमित्त संस्थाध्यक्ष शिरीष चौधरी, व्यवस्थापन व नियामक मंडळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांनी पुरस्काराचे श्रेय स्थापनेपासून आजतागायत महाविद्यालयाच्या जडणघडणीत मौल्यवान भूमिका पार पाडणाऱ्या सर्व व्यवस्थापन, प्रशासन, प्राध्यापक, माजी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्टेक होल्डर्स यांना दिले आहे. महाविद्यालयाचा आलेख असाच चढता राहील, असा आशावादही व्यक्त केला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे.…

Read More

आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी विकास कामात आ.चंद्रकांत पाटील यांनी एखादा मोठा पूल करून दाखवावा, मी त्यांचा जाहीर सत्कार करेल, अशी घोषणा यापूर्वी आ. एकनाथराव खडसे यांनी केली होती. त्यांचे राजकीय आव्हान स्वीकारत मुंढोळदे (खडकाचे) ता.मुक्ताईनगर ते सुलवाडी, ता. रावेर या दरम्यान तापी नदीवर पूल उभारण्याचा मुद्दा आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला होता. ४ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. १२ ऑक्टोबर रोजी पुलासाठी ९७ कोटी ५९ लाख ११ हजार रुपये खर्चाची वर्क ऑर्डर निघाली आहे. त्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे आणि रावेर तालुक्यातील सुलवाडी…

Read More

धरणाच्या जलपूजनप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिपादन साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी शेळगाव धरणाच्या निर्मितीत अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. त्यामुळे यावल तालुका हा खऱ्या अर्थाने सुजलाम्‌-सुफलाम्‌ होणार आहे, असे प्रतिपादन आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले. ते धरणाच्या जलपूजन केल्यानंतर बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रमेश चौधरी, श्रीराम पाटील, प्रभाकर सोनवणे, लिलाधर चौधरी, अतुल पाटील, इंजिनिअर प्रकाश पाटील, जनाबाई महाजन, शेखर पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद‌ बोंडे, जगदीश कवडीवाले, अनिल महाजन, चंद्रकला इंगळे, प्रभाकर झोपे, शरद कोठी, डॉ.सुरेश पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, मुकेश येवले, हरिश गणवाणी, गोंडू महाजन, आत्माराम शंकोपाळ, सतिष पाटील, हयात शेठ, जावेद जनाब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अनेक मान्यवरांनी…

Read More

घटनास्थळी महसूल विभागाने केला पंचनामा साईमत/सोयगाव/प्रतिनिधी तालुक्यातील जरंडी मंडळात रविवारी रात्री साडे अकरा वाजता तुफान पावसाने सुरुवात केली. तब्बल ७० मिनिटांच्या मुसळधार पावसाने जरंडी मंडळात ६७ मी.मी.पाऊस झाला. घोसला शिवारात गट क्र-७४ मधील शेतात शेडवर गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून रात्री साडे अकरा वाजता त्याचा जागीच मृत्यू झाला. युवराज पूना गव्हांडे (वय ५५) असे वीज कोसळून ठार झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव आहे. घोसला शिवारातील गट क्र-७४ मध्ये रात्री नऊ वाजता जेवण करून शेडमध्ये झोपायला गेल्यावर रात्री झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी महसूल विभागाने पंचनामा केला आहे. गोंदेगावसह बनोटी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्व…

Read More

जामनेरातील पत्रकार परिषदेत दिलीप खोडपे सर यांनी उपस्थित केला प्रश्न साईमत/जामनेर/प्रतिनिधी शहरासह तालुक्यात ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नामुळे महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत. पुतळे उभारणे ही चांगली गोष्ट असली तरी स्व स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जाहीर होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी घाईगडबडीत महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याने कामाचा दर्जा चांगला कसा असू शकतो. त्याचा विसर मंत्री ना. महाजन यांना पडला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर विधानसभेचे संभाव्य उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. महापुरुषांचे पुतळे उभारणे चांगली गोष्ट, पण घाई का…? असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा रस्त्यालगतच्या बोहरा मंगल कार्यालयात…

Read More

निष्ठावंत शिवसैनिकांसाठी काढली दसऱ्यानिमित्त रांगोळी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावर असलेली निष्ठा, श्रद्धा हीच आहे की, ठाकरे परिवार हाच आपला पक्ष…ठाकरे परिवार हीच आपली निशाणी…. हाच संदेश ‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला आहे. आज अन्‌ उद्याही शेवटपर्यंत आम्ही ठाकरे परिवारासोबत आहोत, असे रांगोळीतून दर्शविण्याचे काम चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई किशोर कुमावत यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमातून हा संदेश सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना दसऱ्यानिमित्त रांगोळीतून ‘मशाल’ चिन्ह सर्व मतदारांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम आणि संदेश चिन्ह काढून दर्शविला आहे. ‘मशाल’ चिन्ह कॉलनीतील सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सविताताईंनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More