मुंबई : प्रतिनिधी टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधायला शिकावा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल भाजपच्या वर्मी घाव घातला होता. त्यावर ‘पक्ष वाढवायला विश्वास निर्माण करायला लागतो’ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? १९८४ मध्ये लोकसभेत भाजपच्या दोन जागा होत्या. आज देशात ३०३ जागा झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एवढं बहुमत गेल्या २० वर्षात कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं. पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करायला लागतो, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणासाठी काम करावं लागतं. पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यातील १८-१८ तास द्यावे लागतात. संवाद…
Author: Kishor Koli
नागपूर : वृत्तसंस्था उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणारे बच्चू कडू मंत्रिपदाची वाट पाहून थकून गेले आहेत. मंत्री होण्याची आता वेळ नाहीये. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी आता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. तशी वेळ आलीच तर माझे सहकारी आमदार राजकुमार बडोले यांना मी मंत्री करेन, असे वक्तव्य प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मुंबईमधील वांद्याच्या ताज लँड एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजन केलंय. शिवसेना शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री आज संध्याकाळी या स्नेहभोजनाला हजेरी लावतील. या सोहळ्याचे…
अम्मान (जॉर्डन) : वृत्तसंस्था भारताचा मोहित कुमार (६१ किलो) २० वर्षांखालील गटातील फ्री-स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला. या वयोगटात विजेतेपद मिळविणारा मोहित चौथा भारतीय ठरला. दरम्यान, मुलींच्या ७६ किलो वजनी गटातून प्रियाने अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुलींच्या गटात गेल्या वर्षी अंतिम पंघालने ५३ किलो गटात विजेतेपद मिळवले होते. मोहितने बुधवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा गुणांवर ९-८ असा पराभव केला. लढतीत एकवेळ मोहित ०-६ असा पिछाडीवर होता. मात्र, वेगवान कुस्ती करण्याच्या नादात एका क्षणी एल्डर उर्जा गमावून बसला आणि त्याचा फायदा घेत मोहितने सलग नऊ गुणांची कमाई करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २० वर्षांखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत २०१९…
जयपूर : वृत्तसंस्था प्रेमासाठी भारतात आलेली सीमा हैदर आणि प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू या दोघीजणी सध्या चर्चेत असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील एक महिला तिच्या दोन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत कुवेतला पळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महत्त्वाचं म्हणजे, या महिलेचा पती मुंबईत नोकरीनिमित्त राहत होता. याप्रकरणी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण राजस्थानच्या डूंगरपुर जिल्ह्यातील आहे. दीपिका पाटीदार नावाची 35 वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसोबत गावात राहत होती. मुलगी 11 वर्षांची असून मुलगा 7 वर्षांचा आहे. तर, पती नोकरीनिमित्त मुंबईत राहतो. दीपिका तिच्या उपचारांसाठी सतत गुजरात आणि…
बाकू : वृत्तसंस्था भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला मंगळवारी ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे दोन भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंच्या लढतीतील पहिल्या डावात १९ वर्षीय अर्जुन एरिगेसीने १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदला ५३ चालींत पराभूत केले. एरिगेसीने योजनाबद्ध खेळ करताना काळय़ा मोहऱ्यांनीशी प्रज्ञानंदवर मात केली. त्यामुळे लढत ‘टायब्रेकर’मध्ये नेण्यासाठी प्रज्ञानंदला दुसरा डाव जिंकावा लागेल. पाच वेळचा विश्वविजेता कार्लसनने १७ वर्षीय गुकेशवर काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना विजय मिळवला. या डावात ३४व्या चालीत गुकेशने चूक केली आणि कार्लसनने या संधीचा फायदा घेतला. अखेर ४८ चालींनंतर गुकेशने हार मान्य केली. या विजयानंतर उपांत्य फेरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळालेल्या विनेश फोगटने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनच्या हांगझो येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा तिने मंगळवारी केली. यामुळे राखीव खेळाडू अंतिम पंघालचा संघ समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. विनेश व बजंरग पुनिया यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत सूट दिल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने हा निर्णय घेतला होता. जकार्ता येथे २०१८ रोजी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विनेशने ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपल्या दुखापतीबाबत माहिती दिली. १३ ऑगस्टला विनेशच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि १७ ऑगस्टला मुंबईत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार…
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत टुणकन उडी मारून सत्तेत सामील झाले, अशी बोचरी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपशी जवळीक वाढवल्यामुळे चर्चेत असणाऱ्या राज ठाकरे यांनी पनवेलमधील एका कार्यक्रमात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था आणि अन्य मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली. भाजपमध्ये लोकांना कनपटीवर बंदूक ठेवून पक्षात आणले जाते. मग लोकांवर गाडीत झोपून जायची वेळ येते. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी गुप्त…
अमरावती ः वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीमुळे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) मित्रपक्ष अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडीत एकीकडे संभ्रम असल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे नेते सांगत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असंही म्हणत आहेत. त्याचबरोबर काँग्रसचे नेते आपल्याकडे प्लॅन बी असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीमधील सगळेजण सध्या…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.एकीकडे भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट या तीन मित्रगटांच्या आघाडीकडून नेतेमंडळी ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट यांनीही सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इतर पक्ष, विशेषत: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आता खुद्द राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य करीत लोकसभा निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंनी बैठक आयोजित केली होती.या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात प्राथमिक नियोजन…
नवीदिल्ली ः वृत्तसंस्था कलम ३०२ हे खुनासाठी, तर कलम ४२० हे फसवणुकीसाठी प्रसिद्ध आहे. ४२० ही संख्या फसवणुकीसंदर्भात एवढी प्रसिद्ध दगाबाज व्यक्तींना ‘४२०’ म्हटले जाते. परंतु, भारतीय न्याय संहिता विधेयक, २०२३, हे १६० वर्षांहून अधिक जुने भारतीय दंड संहिता रद्द करेल आणि त्यात यथोचित बदल करून पुन्हा निर्माण करेल. या पुनर्रचनेमध्ये सामान्यतः प्रसिद्ध असणाऱ्या कलमांसाठी नवीन क्रमांक दिलेले असतील. त्यानुसार कलम ४२० आणि ३०२ ही अनुक्रमे फसवणुकीची आणि खुनाची कलमे असणार नाहीत. प्रस्तावित भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ नुसार कलम ४२० हा फसवणुकीचा गुन्हा नसून, तो कलम ३१६ अंतर्गत समाविष्ट आहे. कलम ३१६ (१) नुसार, फसवणूक करणे, फसवणुकीचे वर्तन करणे,अप्रामाणिक…