जळगाव : प्रतिनिधी शहरातील गणेश कॉलनीतील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेस पतीकडून शारीरिक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि , गणेश कॉलनीतील माहेर असलेल्या रूपाली वाघ (वय-३३) यांचा विवाह कुसुंबा ता.जि. धुळे येथील महेश गोरख वाघ यांच्याशी २९ जून २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती महेश गोरख वाघ याने विवाहितेला किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यानंतर सासू आणि सासरे यांनीदेखील…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून अभिनव गांधीविद भवरलालजी जैन ऊर्फ मोठ्याभाऊंनी सत्य, अहिंसा आणि परस्पर सहकार्य भावनेच्या आधारावर विश्व शांति प्रस्थापित करण्याचा निरंतर प्रयत्न केला. पाणी, माती आणि अपारंपारिक ऊर्जेचा उपयोग करून ग्रामीण भारत आणि कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले बहुमोल कार्य सदैव स्मरणात राहिल. 25 फेब्रुवारी हा डॉ. भवरलालजी जैन ऊर्फ मोठ्याभाऊंचा स्मृतिदिन या निमीत्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून गणला जातो. चिंतनशील सु्स्वभावी व्यक्ती असो की एखादी कॉर्पोरेट संस्था त्यांना या तरुणाईचा विचार गांभीर्याने करावा लागतो आहे. त्यामुळे श्रद्धेय मोठेभाऊ देखील अशा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे.युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळले जाऊ शकत नाही असे पुतिन म्हणाले आहेत. या घोषणेनंतर जगभरातील आर्थिक व्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी बाजार उघडताच हजार अंकानी घसरला. निफ्टीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सर्व एक्सचेंजवर ट्रेडिंग बंद करण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव आणि युक्रेनची राजधानी आणि इतर भागात बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्यांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या चौथ्या दिवशी भारतीय बाजारांची सुरुवात लाल चिन्हाने झाली. सेन्सेक्समध्ये 1426.28 अंकांची म्हणजेच 2.49 टक्क्यांची घसरण झाली…
मास्को : वृत्तसंस्था रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु केले आहेत. त्यात 7 नागरिक ठार झाले असून 9 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाकडून जोरदार लष्करी कारवाई करण्यात येत आहे. युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घरी निघून जा असेही रशियाने बजावले आहे. इतकेच नाही तर अमेरिकेसह इतर युरोप देशमध्ये पडल्यास त्यांना गंभीर…
वॉशिग्टन : वृत्तसंस्था पूर्व युक्रेनच्या काही भागांत सैन्य पाठवण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निर्णय म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडउघड उल्लंघन’ असल्याचे सांगून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर व्यापार निर्बंध लागू केले. पाश्चिमात्य देशांशी व्यापार करण्याच्या रशियाच्या क्षमतेला यातून लक्ष्य करण्यात आले आहे. युक्रेनवर केलेल्या कारवाईबद्दल रशियाविरुद्ध अमेरिकेच्या वतीने निर्बंधांचा ‘पहिला भाग’ बायडेन यांनी जाहीर केला. दोन मोठय़ा वित्तीय संस्था, रशियाचे सार्वभौम कर्ज आणि रशियाचे उच्चपदस्थ नेते व त्यांचे कुटुंबीय यांच्याविरुद्ध जाहीर केलेल्या या निर्बंधांमुळे ‘रशियन सरकारचा पाश्चिमात्य वित्तपुरवठय़ाशी संबंध तुटेल’, असे त्यांनी सांगितले. नाटोच्या पूर्वेकडील बाल्टिक राष्ट्रांत असलेल्या अमेरिकेच्या मित्रदेशांना ‘मजबूत’ करण्यासाठी आपण तेथे अतिरिक्त फौजा आणि लष्करी साहित्य…
बुलढाणा ः प्रतिनिधी हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल करीत तीन आरोपींना अटक केली आहे. लेमन उर्फ संजय काळे, अमित बेडवाल, पवनसाठे असे अटक केलेले आरोपींचे नावे आहे. 20 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील क्रांती चौकात लाऊड स्पीकरवर गाणे लावून तलवारी घेऊन हे तरुण नाचत होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ मधील युवकांचे पडताळणी करून बुलढाणा शहर पोलिसांनी कारवाई केली. बुलढाणा पोलीस स्थानकामधील उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय माधव पेटकर, पोलीस हेड कॉनस्टेबल सुनिल जाधव, पो कॉन्सटेबल उमेश घुबे, चालक पोलीस…
पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ना.नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने दाऊद इब्राहिमच्या भावाशी मालमत्ता खरेदीचा व्यवहार केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेऊन,तपासणी चौकशीचे नाटक रंगवून तुरुंगात डांबण्याच्या कारवाईचा पाचोरा व भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी तीव्र जाहीर निषेध आणि धिक्कार करण्यात आला. यानिमित्ताने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले व प्रवेशव्दारासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी नवाब मलिक यांंच्या अटकेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ,नगरसेवक भूषण वाघ,विकास पाटील,सुनील पाटील, रंजित पाटील, अझहर खान, भोला चौधरी, रसूल शेख,बंटी महाजन, वासुदेव महाजन, शालिकराम महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी काल अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा…
विजय तेंडुलकर यांनी सुमारे 65 वर्षापूर्वी लिहिलेल्या ‘माणूस नावाचे बेट’ या पुस्तकावरुन त्या काळात रंगमंचावर नाटक सादर करण्यात आले.त्यात काशिनाथ घाणेकर या कसलेल्या अभिनेत्याने मुख्य भूमिका वठविली होती.रसिकांनी देखील त्याकाळी या नाटकाला डोक्यावर घेतले होते.तेच नाटक जळगावच्या केअर टेकर फाऊंडेशनने काल मराठी हौशी नाट्य स्पर्धेत संभाजीराजे नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर करण्याचे धाडस जळगावचे रंगकर्मी रमेश भोळे यांनी केले.विशेष म्हणजे हे आव्हान त्यांच्या समोर होते व त्यांनी ते आव्हान तितक्याच समर्थपणे पेलण्याचा कसोशीने प्रयत्न केला.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. रमेश भोळे दिग्दर्शित व ओम थिएटर निर्मित ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकाने प्रारंभापासून ते शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले.तीन अंकी नाटकाचा प्रत्येक अंक उत्कंठावर्धक ठरला.त्यात…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दशकांपासून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासोबतच त्या शेतकऱ्यांमागे भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घेतली आहे. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच केळीला जागतिक बाजारात स्थान मिळाल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष तथा केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केले. खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 55 वर्षे झाल्यानिमित्त चांदसर येथे राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या पुढाकाराने केळी परिसंवाद व केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी आमदार मनिष जैन, महाबनानाचे अध्यक्ष भागवतराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, तांदलवाडीचे शेतकरी प्रशांत महाजन,…