साईमत प्रतिनिधी आशिया चषक २०२५ अंतर्गत दुबई येथे होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. “खेळू नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे, मग आपण त्यांच्याशी का खेळावं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भारत-पाक सामन्यावरील वादाबाबत विचारणा केली. यावर नाना म्हणाले, “फक्त बोलून काही होत नाही. मत व्यक्त करून प्रश्न सुटत नाही. शेवटी सरकारचं धोरण आणि नियम यावरच निर्णय ठरतो.” त्यांच्या या विधानाने समाजमनातील नाराजी अधिक अधोरेखित झाली. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी…
Author: Saimat
सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील पतंजली महिला समिती यांच्या वतीने सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान करुन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील होत्या.दीपप्रज्वलन प्रा.दिनेश राठी, स्वाभिमानचे प्रजापती भवरलाल यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक दंगल पाटील यांनी शिक्षक दिन व योगा विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात योग शिक्षिका सेवा देत आहेत. त्यांच्यासह सर्वांना शिक्षक दिना निमित्त भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच यावेळी महानंदा पाटील, अंजली वाघमारे, वर्षा लोखंडे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशाह, मिना राजपूत, वंदना जंगले, पुनम संकला, माला चौधरी, सुरेखा पाटील, निलीमा पाटील, हेमा पाटील, ललिता चौधरी, प्रभाकर झांबरे, टी.एस. बाविस्कर या…
‘अंतर्नाद प्रतिष्ठान’तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांचे प्रतिपादन साईमत/यावल /प्रतिनिधी : सण-उत्सवांना केवळ पूजा-अर्चा आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना यातून जपली गेली पाहिजे. अंतर्नाद प्रतिष्ठानचा ‘एक दुर्वा समर्पण’ हा उपक्रम त्यादृष्टीने प्रेरणादायी आहे. दात्यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवते आणि उद्या यांच्यातीलच कुणी समाजाला दिशा देणारा अधिकारी होईल, असे प्रतिपादन ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख तथा वाघळूद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांनी केले. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे…
शिवसेना शिंदे गटात असंख्य महिलांचा प्रवेश साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट महिला आघाडीचा भव्य निर्धार मेळावा व प्रवेश सोहळा भडगाव रस्त्यावरील प्रसाद हॉलमध्ये शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी जल्लोषात पार पडला. यावेळी जिल्हा प्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील, नगराध्यक्षा सुनिता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, युवा नेते सुमित पाटील उपस्थित होते. मेळाव्यात अनेक महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाचा झेंडा हाती घेताच घोषणाबाजीसह टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशामुळे महिला आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आगामी निवडणुकीसाठी संघटनेत नवा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचा सहभाग वाढणे हे काळाचे मोठे…
महिलांचा धडकला निषेध मोर्चा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर गेल्या २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झालेल्या भ्याड हल्ल्याला तिसरा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात अपयश आले आहे. चौधरी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रभागातील नागरिकांसह महिलांनी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी हॉटेल सदानंदपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढून शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना निवेदन सादर केले. गुन्ह्यातील सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार उघडकीस यावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात…
मोर्चात महिलांसह विद्यार्थी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पिंपळगाव हरेश्वर परिसरातील अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात पाचोरा शहरात सकल हिंदू समाज व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मोर्चाची सुरुवात कृष्णापूर येथील हनुमान मंदिरापासून होऊन आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे निघून मोर्चाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली. संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चाच्या शेवटी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात अल्पवयीन…
गावात ८० च्यावर दारुचे अड्डे ; घरपोच मिळतेय सेवा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : शहरापासून अवघ्या काही अंतरावरील तालुक्यातील साकेगाव जलजीवन मिशन योजनेसह अवैध धंदेच्या बाबतीतही नेहमीच चर्चेत असतो. गावात तब्बल ८० पेक्षा अधिक दारूचे अड्डे आहेत. सट्टा, पत्ता खुले काम चालतो. आता तर अवैध धंदेवाल्यांची इतकी हिम्मत वाढली की, अगदी एका फोन कॉलवर पाहिजे तिथे ‘तळीरामांसाठी’ दारू उपलब्ध करून दिली जाते. अगदी घरपोच सेवा. गावात उघड्यावर दारू पार्टीची फॅशन झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत चिमुकले ज्ञानदानाचे धडे गिरवतात, त्याच अंगणवाडीच्या पायऱ्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. दारू पार्टी केली जाते. तेही मुख्य रस्त्यावर हे विशेष. गावातील बस स्थानक मार्गाकडे प्रवेश करताच दारूच्या…
मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीतर्फे पहूर गावासह शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन पहूरकरांना सुरक्षित आणि नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पहूर आणि आसपासच्या परिसरात पावसाळा सुरू झाल्यामुळे वीजपुरवठा वारंवार बंद होत आहे. ज्यामुळे विद्यार्थी, लहान मुले आणि वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वीज व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे घरातील उपकरणे…
पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यातील बहादरपूर शिवारात अवैध बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर येथील बोरी नदीच्या किनारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध बनावट ‘टॅंगो पंच’ देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली होती. त्यानुसार कारखान्यात पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता राकेश छगनलाल जैन, टिन्या डोंगऱ्या पावरा, कतारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना अटक करून पोलिसांनी बनावट कारखान्यातून ३१०० नग दारूच्या बाटल्या, ८०० लीटर कच्चा माल, दोन लाख…
संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले. साईमत/मुक्तईनगर /प्रतिनिधी : शहरातील संत गजानन महाराज संस्थान व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त सकाळी भुसावळ रोड वरील संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले. दुपारी मंदिराचे सेवक दीपक पाटील यांनी फकिरा बोरे यांच्याहस्ते सपत्नीक आरती केली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच संध्याकाळी रामरोटी आश्रम ते संत गजानन महाराज मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक आर.व्ही.राजपूत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.टी.जोगी, संगिता बोरे, सुशिला निळे, राजकन्या जोगी, मिनाबाई पाचपांडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित…