नवीदिल्ली ः वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, उशीर करु नये. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करा, कोणत्याही प्रकरणात अनिश्चितता असू शकत नाही. जवळपास ४ महिने झाले. तुम्ही कोणतीच कारवाई का केली नाही? असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनावले. आणि एका आठवड्याच्या आत पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा युक्तीवाद केला. त्याला अध्यक्षांच्या बाजूने महाधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तीवाद करुन उत्तर दिले. अनिल देसाई काय म्हणाले? दरम्यान,…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) झाल्याने नुकसान झालेल्यांसह ७८हजार केळी उत्पादक विमाधारकांना आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन रूपी केळीचे पान मुक्ताईनगर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देऊन केळी उत्पादकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी दुपारी केळीची पाने अंगावर लपेटून तसेच डोक्यावर केळीचे घड ठेवत जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे किशोर घटे, संभाजी पाटील, संदीप बेलदार, समाधान पांडे, ज्ञानेश्वर वानखेडे, पिंटू खाटीक, चुडामण पाटील, रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, भय्या पाटील आदी पदाधिकार्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक मोठ्या…
जळगाव: प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरु आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संंघ सहभागी झाले असून पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे. या स्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून या स्पर्धेला सुरवात झाली. रविवारी महाराष्ट्र विरूद्ध त्रिपूरा व तामिळनाडू विरूद्ध बंंगाल यांच्यात १४ षटकांचा सामना खेळविण्यात आला. त्यात महाराष्ट्र संघाने निर्धारित १४ षटकांत २ गडी बाद ८१ धावा…
लंडन:वृत्तसंस्था गतविजेत्या इंग्लंडने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.या संघातून दमदार खेळाडू जेसन रॉयला वगळण्यात आले आहे. ७ डावात त्याने ११५ च्या स्ट्राईक रेटने ४४३ धावा केल्या.यामध्ये एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.संघाला चॅम्पियन बनवण्यात रॉयने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी त्याचा वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या संंघात समावेश होता, पण आता त्याला वगळण्यात आले आहे. २०१९ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर रॉयने इंग्लंडसाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. जेसन रॉयच्या जागी हॅरी ब्रूकचा संघात समावेश करण्यात आला आहे.मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज ब्रूकचा विश्वचषक संघात समावेश न केल्याने बराच गदारोळ झाला होता. जेसन रॉय पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यांची मालिका या…
कोलकाता ः वृत्तसंस्था भारतीय रेल्वे स्थानकातील हा किस्सा आजही चर्चेत आहे. भारतातील एक रेल्वे स्थानक ४२ वर्षांपर्यंत बंद होते. हे स्थानक बंंद होण्यामागेही एक गोष्ट सांगितली जाते.पश्चिम बंंगालमध्ये असलेले बेगुनकोडोर असे या स्थानकाचे नाव आहे. पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून १९६०मध्ये हे सुरू करण्यात आले होते. या स्थानकातून ट्रेनतर जात होत्या मात्र, ४२ वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही. हे स्थानक अचानक का बंद झाले या मागे एक गोष्ट सांगितली जाते. बेगुनकोडोर स्थानक सुरू करण्यासाठी संथालची रानी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिले होते. रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर काही वर्षांपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होते मात्र, त्यानंतर एकदिवस अचानक विचित्र…
अमरावती : वृत्तसंस्था सूर्यमालेतील सर्वांत दूरचा व पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असलेल्या नेपच्यून ग्रहाची प्रतियुती १९ सप्टेंबर रोजी होत आहे. प्रतियुतीवेळी पृथ्वीच्या एका बाजूस ग्रह व विरुद्ध बाजूस सूर्य असतो. प्रतियुतीच्या दिवशी ग्रह पूर्वेस सूर्यास्तास उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. तसेच यावेळी तो पृथ्वीजवळ आल्याने मोठा व तेजस्वी दिसतो. या निळसर रंगाच्या ग्रहाला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे. जेव्हा ग्रह आणि सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आणि पृथ्वीजवळ असतो, तेव्हा त्याला प्रतियुती असे म्हणतात. या ग्रहाचे निरीक्षण केले असता फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. आज १९ सप्टेंबरला हा ग्रह पूर्व क्षितीजावर उगावेल व पश्चिमेकडे मावळेल. रात्रभर आकाशात…
नवीदिल्ली ः वृत्तसंस्था पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ७३ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे १३ हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीर आणि कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे.कर्जावर ५ टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. तुम्हाला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात १ लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात २ लाख रुपये मिळतील. ३० लाख कुटुंबांना फायदा देशातील नागरिकांचे कौशल्य…
कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषकातील भारत व श्रीलंकेतील अंतिम सामना भारताने दहा गडी राखून जिंकला.प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला केवल ५० धावात गारद करुन भारताच्या शुबमन गिल व इशान किसन या सलामी जोडीने ६.१ षटकात ५१ धावा ठोकून विजयश्री सहज खेचून आणली.या विजयाचा शिल्पकार ठरला तो महंमद सिराज.त्याने श्रीलंकेचे ६ फलंदाज बाद केले त्यातील एका षटकात ४ गडी तंबूत परतवून भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला.त्यास हार्दिक पंड्याने ३ बळी घेऊन साथ दिली. विजेतेपदाच्या या लढतीत श्रीलंकेने भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले.आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र…
मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंड येथील लहान मुले खेळत असतांना एका महिलेने त्यांना जेट्रोफाच्या बिया खायाला दिल्या. त्यानंतर त्यांना विषबाधा झाली. ही घटना काल घडली. विषबाधा झालेल्यांमध्ये सोहम नीना तायडे (वय १०), दिव्या संतोष कांडेलकर (वय १०), भाग्यश्री श्रीकृष्ण कांडेलकर (वय १०, नम्रता सुरेश सुरडकर (वय ८), रिया सुरेश बावस्कर (वय ६), वैष्णवी रमेश बावस्कर (वय१०), श्रेयश अशोक कांडेलकर (वय ८), श्रेया रमेश बावस्कर(वय ५), समर्थ सुरेश बावस्कर (वय अडीच वर्ष) अशा नऊ मुलांचा समावेश आहे. विषबाधा झाल्याने त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात…
यावल ः प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून यावल नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने यावल नगरपालिकेच्या महत्त्वाच्या आणि दैनंदिन कामकाजात संबंधित तत्कालीन तसेच विद्यमान मुख्याधिकारी हेमंत निकम,यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने यांनी यावल नगरपरिषदेत कामकाज करताना,आपले कर्तव्य निभावत असताना तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आदेश वजा लेखी सूचनांचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव त्यांना जबाबदार केव्हा धरणार? याबाबत यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून तशी प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाल्याचे समजते. यावल नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचेकडील स्थाई निर्देशानुसार यावल नगरपालिका हद्दीतील अनेक जमीन मालक विकासकांना जाहीर नोटीस देऊन प्रत्येकी २० लाख रुपयापासून…