Author: Saimat

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ६ प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांच्याहस्ते झाले. तसेच त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील इतर कामांचे देखील भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. अनेकदा विकासकामांचे भूमिपूजन होते परंतु अनेक महिने कामांना प्रत्यक्षात सुरुवात देखील होत नाही, काही कामे तर वर्षानुवर्ष रखडल्याचे अनेक अनुभव नागरिकांना आलेले असतात. मात्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या विकासकामांचा पॅटर्नच वेगळा निर्माण केला असून ज्यादिवशी रस्त्यांचे भूमिपूजन केले त्याच दिवशी शहरातील रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु देखील झाले. विकासकामांच्या “मंगेश पॅटर्न” ची चाळीसगावात जोरदार चर्चा असून शब्द देणारा व तात्काळ पाळणारा लोकप्रतिनिधी…

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी शहरातील – श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. चिनावल यथ तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी: शहरातील विसनजीनगरातील 26 कामगारांनी दि.26 रोजी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. शहर संघटक रत्नाकर खरोटे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला. शहर संघटक रत्नाकर खरोटे यांच्या संपर्क कार्यालयात पार्टीचे शहर प्रवक्ते चंदन पाटील, यांच्या उपस्थितीत महानगर प्रमुख योगेश हिवरकर यांच्या उपस्थितीत हा सामुहीक प्रवेश करण्यात आला. आम आदमी पार्टीत प्रवेश करणाऱ्यां कार्यकर्त्यांमध्ये कैलास चौधरी, रविंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे, हरून शेख, वसंत बारी, प्रकाश सोनवणे, विशाल पाटीर्ल, विक्रम सोनवणे, योगेश बारी, प्रशांत पाटील, रघुनाथ साळवे, श्रीराम बारी यांच्या सह आदींचा समावेश आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलगी अल्पवयीन असून देखील तिचे लग्न लावून दिल्याने पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली असून याप्रकरणी पतीसह लग्न लावून देणार्‍या ७ जणांविरूद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीचे लग्न जून २०२१ मध्ये लावून देण्यात आले. यानंतर पतीने तीला जळगाव शहरात रहिवासाला आणले. तिच्यावर अत्याचार केले. चारीत्र्यावर संशय घेऊन तीला मारहाण केली. अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळुन अखेर या मुलीने ८ फेब्रुवारी रोजी घरातून पळून जात थेट इंदूर (मध्यप्रदेश) गाठले. नातेवाइकांचे घर…

Read More

मुंबई: प्रतिनिधी चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. तर नाशिक जिल्हा राष्ट्रवादीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू करून राष्ट्रपतींना पत्रं पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता या वादात खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपलं विधान त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे आता या…

Read More

मुंबई : प्रतिनिधी विज्ञान अर्थात ‘सायन्स’हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय (Physicist) भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज (National Science Day) विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. (The Work of Researchers) संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या अनुशंगाने सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था एवढेच नाही तर शास्त्रज्ञ आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रविवारी २७ फेब्रुवारी रोजी घरगुती महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘इनरव्हील मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. मेळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एका गरजू मुलीला सायकल तर एका शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेळ्याचे उदघाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हा चेअरमन अश्वनी गुजराती, सहायक विश्वस्त मीनल लाठी, उद्योजिका कल्पना भालचंद्र पाटील, शिल्पा चोरडिया, डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांच्या उपस्थितीत झाले. सुरुवातीला केतकी पाटील हिने गणेश वंदना सादर केली. प्रस्तावनामधून इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा नीता परमार यांनी मेळ्याच्या आयोजनाबाबतचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी   शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील  स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त उद्या दि.1 मार्च  रोजी  विविध धार्मीक कार्यक्रम आयोजीत करण्यातआले आहे. महाशिवरात्री निमित्त उद्या सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते ” रुद्रअभिषेक व हवन पूजा ” सोहळा पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता  महादेवाची महाआरती परिसरातील भाविकांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3 वाजता शहरातील सुप्रसिद्ध श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी ” समुहसह भजन ” सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महादेवाची महाआरती होणार आहे. सायंकाळी 7 वाजता ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  येथील अंकलेश्वर – बुरहाणपूर महामार्गावार असलेले अकुलखेडा गांवाकडे जातांना हॉटेल खेतेश्वर व हॉटेल संकेत जवळील अनधिकृत गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर अनधिकृत गतिरोधक काढण्यात यावे याबाबत जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व अकुलखेडा उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सदर वृत्त सायंदैनिक साईमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आज दि.27 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी लावून ते अनधिकृत गतिरोधक काढण्यात आले. अनधिकृत गतिरोधकांमुळे अकुलखेडा, काजीपूरा, हिंगोणे, चहार्डी, हातेड व गलंगी तसेच परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सदर बातमीचे…

Read More

बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सोबत जर बारावी पास असलेल्या असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळांत किंवा एथलॅटिक्स टूर्नामेन्टमध्ये राज्य किंवा देश पातळीवर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्पोर्ट्स क्वोटामध्ये असलेल्या आणि बारावी पास झालेल्यांना सीआयएसएफ (CISF recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात हेड कॉन्स्टेबलपदासाठी नोकरीची संधी आहे. चला तर जाणून घेऊयात या नोकरीसाठी कसं, कुठे आणि कधीपर्यंत अप्लाय करता येऊ शकेल? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी…

Read More