पुणेः प्रतिनिधी पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः येथे उपस्थित राहत राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे राज ठाकरे कार्यकर्त्यांना आज काय संबोधून पुढील येणाऱ्या निवडणुकीची दिशा काय असणार आहे हे आज राज्यातील जनतेला पाहावयास मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मंगळवारपासून तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. ‘मनसे’च्या वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. मंगळवारी सकाळी राज ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार…
Author: Saimat
मेष : आज केलेल्या प्रयत्नांतून चांगले फळ मिळेल तसेच आत्मविश्वास वाढीस लागेल. तुम्ही एखाद्या नवीन भागीदारीत व्यवसाय सुरु करू शकता. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि काही नवीन चांगल्या ओळखी होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. कामकाजात नफा होईल तसेच तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. वृषभ : आज योजना प्रत्यक्ष कृतीत उतरतील व त्यातून लाभ देखील होईल. नोकरदार वर्गाचे काम तसेच कर्तव्यनिष्ठतेमुळे कौतूक होईल आणि सन्मान मिळेल. तुम्हाला मेहनतीने व सामंजस्याने आपले आयुष्य आनंदी बनवण्यात मदत होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक दृष्टीने हा एक शुभ दिवस आहे. मिथुन : आज लेखन, कला, साहित्य, संगीत, चित्रपट तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शेअर बाजाराच्या सलग चार दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. काल (सोमवार) शेअर्स बाजारात मोठी पडझड नोंदविली गेली होती. आज (मंगळवार) सकाळपासून बाजार बंद होईपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीवर जोर राहिला. आज सेन्सेक्स 581 अंकांच्या तेजीसह 53424 टप्प्यावर आणि निफ्टी 150 अंकांच्या तेजीसह 16013 वर बंद झाला. बाजारच्या अखरेच्या तासात मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्यात आले. आज सेन्सेक्सवर टॉप-30 मधील 24 शेअर तेजीसह आणि सहा शेअर घसरणीसह बंद झाले. सनफार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि NTPC शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. टाटा स्टील, पावरग्रिड आणि टायटन शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. शेअर बाजारातील तेजीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त निशुल्क स्त्री रोग निदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुमन लोढा यांच्या हस्ते संपन्न झाला.प्रास्तविक अध्यक्ष राजकुमारी बाल्दी , कोषाध्यक्ष मिनाक्षी वाणी ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. हे शिबीर ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. प्रकल्प प्रमुख उपाध्यक्ष मंगला नगरकर यांनी शिबिरांची संपूर्ण माहिती दिली. हेमा रोकडे यांनी आभार मानले. प्रचार प्रमुख वैशाली पाटील, अ.भ.मारवाड़ी म.स.च्या महा प्र.उपाध्यक्ष आशाजी पगारिया, अ.भ.मा.म.स. जिल्हा सचिव ललिता श्रीश्रीमाळ , ,छाया गडे, राजकमल पाटील वंदना वानखेडे,डॉ. शेख इम्रान यांचे सहकार्य लाभले हे शिबिर पुर्णवर्ष गर्जून सांठी दर बुधवारी लोढा…
जळगाव : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त सरदार वल्लभाई पटेल हॉल येथे विविध क्षेत्रात जसे वैद्यकीय, शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, विधी व सेवा, पोलीस दल, होमगार्ड, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळपास 55 रणरागिणींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान सोहळा शिववंदन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री श्री गुलाबरावजी देवकर, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, शिवसेनेच्या सरीताताई माळी-कोल्हे, इमरान मुलतानी युवा जिल्हाध्यक्ष एम आय एम, योगराज सपकाळे ,समाजसेविका रुबिना पटेल, विजयाताई इंगळे,, रूपालीताई वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड,…
मुंबई :- अभिनेत्री आलीय भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सगळे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये शामील होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारपर्यंत ७.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत ७८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशामध्ये बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार १० व्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात आलियाने केलेल्या अभिनयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत असून तिचा बॉयफ्रेंड रणबीरलाही तिचा हेवा वाटत आहे. दहाव्या दिवशी ८ ते ९ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर हा चित्रपट लवकरच १००…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगांव नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वछता व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ महिलांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोयगांव शहरात सफाई कामगार म्हणून कार्य करणाऱ्या १६ महिला,१० अंगणवाडी सेविका,१० मदतनीस ६ आशा स्वयंसेविका व एक आरोग्य सेविका अशा ४३ महिलांना कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम राजू दुतोंडे, उपसभापती शाहिस्ताबी रऊफ शेख,सदस्य किशोर संध्या मापारी, ममता विष्णू इंगळे, आशियांना कदीर शहा…
मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख विकसनशील महाराष्ट्रात आज ही मोठ्या प्रमाणात बाल विवाह होत असून मराठवाड्यात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची ग्वाही आज महिला आयोगाने दिली आहे . त्या विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी त्यांनी पत्रकांबरोबर सोबत अनौपचारिक गप्पा मारल्या त्यावेळी महिला आणि राज्यातील महिला आयोगाचे कार्य यावर बोलत असताना त्यांनी पदभार घेतल्या पासून महिला आयोगाने केलेले कार्य आणि त्यात त्यांना अधिक चैलेंजिंग वाटलेले विषय काय विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की , आज ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल . 2007 मध्ये आपल्याकडे बालविवाह प्रतिबंधीतकायदा आमलात आला आहे…
मुक्ताईनगर :प्रतिनिधी तालुक्यातील मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची फसवणूक केली, म्हणून मुक्ताईनगर पंचायत समिती चे विद्यमान गट विकास अधिकारी संतोष रघुनाथ नागतीलक आणि अन्य सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजते, सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार 1)टीसीएल पावडर खरेदी,2)क्लोरीन…
चाळीसगाव प्रतिनिधी मुराद पटेल युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भडकलेल्या युध्दाच्या झळा जगातील अनेक लोकांना बसत असतानाच याच युक्रेनमध्ये चाळीसगावचा एमबीबीएस चा विद्यार्थी यश राजेंद्र परदेशी हा युद्ध जन्य परिस्थिती उद्भवल्याने अडकला आणि प्रत्येक मुलाच्या आई वडील भाऊ भहीणी आणि नातलगांना जशी काळजी आपल्या मुलाची वाटते तशीच काळजी चाळीसगावातील राजेंद्र परदेशी आणि आर्किटेक आकाश परदेशी व त्यांच्या सर्व परिवाराला लागली आपला मुलगा भाऊ मायदेशी परत येत नाही तोपर्यंत हा सर्व परिवार चिंताक्रांत होता युक्रेनमधील खार्किव राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापिठात यश परदेशी एम. बी. बी. एस. च्या शिक्षणासाठी नुकताच ७ फेब्रुवारी रोजी भारतातून गेला होता तेथे पंधरा दिवस खार्किव येथे मुक्काम केल्यानंतर त्यांचे…