जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली.यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता. कोरोना महासाथीनंतर ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस चालणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी…
Author: Kishor Koli
हैदराबाद ः वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी एकूण ११९ जागांसाठी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली.ते स्वत: गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना उमेदवारी नाकारली. घानपूर (स्टेशन) मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीने तिकीट नाकारल्यानंतर तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजैया भावूक झाले. त्यांना कार्यकर्त्यांसमोरच रडू कोसळले.आमदार राजैया यांचा रडतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राजैया हे घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले…
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत.पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांना पराभूत केले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र २०१४ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाकचौरे भाजपात गेले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र तिथेही त्यांना अपयश आले. यानंतर आता ते पुन्हा ठाकरे गटात…
सावदा,ता.रावेर : वार्ताहर येथून जवळील निंभोरा येथील पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसांची पदोन्नतीवर बढती झाली आहे. चार पोलीस नाईक कॉन्स्टेबल यांची हवालदार पदावर बढती झाली आहे. त्यात स्वप्निल सुधाकर पाटील, नितीन कृष्णा पाटील, अनिल नथू साळुंखे, जाकीर रफिक पिंजारी यांचा समावेश आहे. त्यांना बढतीचे प्रमोशन मिळाल्याने त्यांना प्रमोशनची फित येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, फौजदार काशिनाथ कोळंबे, फौजदार राका पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. यापूर्वीही पाच पोलीस हवालदारांचीही बढती झाल्याने ते सहाय्यक फौजदार पदावर सहाय्यक कामकाज करीत आहे. त्यात शेख अशरफ शेख अहमद, बाळकृष्ण मुकुंदा पाटील, विकास कृष्णा कोल्हे, विलास बालकराम झांबरे, ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांचा सहभाग आहे. याबद्दल बढती…
मलकापूर : प्रतिनिधी आपल्या शाहिरीतून ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीत महत्वाचे योगदान दिले. अण्णाभाऊंच्या विचारापासून समाजाने प्रेरणा घेऊन आगामी काळात संघर्षासाठी तयार रहावे. त्यामुळे वंचिताच्या हक्कासाठी लढणारे खरे क्रांतीकारक वादळ म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले. ते वडनेर भोलाजी येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समारंभात बोलत होते. वडनेर भोलजी येथे मातंग समाजाच्यावतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख होते. यावेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पारेकर वडनेर भो., सरपंच रवींद्र सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे…
मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा मलकापूर-नांदुरा विधानसभा क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्याने सदैव अग्रेसर बाळासाहेब दामोदर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन येथे प्रत्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह नुकताच प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक मुस्लिम बांधवांनीही प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने मलकापूर येथील उद्योगपती अशपाक खान, अफसर खान अनिस खान यांचा समावेश आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, जिल्हा महासचिव अतिश खराटे, ॲड. सदानंद ब्राह्मणे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे, गणेश वानखेडे जिल्हा सहसचिव, प्रल्हाद इंगळे, वसंत तायडे जिल्हा संघटक, अजबराव…
सोयगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी जरंडी ग्रामपंचायत भाजपने राखली आहे. भाजपाच्या स्वाती पाटील यांची मंगळवारी, २२ रोजी दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी नाना मोरे यांनी केली. राजकीय अस्तित्वात महत्वाची समजली जाणाऱ्या जरंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी अध्यासी अधिकारी नाना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच पदासाठी स्वाती पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे स्वाती पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभागृहात अकरा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते. दोन सदस्य अनुपस्थित राहिले होते. ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील हे सूचक होते. यावेळी सभागृहात तत्कालीन सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते…
यावल : प्रतिनिधी चार चाकी आणि दूचाकी वाहनांचा आणि त्या वाहनांवरील नागरिकांचा रस्ता अडवून सर्वसामान्य नागरिक जनता तसेच ये-जा करणाऱ्या दूचाकी आणि चार चाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि यावल पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. सोमवारी, २१ रोजी यावल येथे भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन सकाळी ११:४५ वाजेपासून सुमारे साडेचार वाजेपर्यंत आंदोलन केल्याने आंदोलनाची परवानगी मागणार उस्मान रमजान तडवी (रा.सावखेडासीम, ता.यावल) यांच्यासह यावल तालुक्यातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही नागरिक यांच्यासह ६१ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई सुशील घुगे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे…
सोलापूर ः वृत्तसंस्था छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे अशी टीका काँग्रेसचे सोलापूरचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे तसेच छगन भुजबळ यांना ब्राह्मण समाजाविषयी इतका आक्षेप होता तर मग ते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे काय बसले, असेही त्यांनी विचारले आहे. “छगन भुजबळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे.ज्या सावित्रीमाई फुले आणि ज्योतीराव फुले यांची नावं घेऊन त्यांनी राजकारण केले.त्यांचे साहित्यही छगन भुजबळ यांनी वाचलेले नाही. त्यांच्या नावे चुकीचा इतिहास भुजबळ सांगत आहेत. सावित्री माईंनी एक पुस्तक लिहिले आहे.त्या पुस्तकाचे नाव आहे काव्यफुले.या पुस्तकात त्यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार असे म्हटले आहे. छगन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अजून ताजे असताना संगीता, अंजूनंतर एका महिलेची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.प्रेमासाठी वर्षभराच्या मुलाला घेऊन ही महिला नोएडामध्ये पोहोचली आहे.प्राप्त माहितीनुसार या महिलेचे नाव सोनिया अख्तर असून ती बांगलादेशहून आली आहे. ट्रेंडिंग लव्ह स्टोरी! नोएडामधील सौरभ तिवारीने बांगलादेशमध्ये तिच्याशी लग्न केल्याचा दावा या महिलेने केला आहे.सौरभ कांत तिवारी जेव्हा नोकरीसाठी बांगलादेशमध्ये आला होता तेव्हा त्यांचे प्रेम झाले. त्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीने लग्न केले.आज त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. प्रेम प्रकरणाला वेगळे वळण सानियाने असा दावा केला आहे की,लग्नानंतर ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर सौरभने…