पटाया ः वृत्तसंस्था थायलँडमधील राजधानी पटाया येथे १८-२२ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या पटाया ओपनमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे या जोडगोळीने जबरदस्त कामगिरी केली. उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा ह्यांचा २-६ ६-४ १०-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका ह्या जोडी कडून ६-२ ६-० असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण ह्या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो यांच्यावर ४-६, ६-२, ११-९ असा शानदार विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली मात्र तिथे…
Author: Kishor Koli
बुडापेस्ट (हंगेरी) : वृत्तसंस्था भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजची सुवर्ण धाव कायम आहे.जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीपमध्ये अव्वल क्रमांक पटकावल्यावर नीरजने जल्लोष सुरू केला. नीरजला सुवर्ण मिळताच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. यादरम्यान कॅमेरामनसमोर पोझ देताना कॅमेऱ्यात एक अद्भूत क्षण कैद झाला. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरजने खांद्यावर तिरंगा घेतला. यावेळी त्याने कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोझ दिल्या.तितक्यात नीरजची नजर त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू अशरद नदीमकडे गेली. नदीम पाकिस्तानचा खेळाडू असून जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीपमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले. अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदीमला नीरजने त्याच्या जवळ बोलावले.नदीम लगेचच नीरजकडे धावला.…
इन्फाळ ः वृत्तसंस्था मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षातून राजकीय समाधान शोधण्यासाठी राज्य सरकारने आता एक पाऊल मागे घेत कुकी समुदायाची मागणी मान्य केली आहे. राज्याच्या डोंगराळ भागातील हिल कौन्सिलला स्वायत्तता देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे मात्र त्याचवेळी राज्याच्या अखंडतेला तडा जाईल,अशी कोणतीही इतर मागणी मान्य करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार कुकी समुदायाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांना जाणूनबुजून लक्ष्य करीत असल्याचा आरोप कुकी समुदायाने केला होता.यासाठी कुकी समुदायासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असावी,अशी मागणी कुकी समुदायाकडून करण्यात येत होती. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “कुकींकडून वेगळ्या प्रशासनाची मागणी करण्यात येत आहे.…
जयपूर ः वृत्तसंस्था देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपा नेतृत्वाखालील एनडीएकडून २०२४ मध्येही पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी दिली. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असेही गेहलोत म्हणाले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना…
जळगाव ः प्रतिनिधी पिंप्राळा येथील सेवानिवृत्त सहायक फौ२जदाराला सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत ३ लाखांची फसवणूक केल्याचीघटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील सेवानिवृत्त सहायक फौजदार पुरुषोत्तम सुपडू लोहार (वय ६३) हे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडे निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होती. त्यावेळी मुंबई येथील भैय्या पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैय्या पाटील यांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळेल,…
बुडापेस्ट (हंगेरी) : वृत्तसंस्था बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या ४४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये भारताला आतापर्यंत एकही पदक मिळालेले नाही. यावेळी देश नीरज चोप्राची वाट पाहत होता. दरम्यान, भारतीय पुरुषांच्या ४४०० मीटर रिले संघाने शनिवारी चमकदार कामगिरी केली आणि भारतासाठी आणखी एका पदकाच्या आशा उंचावल्या. भारतीय पुरुष रिले संघाने ४४०० मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद…
हिंगोली ः वृत्तसंस्था शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी विरोधकांच्या नव्याने निर्माण झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची तुलना दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी केल्यावरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसेच असे असेल तर मोदी दक्षिण अफ्रिकेला इंडियाचे पंतप्रधान म्हणून गेेले होते की,इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेेले होते असा सवाल ठाकरेंनी केला.ते रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीत बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. हिंगोली हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संतोष बांगर ठाकरेंच्या बाजूने होते. डोळ्यांत अश्रू आणत त्यांनी शिंदेंना माघारी…
बीड ः वृत्तसंस्था राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये शरद पवार यांची नुकतीच सभा पार पडली.त्यानंतर आज (रविवारी) धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचे पहिल्यांदाच बीड शहरात आगमन झाले.त्यांंचे बीडकरांनी जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले आहे.चौकाचौकात त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.अजित पवारांसोबत असलेले अन्य आठमंत्री देखील या रॅलीत सहभागी झाले.बीडच्या रस्त्यावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा दिसून येत नव्हती. स्वतः धनंजय मुंडे देखील अजित पवार ज्या ओपन जीपमध्ये…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सोडत व काका शरद पवार यांना थेट आव्हान देत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या गोष्टीला जवळपास दीड महिना उलटत आला. तर सत्तेत सहभागी झाल्यामुळे शरद पवार विरूद्ध अजित पवार असे राष्ट्रवादी पक्षातंर्गत युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवार हे त्यांच्या मतदारसंघ बारामतीत गेले नव्हते. तर आज शनिवारी ते बारामतीत दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी पाहता अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.…
नागपूर : वृत्तसंस्था विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपामध्ये येणार नाही, एवढे जाहीर करावे, ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची, हे लोकांच्या लक्षात येईल, असे आव्हान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात शनिवारी नेत्रदान पंधरवड्याच्या कार्यक्रमानिमित्त आले असता येथे मुनगुंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय वडेट्टीवारांनी भाजपाची ही शेवटची निवडणूक असल्याचे भाष्य केले होते.त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपाबद्दल विधान करण्यात अर्थ नाही. या विधानातून ते काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस, समाजवादी आणि भाजपा सर्व राजकीय पक्षांचा…