Author: Saimat

जामनेर ः प्रतिनिधी रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बसस्थानक परिसरात गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले. जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पाळधी (ता.जामनेर) येथील नाचणखेडा चौफुली या ठिकाणी नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणावरुन शाळेचे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा वावर असतो. वेगात येणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग पार करताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खुद्द शिक्षक महामार्गावर उभे राहुन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सहकार्य करतात. हा धोका लक्षात घेता आणि रोजच होत असणारे…

Read More

जळगावः प्रतिनिधी  शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या चौकांमधील सर्कलमुळे अपघात होत आहेत तसेच भविष्यात देखिल मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर घटना थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यातसाठी नगरसेवक सुनिल खडके यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. शहरातील आकाशवाणी चौक, ईच्छादेवी व अजिंठा चौफुली येथे करण्यात आलेल्या सर्कल मुळे होत असलेले अपघात थांबविणे गरजेचे आहे. काल दुपारी अजिंठा चौफुली येथे जो अपघात झाला त्यात विनय खडके 52, यांचा सर्कलच्या चुकीच्या जागेमुळे मृत्यू झाला.लोक टर्न घेत असतांना बाजूने वाहन भरधाव वेगाने अंगावर येत आहे. यामुळे अपघात होत आहेत. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होवून ट्राफीक जाम होत आहे. भविष्यात असे अनेक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कर्मयोगी डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस हा गोदावरी परिवारासाठी मंगलपर्वणीच असतो. श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन आणि डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस म्हणजे दुग्धशर्करा योगच. शेगावनिवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांसह स्नेहींची रिघ लागली. यावेळी डॉ.उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव करण्यात आला. चिमुकल्यांच्या प्रेमाने भारावले गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 23 रोजी सकाळी डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतल्या चिमुकल्यांनी दिलेले प्रेम पाहून अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील हे भारावले, यावेळी शाळा परिसरात वाढदिवसाचे औचित्याने हवन पूजन डॉ.उल्हास पाटील व…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी मध्यप्रदेश इको पर्यटन विकास बोर्ड, भोपालद्वारा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निसर्गाविषयी प्रशिक्षण व जागरूकता हेतु एक दिवसीय इको अनुभूती शिबिर आयोजित करण्यात येते. बडवानी जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 260 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी चोपडा तालुक्यातील नाटेश्‍वर-अनेर डॅम येथे आयोजित या शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे वने व वन्यजीव संवर्धक हेमराज पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाविषयी प्रेरित करतांना वृक्षारोपण, सीड बँक व सीड बॉल्स तयार करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करणे, फुलपाखरू निरीक्षण, नोंदी व महत्त्व, पक्षी निरीक्षण व पक्ष्यांची स्थिती, पक्षी स्थलांतर, पक्षी व वन्यजीव सप्ताह, वने व…

Read More

पहूर, ता.जामनेर : वार्ताहर कोरोनामुळे उच्चशिक्षित बेरोजगारी तरुण तरुणीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बेरोजगार तरुणाईला पोलीस व सैनिक होण्याची आजही तितकीच आशा आहे. स्पर्धेत कमी पडू नये, आज ना उद्या पोलीस भरती होईल, या आशेने जीवतोड मेहनत करणाऱ्या तरूणांसाठी पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील व माजी सभापती निता कमलाकर पाटील या दाम्पत्याने शिवजयंतीनिमित्त पोलीस तसेच सैन्यदलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात लेखी परीक्षा व मैदानी शिबिरासाठी जवळपास 450 तरूण तर 60 तरुणींनी सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उच्चशिक्षित युवक सुद्धा इतर ठिकाणी नोकरी मिळत नसल्याने या क्षेत्राकडे वळत आहेत.…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी धरणगाव येथे सहा व आठ वर्षाच्या अल्पवयीन बालिकांवर चंदुलाल शिवराम मराठे नामक नराधमाने अत्याचार केला. त्या अत्याचारी नराधमांचा निषेध करण्यासाठी प्रदेश तेली महासंघ, जळगाव तसेच चोपडा तालुका समस्त तेली समाजातर्फे पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीकरीता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सदरचा खटला अति जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा व अत्याचारी नराधमाला फाशिची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह पिडीत कुटुंबाला संरक्षण द्यावे, दोन्ही बालिकांचा भविष्यातील शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, भविष्यात दोन्ही बालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच बालिकांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल गावीत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत सातपुडा पर्वतात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. काही भ्रष्ट वन कर्मचाऱ्यांच्या संमतीने सर्रास वृक्षतोड करण्यात येऊन संपूर्ण जंगल उजाड करण्याचा घाट घातला जात आहे. हे ताबडतोब थांबावे व वृक्षतोड करुन तयार करण्यात आलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेमार्फत सहाय्यक वनरक्षक हडपे यांना देण्यात आले. सातपुडा वनातील गट क्र.197/198 मध्ये 40 हेक्टर पेक्षा जास्त जंगलातील वृक्षतोड करून नवाड जमीन तयार करून तुरीचे पीक घेण्यात आले आहे. त्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या रोपांची नासधूस ही कोणाच्या कृपेने करण्यात आली? काही वनअधिकारी व कर्मचारी…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात दि.12 मार्च रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा समिती व वकील संघ, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. चाळीसगाव येथे न्यायालयाच्या आवारात तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव एन.के.वाळके यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालतीस प्रारंभ होईल. या लोक अदालतीसाठी चाळीसगाव तालुका वकील…

Read More

मलकापूर ः प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोक सुरडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राव्दारे केली होती. त्या पत्राची दखल घेत शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असे आदेश एका पत्राद्वारे राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी सु.ज.तुमराम यांनी दिले आहेत. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर रेल्वे स्थानकासमोर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा परिसरात सुशोभिकरणासह आदी कामे करण्यात आलेली आहेत. तहसील चौक…

Read More

मुंबई: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला सुरूवात झाली आहे. दरम्यान तिकडे युद्धाची घोषणा होताच भारतीय शेअर बाजार कोसळले आहे. पहिल्या मिनीटांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स 1400 अंकांनी घसरला असून, तो 55,904 वर पोहोचला आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांचे काही मिनीटात सुमारे 6 लाख कोटींचा तोटा झाला आहे. सेंसेक्सचे सर्व 30 शेअर घसरले आहेत. तर तिकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे निफ्टी हे देखील 370 अंकांनी घसरुण 16,695 येऊन थांबले आहे. रशियाने युक्रेन युद्धाची घोषणा केली असून, त्यानंतर कच्चा तेलाची किंमती वाढल्या आहेत. कच्चा तेल हा प्रति बॅलर…

Read More