वाहतुकीमुळे होतेय कोंडी, महामार्गावर आहेत पाच शाळा, वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी साईमत।धानोरा, ता.चोपडा।प्रतिनिधी । बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील धानोरा गावाजवळ बेशिस्त वाहतुकीने विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. याच महामार्गावर पाच शाळा आहेत. त्यात तब्बल १५०० च्यावर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. याच ठिकाणाहून अन्यत्र शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही ३०० च्यावर आहेत. यामुळे बेशिस्त वाहतुकीस लगाम लागावी, यासाठी कायम स्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी पालकांनी केली आहे. धानोरा हे गाव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर वसलेले आहे तर याच ठिकाणी खुले बसस्थानक आहे. येथूनच जळगाव-चोपडा-यावल त्रिफुली आहे. यामुळे तिन्ही ठिकाणी खुल्या बस्थानकावर बसची वाट पाहत प्रवाशांसह विद्यार्थी उभे असतात. याचवेळी महामार्गावरील शाळा देखील भरतात व सुटतात.…
Author: Sharad Bhalerao
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान साईमत।धानोरा, ता.चोपडा।प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रा.मिलिंद बडगुजर यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय “समाजभूषण पुरस्काराने” गौरविण्यात आले. यानिमित्त शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यालयाचे शालेय समिती सदस्य योगेश पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. समर्थ फाऊंडेशन आणि एज्यूरिक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय समाजभूषण ” पुरस्कार प्रदान सोहळा चौथा मजला, तृप्ती बॅक्वेट (ग्लोरिया हॉल), एम.एच. हायस्कूल, तलावपाळी जवळ, ठाणे पश्चिम येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डाॅ. दीपक साबळे आणि ॲड.सुनिता साबळे यांनी केले होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वीस…
चाळीसगाव पोलिसात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी येथील महिला धुळे येथून मुंबई येथे रेल्वेमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समधून चोरट्यांनी अडीच लाख लंपास केल्याची घटना घडली. याबाबत चाळीसगाव पोलिसात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव येथील रहिवासी शितल कैलास पाखले ह्या धुळे येथून मुंबईला जात होते. रेल्वेत चढत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समधील अडीच लाख रुपये लंपास केले. यात महिलेचे व महिलेच्या पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोटारसायकलची चाबी सुध्दा चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत चाळीसगाव पोलीस नोंद केली आहे. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, मनमाड लोहमार्ग उपविभागीय…
साईमत।यावल।प्रतिनिधी गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची ८ डिसेंबर १९४६ स्थापना केली होती. त्यानिमित्त जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार यावल पथकातील तालुका समादेशक अधिकारी विजय रामा जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड पथकाने शहरातील मुख्य रस्त्यावर एस.एस. खान चौक, महाजन गल्ली, म्हसोबा चौक, मेनरोड, पोलीस कवायत मैदान परेड पथ संचलन तसेच पोलीस कार्यालय मैदान तसेच पोलीस स्टेशन याठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यशस्वीतेसाठी तालुका समदक्षिक अधिकारी विजय जावरे, वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके, कंपनी सर्जन मेजर ज्योती बारी, भगवान पाटील, संतोष बारी, टेकचंद फेगडे, अर्चना कोळी, संगीता पाटील, निशा कदम, सोनल कोळी, प्रवीण तेली, रउफ खान यांच्यासह…
मुक्ताईनगरला खरेदी केंद्र लवकर सुरू होणार, मंत्री खडसे यांच्या प्रयत्नांना यश साईमत।मुक्ताईनगर।प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांना विनंती केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळमार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, एरंडोल व पारोळा अशा ११ ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)चे कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. मुक्ताईनगर येथील सीसीआय केंद्राचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक…
नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल पढार यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले अखिल भारतीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालक यांचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर धाबे होते. त्यात पिंप्राळा येथील आराध्य सायबर सेलचे संचालक अमोल पढार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. या नियुक्तीबद्दल अमोल पढार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अधिवेशनात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने केंद्र चालक उपस्थित होते.
६७ बालकवींनी सादर केल्या कविता साईमत/पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी दिवंगत बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे हिच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ज्ञानवेद प्रबोधिनीतर्फे महात्मा फुले शिक्षण संस्थेत खुल्या बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ६७ बालकवी – कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाल साहित्यिक पी.टी.पाटील होते. यावेळी बालकवयित्री रूपाली माळी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज, संत रोहीदास महाराज व बालकवीत्री ज्ञानेश्वरी भामेरे यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. बालवयात शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्य अभिरुची निर्माण व्हावी, या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यात ‘आई ‘, ‘बाबा’, ‘शाळा’, ‘निसर्ग’, ‘शेतकरी’, ‘शिवाजी महाराज’, ‘भिडेवाडा’, ‘सावित्रीमाई’,…
निवडीत हिमांशु भालेराव, नेत्रा पाटील, जान्हवी कुलकर्णी यांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात आठवे कुमार साहित्य संमेलनासाठी नुकतीच निवड फेरी घेण्यात आली. त्यात जळगाव शहरातील ४० शाळा व जळगाव तालुक्यातील आठ शाळांमधील ४७७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात कै.सुनीता जगन्नाथ वाणी- भगीरथ शाळेतील विद्यार्थ्यांची कुमार साहित्य संमेलनासाठी निवड केली आहे. त्यात नेत्रा गुणवंतसिंग पाटील (आठवी) हिची कथा कथनासाठी निवड झाली आहे तर जान्हवी निलेश कुलकर्णी (आठवी), हिमांशू शरद भालेराव (दहावी) या विद्यार्थ्यांची काव्य वाचनासाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात कथा कथन व काव्य वाचनाची संधी लाभणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक एस.…
निवडीत परिसंवादासह अभिवाचनाचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात नुकतीच आठव्या कुमार साहित्य संमेलनासाठी निवड फेरी घेण्यात आली. निवड फेरीत जळगाव शहरातील ४० शाळा व जळगाव तालुक्यातील आठ शाळेतील ५७७ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यात असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील मोहिनी पाटील नववी ब, सानिया चौधरी नववी अ, तृप्ती बिऱ्हाडे दहावी अ, प्रज्ञा कापडणे दहावी ब यांची परिसंवादासाठी तर यामिनी भोळे दहावी अ व प्रज्ञा कापडणे दहावी ब यांची अभिवाचनासाठी निवड झाली. या विद्यार्थिनींना १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या खान्देशस्तरीय आठव्या कुमार साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, उपशिक्षिका अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.…
समाजबांधवातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील इच्छादेवी पोलीस चौकीजवळील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर झालेल्या स्फोटातील काही पोलीस कर्मचारी तसेच या घटनेला कारणीभूत ठरलेल्या गॅस एजन्सीचे चालक, मालक यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशा आशयाची मागणी राणा राजपूत समाज सुधारक मंडळ, समस्त राणा राजपूत समाज बांधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदाद्वारे केली आहे. इच्छादेवी पोलीस चौकीच्या १०० मीटरच्या अंतरावर अवैध गॅस रिफिलींग सेंटर दिवसाढवळ्या गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. स्फोटात भरत सोमनाथ दालवाला, सूरज भरत दालवाला, देवेश भरत दालवाला, रश्मी संजय दालवाला,संजय गणेश दालवाला, दानिश शेख, संदीप शेजवळ असा सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांवर अद्यापही…