Author: Sharad Bhalerao

रावेर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ठरली चुरशी, सर्व अंदाज, तर्क-वितर्क मतदारांनी ठरविले फोल सुरेश पाटील, यावल प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह रावेर विधानसभा मतदारसंघात ७० ते ८० टक्के लाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि भावी अपेक्षांमुळे आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाचे, महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा दणदणीत विजयी झाला. तसेच रावेर विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय तथा भक्कम असे उमेदवार धनंजय चौधरी यांनी समयसूचकता बाळगून मतदानाच्या दोन दिवस आधीच आपला राजकीय हात आवरून घेतला होता, अशी चर्चा रावेर विधानसभा क्षेत्रात आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांसह व अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक…

Read More

निवडणूक विश्लेषण पराभवामुळे आठ उमेदवारांची ‘अनामत’ रक्कम आली धोक्यात आबा सूर्यवंशी, पाचोरा (७०५८२९८११६) विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढण्यासाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरले होते. गेल्या २०१९ च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे महायुतीचे सरकार स्थापन होणार असे भकित होते. मात्र, घडलेल्या नाट्यमय घडामोडीत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी राजकीय वैर विसरून भाजपाचे सरकार राज्यात येवू नये म्हणून हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष नांदलेही होते. मात्र, भाजपने आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना…

Read More

संत मुक्ताईला घातले साकडे : वारकरी संप्रदायाचा आग्रह साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची प्रशंसा करत संत मुक्ताईच्या चरणी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचीच निवड व्हावी, असे साकडे घातले आहे. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी आषाढी वारीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि निर्मल वारी मोहिमेत घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कौतुक केले. ह.भ.प रवींद्र हरणे महाराज म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असणारे आणि वारकरी संप्रदायासाठी विशेष संवेदनशील असलेले नेते आहेत. ते तब्बल पाच वेळा मुक्ताईनगर येथे आले. प्रत्येकवेळी संत मुक्ताईच्या चरणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. असे करणे हा त्यांचा साधेपणाचा आणि श्रद्धेचा परिचय…

Read More

पत्रकार परिषदेत जनसेवेचा लढा सुरू ठेवण्याची दिली ग्वाही साईमत/पाचोरा/प्रतिनिधी पाचोरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी सोमवारी, २५ रोजी चार वाजता शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष आणि मतदारांनी केलेल्या सहकार्याचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता मी यापुढेही सदैव जनते सोबत राहणार आहे. राज्यात लागलेला निकाल लोकशाहीचा ‘संकोच’ करणारा आहे. त्यामुळे राज्यात लागलेला निकाल संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे इस्माईल फकिरा, ॲड.अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी, शिवसेनेचे दीपक राजपूत, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, भडगावचे दीपक पाटील, डी.डी.पाटील, महिला आघाडीच्या योजना पाटील, ॲड. आण्णासाहेब भोईटे, सुनील शिंदे उपस्थित…

Read More

गोपूजन करुन पशुगणनेचे उद्घाटन, मान्यवरांची लाभली उपस्थिती साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सामरोद येथून एकविसाव्या पशुगणनेला नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुक्याचे सहाय्यक आयुक्त डॉ.संजय खाचणे होते. यावेळी पं.स.चे माजी सभापती नवलसिंग पाटील यांच्याहस्ते गोपूजन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिल महाजन, प्रगतीशील शेतकरी विकास महाजन, ग्रामपंचायत सदस्य उषा परदेशी,.रूपाली कोळी, रंगनाथ पाटील, गौतम वाघ, संतोष कोळी, प्रवीण पाटील, पोलीस पाटील अनिल कांबळे आदी उपस्थित होते. जामनेर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी पशुगणनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नवलसिंग पाटील, नाचणखेडाचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन पशुगणनेविषयी मार्गदर्शन केले. पशुपालन हा…

Read More

यावल नगरपरिषदेचे होतेय दुर्लक्ष साईमत/यावल/प्रतिनिधी यावल येथे बुरुज चौकापासून बस स्टॅन्डपर्यंत असलेल्या दुभाजकांमध्ये यावल नगर परिषदेने फुलझाडे लावलेली आहेत. परंतु फुलझाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने फुलांची झाडे कोमजण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे फुलझाडे नष्ट होऊ शकतात. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यावल नगरपरिषदेने तात्काळ दुभाजकामधील फुल झाडांना पाणी देण्याची कार्यवाही करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Read More

मंत्रीपदाचा लाभ पूर्ण राज्याला होणार साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी विधानसभा मतदार संघात तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण घवघवीत मतांनी दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहे. त्यामुळे चाळीसगावकरांनी मंगेश चव्हाण यांना राज्यमंत्री मंडळात मंत्री बनवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सर्वात जास्त विकासकामे झाली. नेहमी नागरिकांच्या संपर्कातील आमदार मंगेश चव्हाण यांना बघितले जाते. त्यांना ज्या खात्यात मंत्री पद मिळेल, त्याचा फायदा पूर्ण राज्याला होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Read More

भडगावला समस्त माळी समाजातर्फे तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन साईमत/भडगाव/प्रतिनिधी माजी आ. सतिष भास्कर पाटील आणि नवाज सैय्यद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याबाबत तसेच माळी समाजाबद्दल नको ते अश्लील पोस्ट टाकल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे निवेदन समस्त माळी समाजातर्फे तहसीलदार शितल सोलाट, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना देण्यात आले. दोघांच्या विरोधात कायदेशीर तक्रार असून या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी एकनाथ महाजन, शिवदास महाजन, साहेबराव महाजन, विजय महाजन, मुकुंदा महाजन, भिकन महाजन, विष्णू महाजन, विनोद महाजन, गणेश महाजन, सखाराम महाजन, लक्ष्मण महाजन, अनिल महाजन, गौरव…

Read More

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी देशभर १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. त्यात पुरातन वास्तु, स्थळे, मंदिरे, गड किल्ले, लेण्या अशा अनेक पुरातन वारसांच्याबाबत त्यांचे जतन, साफसफाई व ऐतिहासिक महत्त्व याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगावच्यावतीने २४ नोव्हेंबर रोजी गौताळा अभयारण्यातील अत्यंत पुरातन असलेल्या सीतान्हाणी (पाणपोई) वास्तूची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण वास्तूवर वाढलेले मोठमोठाले गवत, वेली, काटेरी झुडपे काढून तिला मोकळे करण्यात आले. गवत आणि काटेरी झुडपांमध्ये लुप्त होत असलेल्या वास्तूस मोकळा श्वास मिळाला आहे. पुरातन वास्तूला ‘पाणपोई’ असे म्हटले जाते. हेमाडपंथी मंदिरासारख्या आकारात उभ्या…

Read More

पाचोऱ्यातील पुरातन श्रीराम मंदिरात समर्थकांकडून महाआरती साईमत/पाचोरा/प्रतिनिधी पाचोरा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’ मिळवित ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. त्यांच्या कामांचा आलेख पाहता त्यांची नवीन सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी पाचोरा तालुका शिवसेनेचे आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हिवरा नदी काठावरील पुरातन श्रीराम मंदिरात सोमवारी, २५ रोजी सकाळी साडे नऊ वाजता महाआरती करून प्रभू ‘श्रीरामाला’ साकडे घातले आहे. पाचोरा मतदार संघातून दोनदा आमदारकी भूषविलेले महायुतीचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत ९६ हजार ९७७ मते मिळवित सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारत ३८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळविली. त्यांनी मतदार संघात केलेल्या तीन हजार कोटींच्या…

Read More