Author: Kishor Koli

कोलंबो ः वृत्तसंस्था आशिया चषक २०२३ चा शेवटचा सुपर-४ सामना भारत आणि बांंगलादेश यांच्यात कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात असून भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद २६५ धावा केल्या. शाकिब अल हसनने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. प्रथम फलंदाजी करताना बांंगलादेश संघाने आठ विकेट गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक…

Read More

कोलंबो ः वृत्तसंस्था पाकिस्तानला कोलंंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध २ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.या पराभवासह पाकिस्तानी संघ आशियाई चषक २०२३ मधून बाहेर पडला.या विजयासह श्रीलंंकेने अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. पराभवासोबतच पाकिस्तानला आणखी एक पराभव झाला आहे. वनडे क्रमवारीत त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यासोबतच टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान आयसीसीच्या क्रमवारीत एकदिवसीय संघात नंबर वन होता. याचा दाखला देत पाकिस्तानी दिग्गज आपल्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणत होते.आशिया चषकाचा प्रवास संपेपर्यंत पाकिस्तान संघ क्रमवारीत भारतापेक्षा मागे पडला आहे.पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ तिसऱ्या…

Read More

नागपूर ः वृत्तसंस्था मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का, असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन…

Read More

जालना : वृतसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर १७ व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले बेमुदत उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले…

Read More

साईमत जळगाव  प्रतिनिधी जिल्ह्यात अवघ्या चोवीस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील (वय २७) यांच्याकडे सुमारे चार एकर शेती आहे. यंदा शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीककर्जही घेतले होते. परंतु नैराश्यातून त्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी (वय ४२) यांनी कर्जाला कंटाळून आपल्या घरातील छताच्या लाकडी सरईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील तरुणाचा डेंग्यूमुळे बळी गेला. उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. देवेंद्र विकास बारी (वय १९) असे मयत तरुणाचे नाव आहे. शिरसोली मध्ये राहणार देवेंद्र विकास बारी हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याबाबत गावात माहिती कळताच गावकऱ्यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतकडून गावात फवारणी आणि साफसफाई सुरू असल्याची माहिती सरपंचांनी…

Read More

रावेर ः प्रतिनिधी राज्यात कांँग्रेस पक्षाच्यावतीने सदभावना रॅली काढण्यात येत आहे.अशीच एक रॅली रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांंच्या मतदारसंघात मंगळवारी काढण्यात आली. या रॅलीत धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे एनएसयूआयचे विद्यार्थी बाईक रॅलीत सहभागी झाले होते.त्याच रॅलीत सहभागी झालेला विद्यार्थी भुवनेश दालुराम कुमावत (वय १९) याचा अपघाती मृत्यू झाला.त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,रॅलीच्या आयोजकांनी अपघाताची घटना घडल्यानंंतर तत्काळ न कळवल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती साडेचार वाजता पोलिसांमार्फत पालकांना कळते त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी खिरोदा ते सावदा…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बहापुरा गावात अवैध दारू विक्री सुरू आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार केल्यानंतरही दारू विक्री बंद होत नसल्याने अखेर बहापुरा येथील ग्रामस्थांसह महिलांनी महिला सरपंच पल्लवी देविदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले. दारूबंदी करण्यासंदर्भात तक्रारवजा निवेदन सादर केले. अनेक नागरिकांसह महिलांनी दारू विक्रेत्यांना समजावायचा प्रयत्न केल्यास दारू विक्रेते अरेरावीची भाषा करतात. आमचे कुणीच काही करू शकत नाही, असे राजरोसपणे सांगतात. अशा सर्व दारू विक्रेत्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील सर्व रणरागिनी महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवत तक्रार वजा निवेदन दिले. बहापुरा येथील अवैध दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास लोकशाही पध्दतीने…

Read More

यावल : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास यावल तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आंतरवाली सराटी येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन पाठिंबा दर्शविणारा ठराव मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला. अंतरवाली सराटी, जि.जालना गेल्या १६ दिवसांपासून येथे कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहे. या उपोषणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. यावल तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, डी.बी.पाटील, वसंत गजमल पाटील, ललित विठ्ठल पाटील, सुनील दशरथ गावडे यांच्यासह समाज बांधवांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांना तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर पाठिंबा दर्शविणारा ठराव…

Read More

बोदवड : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीतून बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी संविधान बचाव भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. संविधान प्रेमी जनतेच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन सुरूवात झाली. डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ वंदन करून शेकडो भीम अनुयायींनी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. संविधान विरोधी वक्तव्य करणारे विवेक देबोटोरोय यांना कठोर शासन व्हावे, या मागणीचे पत्र तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी संविधान बदलविण्याची भाषा करणारे सत्ताधारी पक्षाचे मंत्री यांचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संविधान प्रेमींनी भाजप सरकारवर निशाणा साधत संविधान बदलण्याची भाषा जर करत असाल तर आज फक्त बौद्ध बांधवच रस्त्यावर उतरले आहेत. जर…

Read More