सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवाडे ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावातील नवविवाहित दाम्पत्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. नवविवाहित जोडप्यांना दोन झाडे लावावी लागणार आहेत. त्यांचबरोबर लोकांना त्या झाडासोबत दोन फोटोही जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्रामपंचायत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करणार आहे. हा नियम ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. किंजवाडे गावाचे सरपंच संतोष किंजवाडेकर आणि ग्रामसेवक शिवराज राठोड हे आहेत. दोघांनीही गावा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्मार्ट गाव बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरावर गाव आणण्यासाठी गावात नवीन…
Author: saimat
नागपूर : वृत्तसंस्था सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी केल्यावरही बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत फलकावर अजित पवार यांच्या बरोबरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला स्थान देऊन दोन्ही नेते साथसाथ असल्याचा संदेश दिला आहे. नागपुरातील छत्रपती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने भलामोठा स्वागत फलक लावला आहे. तो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्हा परिषद अध्यक्षाने लावलेल्या या फलकावर उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे सारखे छायाचित्र आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी भाजपनेच केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दरवर्षी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला जायचा. त्यावरून तेव्हा विरोधी…
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत रविवारी रंगशारदा सभागृहात शिवसेना(ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.“ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत…
मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे बडे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्य मंत्रीमडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑगस्ट महिन्यातच शिंदे-फडणवीस-अजित पवार या महायुतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीला ९ मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप तसेच शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये. मंत्रीमंडळ विस्तार केलाच तर अमेरिकेला निघून जाईन,अशी खदखद आमदार कडू यांनी बोलून दाखवलीय. यापुढे सरकारने आणखी चार जणांना…
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना ‘शिवसेना फोडणारा औरंग्या’ असा त्यांचा उल्लेख केला होता. या टीकेला आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना हल्ली इतिहासाची खूप आठवण यायला लागली आहे. अफझल खान काय, औरंग्या काय, आणखी काय-काय सुरू आहे. संजय शिरसाट म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे यांना इतिहास माहिती नाही. त्याना वाटते की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी जी वाक्य शोभत होती, ती वाक्यं आपण फेकली तर लोक ती वाक्यं झेलतील. परंतु, आता लोकांना कंटाळा आला आहे. दुसऱ्या बाजूला…
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील टोलचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत बनत चालला आहे. राज्यातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असातना टोल का भरावा असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उचलून धरला होता.आता, यावरूनच, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल सुरू का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस वे एमएमआरडीएने मुंबई पालिकेकडे हस्तांतरित…
साईमत ठाणे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज (५ ऑगस्ट) ६० वा वाढदिवस आहे परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ५ ऑगस्ट माझा वाढदिवस लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात.…
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रात कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी करत अहमदनगरमधील राहुरी शहर आणि तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज (५ ऑगस्ट) सकाळीच या मोर्चाला सुरुवात झाली असून हजारो हिंदू नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार नितेश राणेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. राज्यात हिंदू मुलींचे-तरुणींचे फसवून अथवा बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा दावा करत हिंदू संघटनांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चाबद्दल आणि कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राज्यात स्वतःची ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्या, त्यानंतर…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी मानवी जीवन अनपेक्षित चढउतार, सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. दिनांक 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे. या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने…
भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी केली असता त्यात…