कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेशन वितरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहाँ यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातच ईडीच्या पथकावर हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. शाहजहाँच्या समर्थकांनी ही तोडफोड केली असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. अधिकाऱ्यांनी काय सांगितले? अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी सकाळी शेख यांच्या निवासस्थानी जायला निघाले होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ईडीच्या आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्याला घेरले. यावेळी त्यांनी ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत वाहनांवर हल्ला केला. ईडीच्या पथकाने निघून जावे, यासाठी गर्दीने दबाव टाकला होता. हल्ला झाल्यानंतर ईडीच्या पथकाने…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी ट्रक्टरला ओव्हरेटेक करण्याच्या प्रयत्नात असतांना दुचाकीवर मागे असलेले ७८ वर्षीय वृध्द व्यक्ती रोडवर पडले. तेवढ्यात अज्ञात वाहनाने त्यांना चिरडल्याने जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर घडली आहे. यावेळी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. युसूफ शेख ईस्माईल खाटीक (वय-७८, रा. पारोळा) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव असून अस्लम शेख युसूफ खाटीक (वय-४४, रा. पारोळा) हे गंभीर जखमी झाले आहे. पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रूग्णालयातच…
जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजीच्या दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. व्ही.एल.माहेश्वरी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रो. एस.टी. इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर,पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण सपकाळे हे उपस्थित राहणार आहेत. या दर्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. आता फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांची रजनीश सेठ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन डीजीपी बनल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. रजनीश सेठ, १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, निवृत्त अधिकारी…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, आज १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार असून, शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने हा मोठा दिलासा दिला आहे तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून, कारसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान निश्चित करण्यात आले आहे.याव्यतिरिक्त विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनंतर, खेळाडू नियमांचा वापर करून अयोग्य फायदा घेऊ शकणार नाहीत. स्टंपिंगबाबत आयसीसीने सर्वात मोठा नियम बदलला आहे. यासंबंधीचे रिव्ह्यू आता फक्त साइड-ऑन कॅमेरे पाहूनच घेतले जातील. याचा अर्थ स्टंपिंगबाबतचे अपील जेव्हा थर्ड अंपायरपर्यंत पोहोचते, तेव्हा ते चेंडू बॅटला लागला की नाही हे पाहणार नाहीत. ते फक्त स्टंपिंगबाबतच निर्णय देतील. आयसीसीने बदललेले नियम १२ डिसेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. जर एखाद्या संघाला स्टंपिंग प्रक्रियेत कॅच-बिहाइंड तपासायचे असेल, तर त्याला आता कॅच-बिहाइंड अपीलसाठी वेगळा डीआरएस पर्याय वापरावा लागेल. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत,…
धुळे : प्रतिनिधी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर धरती निखिल देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाचा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली. भाजपच्या विशेष बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी देवरे यांचे नाव निश्चित केल्यामुळे त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासह विविध विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. दरम्यान, पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदावरून अश्विनी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ कॅम्पसमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक झाली. यावेळी भाजपकडून निरीक्षक म्हणून आमदार राजूमामा भोळे व भाजप प्रदेश महामंत्री विजय…
जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या माणसाने ‘न भूतो न भविष्यती’ अशाप्रकारचे कार्य आरंभलं आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. मी काही अभ्यासक नाही, आमच्यात चर्चा वगैरे झाली नाही. मी फक्त आलो,…
शिर्डी : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे सुरू आहे. या शिबिरात शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही अजित पवार गटावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पवार साहेबांना आमदार दबावापोटी सोडून गेले, हे प्रेमापोटी कोणी गेले नाही. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असता तर तुमच्या सोबत ५ देखील आमदार आले नसते, पण तुम्ही सत्तेबरोबर आहात, ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत. आज इथे जे कार्यकर्ते थांबलेले आहेत ते शरद पवारांच्या विचारांनी थांबलेले आहेत, असा हल्लाबोल…
देशात असे अनेक तरुण आहेत की ,ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे, पण ते शेती करत आहेत. गलेलठ्ठ नोकरी करण्याऐवजी हे तरुण शेती करुन ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आसते मात्र आता आदिवासी भागातील तरुणांनी या ठिकाणच्या हवामानाचा आणि परिस्थतीचा अभ्यास करून रोजगाराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. अत्याल्प खर्चात ते मशरूम (Mushroom) उत्पादन घेऊ लागले आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करवा लागत नसल्याने अनेक परिवारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. विशेष म्हणजे हे करतांना त्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूपासून बेड तयार केले आहेत. मशरूम शेती म्हटलं की…