‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत

0
3

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली.यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता.
कोरोना महासाथीनंतर ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस चालणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची भेट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here