टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवत आशिया चषक जिंकला

0
3

कोलंबो : वृत्तसंस्था

आशिया चषकातील भारत व श्रीलंकेतील अंतिम सामना भारताने दहा गडी राखून जिंकला.प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला केवल ५० धावात गारद करुन भारताच्या शुबमन गिल व इशान किसन या सलामी जोडीने ६.१ षटकात ५१ धावा ठोकून विजयश्री सहज खेचून आणली.या विजयाचा शिल्पकार ठरला तो महंमद सिराज.त्याने श्रीलंकेचे ६ फलंदाज बाद केले त्यातील एका षटकात ४ गडी तंबूत परतवून भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला.त्यास हार्दिक पंड्याने ३ बळी घेऊन साथ दिली.
विजेतेपदाच्या या लढतीत श्रीलंकेने भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले.आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराजने घेतलेल्या ६ व हार्दिक पांड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने फार वेळ न घेता ६.१ षटकात १० गडी राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. इशान किशन आणि शुबमन गिल यांनी नाबाद ५१ धावा करत टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
५ वर्षानंतर भारताने कोरले
आशिया चषकावर नाव
श भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते.गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here