Author: Sharad Bhalerao

चाळीसगावला विधानसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले. गेली दीड-दोन महिने प्रत्येक उमेदवार निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता. निवडणुकीचा निकाल शनिवारी, २३ तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे, वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे, थोडी विश्रांती करण्याला प्राधान्य दिलेले दिसून आले. मात्र, चाळीसगावाचे विद्यमान आमदार तथा भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण त्याला अपवाद ठरले आहे. मतदानानंतर दोन दिवस मिळालेल्या उसंतीचा उपयोग त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत आपले वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित केले. सहकाऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघ सोडून ‘अमरावती’ गाठले आहे. आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात…

Read More

समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी आजारपणातही मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. सकाळपासून जामनेर मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अशातच ‘माणुसकी ग्रुपचे’ जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर हे आजारपणामुळे आपल्या मुलीसोबत जामनेरातील खासगी दवाखान्यात ॲडमिट होते. त्यांनी चक्क मतदान करण्यासाठी जामनेर येथील डॉक्टरांना विनंती करून त्यांना लावलेली सलाईन थांबवून थेट पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावला. त्यामुळे निश्चित अशा तरुणाचा उत्साह पाहून इतर मतदारांनीही जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी मतदान करुन त्यांनी राष्ट्रीय हक्क…

Read More

मतदानासाठी ३४४ केंद्रांची उभारणी, मतदान यंत्राचे वाटप साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात बुधवारी, २० रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशसानातर्फे जय्यती तयारी केली आहे. मतदानासाठी शहरी भागात ७५, ग्रामीण भागात २६९ अशा ३४४ मतदान केंद्राची स्थापन केली आहे तर मतदानासाठी ४४७ व्हीव्हीपॅट मतदान यंत्र केंद्रावर १८ रोजी रवाना केल्याची माहिती पत्रपरिषदेत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. नवीन प्रशासकीय इमारतीत १८ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास आधिकारी नंदकुमार वाळेकर, मुख्याधिकारी कौस्तुभ जोशी, नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले म्हणाले की, या निवडणुकीत ११ आदर्श मतदान केंद्र…

Read More

३२२ मतदान केंद्रांचा समावेश, साहित्य वाटपसाठी २२ टेबल साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी १९ रोजी एस.एम.कॉलेज येथून ३२२ मतदान केंद्रासाठी निवडणूक निरीक्षक स्मिताक्षी बरूवा यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप केले. साहित्य वाटप करण्यासाठी २२ टेबलचे नियोजन केले होते. सकाळी आठ वाजता ऑर्डर फॅक्टरी, वरणगावचे डीजीएम सूक्ष्मनिरीक्षक ए.के.सिंग यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरातील एस.एम.कॉलेज येथील स्ट्राँग रूम उघडण्यात आली. पोलिंग टीम मतदान केंद्रावर एस.एम.कॉलेज येथून सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत नेमून दिलेल्या मतदान केंद्र ठिकाणी रवाना झाल्या आहेत. पोलिंग पार्टी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सुस्थितीत पोहोचल्या आहे की नाही, यासाठी ३१ क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली आहे.…

Read More

दोन लाख ८० हजाराचा निधी प्राप्त, दोन संशोधन उपकरणे घेण्यास मान्यता साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस, एस.एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. जामतसिंग दरबारसिंग राजपूत यांना महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून २०२४-२०२६ या काळाकरिता संशोधन प्रकल्प मंजूर केला आहे. त्यासाठी दोन लाख ८० हजार एवढा निधी प्राप्त झालेला आहे. आहे. या निधीत दोन संशोधन उपकरणे घेण्यास मान्यता आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘गोमूत्रावर आधारित कीटकनाशकांच्या फॉर्म्युलेशनचा अभ्यास आणि त्यांच्या सहक्रियात्मक प्रभावाचा अभ्यास’ असा असणार आहे. डॉ.राजपूत यांनी निधीसाठी तीन वेळा प्रयत्न केले होते. त्याआधी डॉ.राजपूत यांचा दोन लाख निधीचा…

Read More

नऊ खेळाडूंनी पाच गोल्ड, तीन सिल्व्हर, एक ब्रॉन्झ पदक केले प्राप्त साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट अकॅडमीने द्वितीय क्रमांक प्राप्त करून पाच खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जळगाव येथील अनुभती सेकंडरी स्कूल येथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या ९ खेळाडूंनी सहभाग नोंदवून पाच गोल्ड, तीन सिल्व्हर व एक ब्रॉन्झ पदक प्राप्त केले. अंकिता उबाळे, मोहिनी राऊत, दिशा रणसिंग, काव्या साखरे, अभिमन्यू घोंगडे या खेळाडूंची २० ते २२ नोव्हेंबर…

Read More

बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शेंदुर्णी येथील गोपाला जिनिंग -प्रेसिंग आवारात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सिसीआय) च्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन व ट्रॅक्टरचे पूजन करुन करण्यात आले.शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या हमीभावाने (एमएसपी) कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येईल. याप्रसंगी सभापती अशोक भोईटे, सिसीआयच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाप्रबंधक श्री.दडमल, संजय गरुड, सुभाष पाटील, अशोक जैन, गोविंद अग्रवाल, कापूस उत्पादक शेतकरी गोकुळ चव्हाण, केंद्रप्रमुख के.पी.मीना, बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, राजेंद्र बिऱ्हाडे, नितीन व निलेश अग्रवाल, किरण बारी आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी…

Read More

माणुसकी रुग्णसेवा समूह, छ.शाहू महाराज संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी येथे माणुसकी रुग्णसेवा समूह, छत्रपती शाहू महाराज संस्थेतर्फे गरजुंसाठी घेण्यात आलेल्या फॅमिली हेल्थ कार्ड सभासद नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा २५० सभासदांनी लाभ घेतला. फॅमिली हेल्थ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलात २० ते ५० टक्क्यांपर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे. त्यात ओपीडी, सोनोग्राफी, रक्त तपासणी, अतीदक्षता उपचार यांचा समावेश असणार आहे. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चौधरी, समाजसेवक गजानन क्षीरसागर, आ.आ.पटेल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरुड, छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस.आर.के, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.केयूर चौधरी, कडू…

Read More

रॅलीत तहसिलदारांसह शिक्षक, शंभर सायकलस्वार विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/भुसावळ/प्रतिनिधी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी मतदार जागरूकता व सहभाग अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. ही रॅली सायकलवर मतदार जनजागृतीचे फलक लावून भुसावळ शहराच्या गल्लीबोळातून काढण्यात आली. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सायकल रॅलीचा शुभारंभ महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वीप सहाय्यक अधिकारी राहूल पाटील, स्वीप सहाय्यक अधिकारी प्रमोद आठवले, स्वीपचे युथ आयकॉन शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील,…

Read More

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी शहरासह परिसरात केलेल्या विविध कारवाईदरम्यान दोघांना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिवम कैलास जगताप आणि अभिजीत चव्हाण अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दरम्यान, दोघा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पहिल्या कारवाईत चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस नाईक राहुल पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. कारवाईत चाळीसगाव भडगाव रस्त्यावरील वडाळा वडाळी फाट्यानजीक माऊली हॉटेलजवळ शिवम कैलास जगताप याला गावठी बनावटीच्या पिस्तूल व चार जिवंत काडतुसासह अटक केली. त्याच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

Read More