कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून आणली रंगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रबोधन नगरातील मातोश्री प्राथमिक विद्यालयात प्रबोधन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला मुख्याध्यापक समाधान इंगळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तसेच त्यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. त्यानंतर समाधान ठाकरे यांनीही फुले दांपत्यांच्या समाजकारण, शिक्षणप्रबोधन आणि स्त्रीशिक्षणातील योगदानाबद्दल प्रभावी भाषण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्यावरील विचार, भाषणे सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरीची प्रार्थना धांडे, रुचिका सपकाळे, तिसरीची प्रियंका सोळुंके, सेजल शिरसाळे, चवथीची प्रांजल सोनवणे, पाचवीची आरती पवार, समर शिरसाळे, सना तडवी,…
Author: Sharad Bhalerao
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रस्ताव मनपाकडे, शासनाकडे पाठविण्याची प्रतीक्षा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळेधारकांच्या भाडेपट्टा नूतनीकरण व भाडेपट्टा करमूल्यांकन दर ठरविण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिकांच्या उपजीविकेशी आणि व्यापाऱ्यांच्या हक्कांशी निगडित असल्याने हा प्रश्न व्यापक लोकहिताचा मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्यकक्षातून स्पष्ट आदेश दिले आहेत की, जळगाव महानगरपालिकेने भाडेपट्टा नूतनीकरणासाठी तसेच करमूल्यांकन दर (२ किंवा ३ टक्के) निश्चित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा. नवीन दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून लागू करावेत, असेही आदेशात नमूद केले आहे. मुख्यमंत्री आदेशानंतर नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी मनपाला…
दोन्ही शहरातील प्रवासाला अधिक चालना मिळणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मनमाड-जळगाव दरम्यान १६० कि.मी. अंतराची तिसरी रेल्वेलाईन सुरू केली आहे. मनमाड आणि जळगाव अशा दोन्ही शहरातील प्रवासाला अधिक चालना मिळणार आहे. मध्य रेल्वेने १६० कि.मी. लांबीच्या मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्ग प्रकल्पाची यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे मार्गावरील वाहतूक क्षमता, गती आणि रेल्वेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. मनमाड-जळगावच्या तिसऱ्या रेल्वेलाईन प्रकल्पाचा शेवटचा १०.४ किमीचा भाग, पिंपळखेरी-नांदगाव, रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली. गती चाचणीनंतर हा रेल्वे मार्ग कार्यान्वित केला. यावेळी सीएओ (बांधकाम) मुख्यालय अविनाश पांडे, डीआरएम भुसावळ, पुनीत अग्रवाल, डीसीई (बांधकाम) किशोर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.…
एकलव्य क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : लेवा पाटीदार समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आणि विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडता यावा, यासाठी सातत्याने कार्यरत लेवा नवयुवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एकलव्य क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आयोजन केले आहे. वधू-वर परिचय संमेलनाचे नियोजन लेवा नवयुवक संघाने नियोजनबद्ध केले आहे. त्यात परिचय संमेलनासोबतच उपस्थितांसाठी विवाहयोग्य वधू-वरांची अद्ययावत सूची उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच समाज बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी लेवा नवयुवक संघातर्फे मेळाव्याच्या ठिकाणी भोजनासह अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था केली आहे. लेवा पाटीदार समाज बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या भव्य वधू-वर परिचय मेळाव्याला…
राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयातून सहभाग घेतला. आश्रमशाळांच्या सुविधा, बांधकाम कामे, निधी वापर, कर्मचारी व्यवस्थापन तसेच धरती आबा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम व तालुका विकास आराखडे तातडीने तयार करून जिल्हास्तरीय आराखड्याची कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देश दिले. तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प…
८ लाख रुपयांची रोकड हस्तगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच फिर्यादीकडून हिसकावून नेलेली ८ लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे हस्तगत केली आहे. जळगाव शहरातील जुनी जोशी कॉलनी येथील रहिवासी विलास मधुकर जाधव (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…
‘न्हाई’च्या कार्यकारी अभियंत्यांचा हलगर्जीपणा, गुन्हा दाखलची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : लाडवंजारी मंगल कार्यालयासमोरील इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी, 25 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास सुमारे ४० ते ५० फुटांपर्यंत चारी झाल्यामुळे गंभीर अपघाताची घटना घडली. रस्त्यातील खोल चारीमुळे दुचाकी घसरून अजय विजय दहाड (वय ३८) यांची स्कुटर डिव्हायडरजवळ उलटली आणि ते रस्त्यावर फरफटत गेले. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील भागांना जखमा झाल्या आहेत. दरम्यान, दुर्घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरील चारी दुरुस्त न केल्याबद्दल ‘न्हाई’चे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती.…
प्रभाग पाच : माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या अडचणीत वाढ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे निकटवर्तीय मित्र परिवाराचे मोठ्या प्रमाणावर असलेले बोगस मतदारांच्यावर हजारोंच्या संख्येने तक्रारदार स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष पाटील यांच्याकडून तक्रार, हरकत नोंदवण्यात आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोगस मतदारांसंदर्भातील जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारी पाटील यांच्याकडून दाखल केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मनपात जोरदार चर्चा रंगली होती. तसेच हा विषय चर्चेचा ठरला होता. विशेष म्हणजे संपूर्ण हरकतींचे पुरावे पाटील यांनी सादर केलेले असल्याने विष्णू भंगाळे यांच्या अडचणी चांगलीच वाढ झालेली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी…
बैठकीत पायाभूत सुविधांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी कुसुंबा (ता. जळगाव) येथील जमीन संपादनाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमानतळ विकासाच्या संदर्भातील जमीन मोजणी, मालकी, मूल्यांकन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC), महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरण तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जमीन संपादन अहवालांचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला जमीन संपादन प्रक्रियेचा अद्ययावत अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. जमीन संपादनासंबंधी प्रलंबित मुद्दे, विकासासाठी आवश्यक रनवे विस्तार, सुरक्षा क्षेत्र वाढ, सेवा सुविधा उभारणी यांसंदर्भातील चर्चा…
जागृती अभियानाला प्रारंभ, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्सविषयी जागृती अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्याअनुषंगाने जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्कमधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते यांच्यामधील अंतर कमी व्हावे, रिटर्न भरण्याची सुलभता आदी विषयांवर तसेच आयकर भरताना सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ, रविंदर कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकरबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष-कार्मिक सी. एस. नाईक यांनी केले. त्यांच्या सोबत जैन इरिगेशनच्या आयकर विभागातील लक्ष्मीकांत लाहोटी,…