तृतीय क्रमांकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वंदे मातरम्’ समूह गीतगायन स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पारितोषिकात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम यांचा समावेश होता. स्पर्धेत शहरातील १८ शाळांनी सहभाग नोंदविला होता. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहाने एकसुरात, एकाच लयीत आणि उत्कृष्ट तालबद्धतेने संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे संगीत दिग्दर्शन वरुण नेवे यांनी केले तर वाद्य साथसंगत दर्शन गुजराती यांनी करून सादरीकरण अधिक प्रभावी केले. कार्यक्रमाला आ.राजुमामा भोळे उपस्थित होते.…
Author: Sharad Bhalerao
उपसभापतीपदी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मजूर कामगार फेडरेशनच्या सभापती पदासाठी पुरुषोत्तम चौधरी तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीस सर्व संचालक मंडळाने एकमताने अनुमोदन देऊन सहमती दर्शवली. ही निवडणूक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया बिनविरोध पार पडली. गेल्या वीस वर्षांपासून पुरुषोत्तम चौधरी हे फेडरेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून संचालकांनी एकमुखाने त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली.निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक तथा अधिसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच अजीत पाटील, जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया…
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आयुक्तांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत मनपा प्रशासन अनेक त्रुटींनी भरलेले काम करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच नुकत्याच प्रकाशित केलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने निवडणुका तत्काळ घेऊ नयेत, अशी मागणी पक्षाने केली आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रभाग रचना जाहीर केल्या. त्या प्रभाग रचनेवर अनेक नागरिकांनी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या आहेत. परंतु मनपा प्रशासनाने हरकतीबाबत काहीही कारवाई केली नाही. इतर मागासवर्ग आरक्षण काढण्याबाबत ही मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाने फटकारल्याने परत…
आत्मविश्वास, सकारात्मक विचार, लक्ष्यनिर्धारणाचा तरुणांना दिला प्रेरणादायी संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ढाके कॉलनीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रात आयोजित प्रेरणादायी युवक कार्यक्रमात माउंट आबू येथील राजयोग प्रशिक्षक तथा मोटिवेशनल स्पीकर राजयोगी ब्रह्माकुमार रूपेशभाई यांनी उपस्थित तरुणांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार व लक्ष्यनिर्धारणाचा सामर्थ्यशाली संदेश दिला. कार्यक्रमाचा प्रमुख विषय “आपले भविष्य स्वतः घडवा.” होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तरुणांना विचारलेल्या प्रश्नाने सभागृहात चिंतनाचे वातावरण निर्माण झाले. प्रेरणादायी उदाहरणे मांडत त्यांनी सांगितले की, धीरुभाई अंबानी यांनी कारकीर्दीची सुरुवात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यापासून केली आणि नंतर भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे संस्थापक झाले. रजनीकांत, आजचे सुपरस्टार, सुरुवातीला बस कंडक्टर होते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साध्या कुटुंबातून…
महिलांमध्ये उद्योजकतेची नवीन लाट निर्माण होणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत केबीसीएनएमयु सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसतर्फे महिला उद्योजकता दिनाचे औचित्य साधून ‘WE-Women Entrepreneurship’ विशेष उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी, भालचंद्र पाटील (मॅनेजिंग डायरेक्टर, वेगा केमिकल्स) यांच्या विशेष उपस्थितीत नुकतेच अनावरण करण्यात आले. हा उपक्रम प्रामुख्याने राज्यातील महिलांना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहातील स्टार्टअप इकोसिस्टमशी जोडण्यासाठी आणि नवोपक्रम क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी राबविण्यात येत आहे. ‘WE’ उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या संधीमध्ये विशेष उद्योजकीय प्रशिक्षण आणि कार्यशाळा, तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन, नेटवर्किंगच्या संधी आणि उद्योग जगताशी संपर्क, स्टार्टअप सपोर्ट आणि फंडिंगसाठी मार्गदर्शन यांचा समावेश…
जळगावातून सिद्धार्थ मयूर, रवींद्र धर्माधिकारी यांची वर्णी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए. के. रायजादा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाच्या डॉ. परिणय फुके यांची तर मानद सचिवपदी पुण्यातील निरंजन गोडबोले यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये जळगावातून सिद्धार्थ मयूर व जैन स्पोर्टस ॲकडमीचे रवींद्र धर्माधिकारी यांचीही निवड झाली आहे. ग्रॅण्ड मास्टर विदीत गुजराथी, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महिला ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामीनाथन, ग्रॅण्डमास्टर स्वाती घाटे…
सोन्याचा मुद्देमालही हस्तगत, एमआयडीसी पोलिसांची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. प्राप्त माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरातील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती गोळा करून आरोपींची ओळख…
विद्यार्थी सहायक समितीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जगापुढे पर्यावरणीय बदल ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत आवश्यक तेवढी जनजागृती होत नाही. उत्तराखंड राज्यात केदारनाथ भागात शास्त्रज्ञांनी बांधकाम करू नका, असे सांगितले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तेथे पुराने मोठे मानवी हानीचे नुकसान होत आहे. अनेक माणसे मारली जात आहे. निसर्गाचे मनुष्य अमाप नुकसान करीत असल्याने व पर्यावरणीय बदल होत असल्याने मानवाला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खा. कुमार केतकर यांनी केले. येथील विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहायक समिती, जळगावतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील…
तीन लाख ग्राहकांकडे ५३७ कोटींची थकबाकी, महावितरणकडून वीजबिल वसुली मोहीम सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे ५३७ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील तीन लाख १६ हजार ६८१ ग्राहकांकडे ५३७ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात घरगुती वर्गवारीतील दोन लाख ८५ हजार ६०७ ग्राहकांकडे ६९कोटी ५५ लाख, व्यावसायिक वर्गवारीतील १९ हजार ३२४ग्राहकांकडे ११ कोटी ४१ लाख,…
नवउद्योजकांना प्रामाणिकपणा-संयमाचे बाळकडू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळातर्फे (केसीआयआयएल) आयोजित तीन दिवसीय स्टार्टअप अंतर्गत विशेष कौशल्य शिबिराचा (स्टार्टअप बुटकॅम्प) प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मंचावर जळगाव येथील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल लि.चे चेअरमन व मुख्य कार्यकारी संचालक दीपक चौधरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रमोद संचेती, नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे, संचालक डॉ. राजेश जवळेकर, समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे उपस्थित होते. शिबीरात कोल्हापूर, यवतमाळ, पुणे यासह विविध भागातून ३० नवउद्योजक सहभागी झाले होते. याप्रसंगी दीपक चौधरी म्हणाले की, अथक परिश्रमातूनच यशस्वी उद्योजक होता येते. व्यवसायाचे नितीसूत्र प्रामाणिकपणे अवलंबल्यास यशस्वीतेकडे वाटचाल…