साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांनी दिलेल्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला जळगाव शहरात मिश्र परंतु परिणामकारक प्रतिसाद मिळाला. विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दाणा बाजारातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५ डिसेंबर) जोरदार सहभाग नोंदवत आपल्या सर्व व्यवहारांना पूर्णविराम दिला. परिणामी, कोट्यवधी रुपयांची दैनंदिन उलाढाल अक्षरशः ठप्प झाली. बाजार समिती व दाणा बाजारात शंभर टक्के बंद जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी आणि दाणा बाजारातील बहुसंख्य व्यापार्यांनी सकाळी ११ वाजल्यापासूनच दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. घाऊक धान्य बाजारातील सुमारे १७० हून अधिक व्यापारी बंदमध्ये सहभागी झाल्याने व्यवहार संपूर्ण दिवसभर बंद राहिले. बंद का? व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी अन्नधान्य व…
Author: Saimat
साईमत नाशिक प्रतिनिधी राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2025) दरम्यान नाशिक येथील सीडीओ मेरी हायस्कूल या केंद्रावर गंभीर चूक उघड झाली. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, ज्यामुळे परीक्षेतील गोंधळ आणि मानसिक तणाव निर्माण झाला. केंद्रप्रमुखांनी तातडीने उपाययोजना न करता केवळ आश्वासन देत वेळ घालवला, परिणामी उमेदवारांना उरलेल्या अर्धा-पाऊण तासात प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. उमेदवारांची मागणी गुरुवारी या प्रकरणासंबंधी उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांची भेट घेत आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, उत्तरपत्रिका इंग्रजी माध्यमाची असून प्रश्नपत्रिका मराठीमध्ये असल्यामुळे योग्य मार्क मिळण्याची शक्यता नाही, आणि या चुकीमुळे त्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होणार आहे. उमेदवारांनी नमूद…
साईमत प्रतिनिधी राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना, महायुतीतील तणाव आता उफाळून वर येताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केल्यानंतर वातावरण तापले. या घटनेमुळे दोन्ही पक्षांत नाराजी, आरोप-प्रत्यारोप आणि अविश्वासाची दरी आणखी वाढली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होत असलेल्या निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याने महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचे स्वर अधिकच तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी केलेली विधानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण देत आहेत. रवींद्र चव्हाण…
साईमत अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन विविध क्षेत्रांतील मोठी प्रकल्पे जलदगतीने आकार घेत आहेत. महिला, विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा ओळखत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पुढे सरकत आहेत. शहरात उभा राहत असलेला भव्य क्रीडा संकुल, मंगळग्रह मंदिराचा सुरू असलेला कायापालट, झामी चौकातील नव्या जलकुंभाचे काम, शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण, तरुणांसाठी अभ्यासिका उभारणी आणि पैलाड स्मशानभूमीचे नूतनीकरण—अशा अनेक प्रकल्पांमुळे अमळनेरची विकासयात्रा अधिक वेगवान होत आहे. तरुणांसाठी नवी संधी : १० कोटींचे अत्याधुनिक क्रीडा संकुल…
साईमत वृत्तसेवा ढाका / श्रीपूर, बांगलादेश: आज (21 नोव्हेंबर) सकाळी बांगलादेशमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचे केंद्र ढाक्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादीत होते. या भूकंपामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले आणि अनेक बहुमजली इमारती झुकल्या. विशेषतः 10 मजली इमारत एका बाजूला झुकल्याचे पाहायला मिळाले. भूकंपाचा जोर इतका होता की बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तातडीने थांबवण्यात आला. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. भूकंपानंतर कापड कारखान्यात घडले अपघात गाझीपूरमधील श्रीपूर येथे डेनिमेक नावाच्या कापड कारखान्यात भूकंपाच्या वेळी कामगार बाहेर…
साईमत मालेगाव प्रतिनिधी डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येने संपूर्ण मालेगाव हादरून गेले असून शहरात आज भीषण संताप उसळला. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांनी एकत्र येत मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आरोपीला तात्काळ फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी केली. बंददरम्यान काढलेल्या निषेध मोर्चाने अचानक आक्रमक वळण घेतले. विकृत मानसिकतेच्या आरोपीस न्याय मिळावा यासाठी लोकांच्या भावना तीव्र झाल्या. आंदोलकांनी “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणा देत मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाने काही वेळातच न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न करत परिसरात प्रचंड तणाव निर्माण केला. दरम्यान, आज या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात…
साईमत वृत्तसेवा दुबई: दुबई एअर शोच्या रंगरंगोटी दरम्यान भारतासाठी आणि जागतिक एरोस्पेस क्षेत्रासाठी चिंतेचा मोठा प्रसंग घडला आहे. एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी उड्डाण केलेले स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान अचानक तीव्र वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळले आहे. या घटनेने उपस्थितांना धूर आणि आगीचे लोट दर्शवले असून, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनंतर हा अपघात घडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. विमान घटनेच्या ठिकाणी उडत असताना अचानक खाली येताच, विमानाचे अवयव तुटलेले दिसले, आणि लगेचच आगीचे प्रचंड लोट उठले — हे दृश्य दाखवणारी काही उपस्थितांची नोंद सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. पायलटांची अद्याप माहिती…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात ६१ गॅस सिलेंडर चोरीला गेलेल्या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस ठाण्याने केवळ तीन दिवसांत उलगडा करत दोन आरोपींना वाहनासह जेरबंद केले. पोलिसांनी तब्बल १ लाख २२ हजार रुपये किमतीचा ६१ सिलेंडरांचा मुद्देमाल तसेच ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त केले आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे अचूक सापळा रचत करण्यात आली. काय घडले? फिर्यादी यांनी १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून ३४२ सिलेंडर भरून ट्रक एमआयडीसी परिसरात पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाहन घेण्यासाठी पोहोचले असता ट्रक जागेवर नव्हता. काही अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे असलेले वाहन मिळाल्यावर ३४२ पैकी ६१ सिलेंडर चोरीस…
शहरातील वाढत्या समस्या, बदलाची गरज, लोकसहभाग आणि आगामी ‘घर-घर संपर्क अभियान’ यावर सविस्तर चर्चा साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील वाढत्या नागरी समस्या-पायाभूत सुविधांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छतेचा अभाव, पाणीपुरवठ्यातील विस्कळीत कारभार, वाढती गुन्हेगारी तसेच असुरक्षित वाहतूक-यामुळे नागरिक त्रस्त असताना ‘जळगाव प्रथम’ या अराजकीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन घेऊन शहराच्या प्रश्नांवर आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. आजच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात सुरेशदादा यांनी राज्यकर्ते यांची प्रशासनावर त्यांची पकड राहिलेली नाही. दूरदृष्टी व प्रशासकीय क्षमता असणार्यांना मनपात संधी दिली पाहिजे. जळगावला सिंगापूर करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आहे, असे विचार मांडले होते. या मतांनी प्रेरित होऊन…
साईमत नाशिक प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी धावपळ सुरू झाली असून १२२ जागांसाठी तब्बल ५२५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी सरासरी पाच उमेदवारांची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीत भाजपला चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आहे. सध्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनमाड व नांदगाव येथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत दिसते. तर भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीची रेष पसरून राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवरील सत्ता…