शहर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गेंदालाल मिल परिसरात गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या एकावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात अन्वर खान हनीफ खान (वय ४२) हा तरुण चिलममध्ये गांजा भरून त्याचा नशा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी, ११ मे रोजी कारवाई केली. त्याच्याकडून नशा करण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. उमेश भांडारकर करीत आहे.
Author: Sharad Bhalerao
शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी एका मोबाईलच्या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरून नेले आहेत. त्यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस आणि रियल मी सर्व्हिस सेंटर ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, मनुमाता नगरात राहणारे अजयसिंग नागेंद्र राजपूत (वय ३९) यांचे गोलाणी मार्केटमध्ये ‘पूजा मोबाईल’ नावाचे दुकान आहे. रविवारी, १० मे रोजी ते रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी पहाटे ललित गोरखा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानाचे कुलूप…
एक लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला एक लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने केली. सविस्तर असे की, जगवाणी नगर गेटसमोरील एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो…
दोघांसह लोखंडी कोयता जप्त ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या अजिंठा चौफुली परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजिंठा चौफुली येथे दोन व्यक्ती कोयता घेऊन फिरत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजता अजिंठा…
साडे बारा कोटींहून अधिक रकमेची वसुली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार शनिवारी, १० मे रोजी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. त्यात जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालये व जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या प्रकरणांचा समावेश होता. लोक अदालतीत दाखलपूर्व आणि न्यायालयीन अशा चार हजार ५२१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोक अदालतीत तीन हजार ८२८ दाखलपूर्व तर ६९३ प्रलंबित प्रकरणे होती. त्यातून १२ कोटी ५० लाख ५१ हजार ९२६.५० रुपये इतकी मोठी रक्कम वसूल केली आहे. याशिवाय ५ मे ते ९ मे दरम्यान…
एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना गेल्या गुरूवारी, ८ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी, १० मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ८ मे रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही घरी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला.…
महिन्याभरात पाळीवसह भटक्या कुत्र्यांमुळे ७६६ जणांवर रुग्णालयात उपचार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागात एप्रिलमध्ये ८१४ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व संबंधित उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयात ओपीडी काळात सकाळी ९ ते २ यावेळेत इंजेक्शन विभाग येथे विविध प्राण्यांच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. रुग्णालयातील इंजेक्शन विभागात एप्रिल महिन्यात ७६६ व्यक्तींनी कुत्रा चावल्यामुळे उपचार घेतले आहे. त्यात ४८६ पुरुष, १५५ महिला तर १२५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. त्यात महिन्याभरात ३४ रुग्णांना मांजर, ६…
जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरात पसरली शोककळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अमळनेर येथून मुलीचा एमबीएच्या सीईटीचा परीक्षेचा पेपर देऊन जळगाव शहरात परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे भरधाव बोलेरोने स्विफ्ट कारला भीषण धडक दिली. धडकेत कारमधील पित्याचा मृत्यू तर मुलीसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मयतात महेश सुरेश सोनार (वय ४५, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी जळगावातील शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. सविस्तर असे की, जळगावातील रामेश्वर कॉलनी भागात महेश सोनार हे पिण्याच्या पाण्याच्या जारचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. महेश सोनार…
जळगाव शहर पोलिसात अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गेंदालाल मिल जवळील रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. ईश्वर बबन पाटील (रा. गेंदालाल मिल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ९ मे रोजी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बबन पाटील आणि त्यांचे मित्र नरेंद्र मनोहर मिस्त्री (रा. गेंदालाल मिल) हे दोघे ७ मे रोजी रात्री साडे आठ वाजता गेंदालाल मिलजवळील रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने पुढे चालणाऱ्या ईश्वर पाटील यांना जोरदार धडक दिली. त्यांना…
पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नशिराबाद येथील माहेर असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेला मुंबई येथे सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक वादातून शिवीगाळ, मारहाण आणि शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्या त्रासाला कंटाळून याप्रकरणी विवाहितेने नशिराबाद पोलीस ठाण्यात ९ मे रोजी पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. नशिराबाद येथील माहेर असलेल्या प्रियंका शिवा खरात (वय २०) हिचे जानेवारी २०२४ मध्ये मुंबई येथील शिवा दिनकर खरात यांच्याशी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला होता. तक्रारीनुसार, लग्नाच्या केवळ तीन महिन्यांतच प्रियंकाला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्या…