अजित गटाचे  शरद पवारांना थेट आव्हान!

0
2

बारामती : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सोडत व काका शरद पवार यांना थेट आव्हान देत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या गोष्टीला जवळपास दीड महिना उलटत आला. तर सत्तेत सहभागी झाल्यामुळे शरद पवार विरूद्ध अजित पवार असे राष्ट्रवादी पक्षातंर्गत युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवार हे त्यांच्या मतदारसंघ बारामतीत गेले नव्हते. तर आज शनिवारी ते बारामतीत दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी पाहता अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
जेसीबीच्या सहाय्याने पृष्पवृष्टी
अजित पवार यांचे बारामती शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जागोजागी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पृष्टवृष्टी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची व नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. अजित पवार ज्या गाडीत उभे होते. त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांना अभिवादन करत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्व काही चित्र स्पष्ट करत होते.
अजित गटाकडून शक्तीप्रदर्शन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. अजित पवार यांना आज बारामतीकरांकडून नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची कार्यकर्त्यांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्यासोबत आहेत. अजित पवार बारामतीतील कसबा चौकात दाखल झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबाने फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीत स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात कोणतीही कसूर सोडली नसल्याचं बघायला मिळाले.
पिंपरी चिंचवड येथे स्वागत
अजित पवार हे काल पिंपरी चिंचवड या मतदारसंघात गेले होते. त्यांच्या कालच्या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच मोदी-शहा यांचे आपल्या भाषणात कौतुक देखील केले. विकासासाठी मी सत्तेत सहभागी झालो, अशी भूमिका त्यांनी
मांडली.
सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ
अजित पवार यांचा विधानसभा मतदार संघ हा बारामती आहे. तर सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा मतदार संघ देखील बारामती आहे. परंतू आज झालेल्या जंगी स्वागतामुळे आगामी काळात पक्षफूटीचा परिणाम लोकसभा मतदार संघावर देखील होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सुप्रिया सुळेंचा मार्ग येत्या काळात सुखकर नसेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here