Author: Sharad Bhalerao

जामनेरातील गुरूदेव सेवा आश्रमचे श्याम चैतन्य महाराज यांच्या उपक्रमाचे कौतुक साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्ट चैतन्य धामचे संस्थापक श्याम चैतन्य बापुजी महाराज यांच्या विचार संकल्पनेतून काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातपुड्याच्या कुशीतील एका आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील लहान थोरांसोबत राहून दिवाळीचा आनंद घेतला. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा विजयाचे आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. आज शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात नवचैतन्य व आनंद निर्माण करणारा दिवाळीचा सण आहे. मात्र, आजही डोंगर, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव व त्यांचा परिवार या सणापासून कोसो दूर आहे. या परिवारांच्या आयुष्यात दिवाळी हा सण नावापुरताच आहे. जामनेर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे…

Read More

सावदा पोलीस स्टेशनतर्फे एपीआय विशाल पाटील यांनी केले आवाहन साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी शाळांसह सरकारी कार्यालयांना दिवाळीनिमित्त सुट्टी लागली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंब हे दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी किंवा नातेवाईकांकडे जातात. त्यावेळी त्यांच्याकडील मुल्यवान वस्तु, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने हे बंद घरात न ठेवता त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा सोबत घेवून जावे. कारण आपल्या मौल्यवान वस्तुंच्या सुरक्षिततेसाठी घर बंद करुन बाहेरगावी जात असल्यास त्याबाबत आपल्या आजूबाजूला राहत असलेल्या किंवा पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. गल्लीतील बहुतांश कुटुंब हे सुट्टीवर जात असल्यास त्यांनी काही दिवसांकरीता गल्लीत रात्रीच्या गस्तीसाठी गुरखा नेमावा आणि त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला कळवुन तेथे रात्रीची गस्त करण्याची मागणी…

Read More

लखनऊत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान साईमत/धरणगाव/प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दि अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, धरणगाव बँकेला उत्कृष्ट सायबर सिक्युरिटी प्रणालीबाबत बँकिंग फ्रंटीयर्स यांच्याकडून दिला जाणारा ‘बेस्ट सायबर सेक्युरिटी’ पुरस्कार लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.देशभरातून सहकारी बँकांनी पुरस्कारासाठी नामांकन दाखल केले होते. त्यात दी अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, धरणगाव बँकेची निवड दोनशे रुपये कोटी ठेवींच्या वर्गवारीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी करण्यात आली. पुरस्काराचे संपूर्ण श्रेय बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांचे असल्याची भावना बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे यांनी व्यक्त केली. बँकेस यापूर्वीही अविज पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा ‘बँक ब्लू रिबन’ पुरस्कार…

Read More

२५ प्रश्न असलेली ५० गुणांची घेतली लेखी परीक्षा, निवडणूक प्रक्रियेचे स्क्रीनवर सादरीकरण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यासाठी १७ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात २२ ऑक्टोंबरपासून अर्ज दाखल करावयाचे कामकाज सुरू झालेले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचा प्रथम प्रशिक्षण वर्ग २७ ऑक्टोबर रोजी भडगाव रस्त्यालगतच्या वैभव मंगल कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रथमेश मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. हा प्रशिक्षण वर्ग सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते ६…

Read More

गद्दार आमदारांनी पक्ष, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला : आदित्य ठाकरे गद्दारी लचारीचा कलंक पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : वैशाली सूर्यवंशी साईमत/पाचोरा/प्रतिनिधी पाचोरा – भडगाव मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे उमेदवारी घोषित झालेल्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शुक्रवारी, २५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्याकडे अर्ज दाखल केला. राज्यातील महायुती आणि महा विकास आघाडीतील राजकिय संघर्ष पाहता आणि कोणत्याही परिस्थितीत आ.किशोर पाटील यांना पराभूत करण्यासाठी उबाठा शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्जासाठी उबाठा सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, गुलाबराव वाघ, पाचोरा संपर्क प्रमुख सुनील पाटील, महिला पदाधिकारी उबाठा सेनेचे जिल्ह्यातील प्रमुख…

Read More

गुलाबाईनिमित्त एकत्रित आल्यानंतर महिलांचा आनंद द्विगुणित साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील कल्याणी नगरमधील महिलांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुलाबाई महोत्सव आनंदात साजरा केला. सर्व महिलांसाठी ही एक पर्वणीच होती. ह्या महिला अलका पितृभक्त यांच्याकडे जमल्या. सुरुवातीला गुलाबाईचे गाणे म्हटले. ‘पहिली ग गुलाबाई’, ‘सा बाई सू’, ‘येथून राळा पेरत जाऊ’, ‘आरडी एवढं परडी ग’… अशी विविध गाणी टिपरीच्या आणि टाळ्यांच्या तालावर नृत्यासह सादर केले. महिलांना असे वाटत होते की, खरोखर आपण अगदी लहान असताना गुलाबाईचा जो आनंद होता तसाच आनंद उपभोगला. यावेळी स्पर्धेचेही आयोजन केले होते. त्यात प्रथम द्वितीय तेजुकडे यांनी बक्षीस मिळवले. नंतर चिठ्ठ्यांचा खेळ घेण्यात आला. चिठ्ठीत जे लिहिले असेल ते कृती करणे, यात…

Read More

जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी येथून जवळील पिंपळगाव कमानी (तांडा) येथील नवयुवक तरुण संकेत तुकाराम चव्हाण याची देशाच्या संरक्षणासाठी ‘अग्नीवीर’ पदावर आणि ईश्वर गणेश राठोड याची महाराष्ट्र गृहरक्षक दल (होमगार्ड) पदी निवड झाल्याबद्दल जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मंदिर सभागृहात सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक-बाबुराव चव्हाण, भवरलाल चव्हाण, जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक चव्हाण, पोलीस पाटील तथा संस्थेचे उपाध्यक्ष इंदल चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद चव्हाण, उपसरपंच तथा संस्थेचे संचालक संदीप राठोड, ग्रामपंचायत सदस्य कैलास चव्हाण, संस्थेचे संचालक गणेश राठोड, तुकाराम चव्हाण, गोकुळ राठोड आदी…

Read More

गारखेडा खुर्दतील कार्यक्रमात रामायणातील विविध दाखले देत उपस्थितांचे केले प्रबोधन साईमत/जामनेर/प्रतिनिधी शबरी मातेला गुरूंनी सांगितले की, एक दिवस श्रीरामचंद्र भगवान तुला दर्शन देतील आणि तू धन्य होशील. हा शब्द शबरी मातेने आयुष्यभर पाळला. शबरी माता भिल्ल समाजाची असूनही भगवंतावर तिची निष्ठा होती. तिच्या अतूट निष्ठेमुळे श्रीराम प्रभूंनी शबरी मातेला दर्शन दिले. शबरी मातेने चाखून दिलेली उष्टी बोरेही ग्रहण केली. असा रामायणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंवर असलेली श्रद्धा आणि निष्ठा त्यांनी दिलेला शब्द, वचन यांचे तंतोतंत पालन करणाऱ्यांना भगवंताचे दर्शन होते, असे प्रबोधनात्मक प्रतिपादन श्याम चैतन्य महाराज यांनी केले. जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथे बुधवारी कोजागिरी पौर्णिमा तसेच शबरी माता…

Read More

अडीच महिन्यानंतर केलेल्या प्रयत्नांना मिळाले यश साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील नवीन बसस्थानकावरून गेल्या २२ जुलै २०२४ रोजी ओम संजय पाटील या युवकाचा सॅमसंग गॅलक्सी ‘एस२३एफई’ हा मोबाईल बसमध्ये चढत असतांना चोरीस गेला होता. त्यानंतर त्याने लागलीच जळगाव पोलीस स्टेशन तसेच ऑनलाईनचे ‘सीईआयआर’ पोर्टलवर संबंधित मोबाईल गहाळ झाल्याची तक्रारही नोंदविली होती. शेवटचे लोकेशन नाशिक येथे येत असूनही तसे पोलिसांना कळवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि दोन महिने होऊनही कोणताही तपास किंवा तशी पुढे कार्यवाही पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी केलेली नव्हती. अखेर जळगावातील ॲड. ऐश्वर्या पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे चोरीस गेलेला मोबाईल युवकाला मिळाला आहे. संबंधित मोबाईल ट्रेस झाल्याचे मेसेज वारंवार ओमला येत…

Read More

रंगमंचावरून घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांना ठरली चटका लावणारी साईमत/जामनेर/प्रतिनिधी कायम आयुष्यात पॉझिटिव्ह राहणारा… मनोरंजनाचा निखळ झरा…खळखळ हसविणारा ‘नटसम्राट’ संतोष सराफ रंगमंचावर अर्धा डाव सोडून गेला. त्याची चटका लावणारी ‘एक्झिट’ कायम जामनेरकरांच्या स्मरणात राहणार आहे. जवळपास त्यांनी दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नियतीने डाव साधला. मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल उपचार सुरु असतांनाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ही बातमी जामनेरात धडकताच अनेकांचे ह्दय पिळवटून गेले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांचे अश्रूही अनावर झाले होते. एका चांगल्या कलावंताला जामनेरकर मुकले असल्याची खदखद अनेकांनी व्यक्त केली. शहरातील गजबजलेल्या वाकी रस्त्यावरील ‘माऊली किराणा’ जवळ गेल्या २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजेच्या…

Read More