हांगझोऊ : वृत्तसंस्था भारताची स्टार महिला गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला.रविवारी (१ ऑक्टोबर) तिने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात कोणतेही पदक जिंकणारी आदिती ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.या स्पर्धेच्या या आवृत्तीत गोल्फमध्ये भारताचे हे पदक आहे.सुवर्णपदक जिंकण्यापासून ती नक्कीच हुकली पण तिने एक मोठी कामगिरी करत आपल्या नावावर ऐतिहासिक नोंद केली. अदितीला रविवारी महिला गोल्फ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली लय राखता आली नाही. तिने अप्रतिम फटका मारला मात्र, तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अदितीने तिसऱ्या फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर सात शॉट्सची मोठी आघाडी घेतली होती. एका बर्डीविरुद्ध चार बोगी आणि…
Author: Kishor Koli
कोल्हापूर/जुन्नर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे तसेच ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (१ ऑक्टोबर) ब्रिटनला रवाना झाले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तसेच सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये,असे मत व्यक्त केले. या वादावर आता राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार…
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन नियम लागू होतात. बदल होणारे हे नवे नियम सामान्यांच्या खिशावर परिणाम करतात. १ ऑक्टोबर २०२३ पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. सीएनजी-पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, आता १ ऑक्टोबरपासून वाहन परवाना, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या दरात बदल केला जातो. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोल दरामध्ये वाढ…
मुंबई : प्रतिनिधी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल ओबीसी समाजाच्या सर्व पक्षीय बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सादर केला. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. याचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. समाजातील विविध घटकांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. यातच राज्यातील मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण २७ टक्के आहे. असे असले तरी शासकीय…
हांगझाऊ : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेने इतिहास रचला आहे. कारण ऋतुजाने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आह.ऋतुजाला यावेळी रोहन बोपण्णाने सुरेख साथ दिली आणि त्यामुळेच भारताला हे सुवर्णपदक जिंकता आले आहे. चीनमधील हँगझोऊ येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये भारताच्या ऋतुजाआणि रोहन यांना पराभव पत्करावा लागला होता पण या दोघांनी हार मानली नाही.या दोघांनी दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि हा सेट ६-३…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. स्कॉशमध्ये भारताच्या पुरुषांच्या संंघाने पाकिस्तानचा पराभव करत सुवर्ण जिंकले. भारतीय संघाने अतिशय चुरशीच्या लढतीत पाकिस्तान २-१ असा पराभव केला.स्कॉशमधील या सुवर्णपदकासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १० झाली आहे तर १३ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण पदकांची संख्या ३६ झाली आहे. स्कॉशमधील अखेरच्या सामन्यात भारताच्या अभय सिंहने पाकिस्तानच्या जमान नूरचा ११-७, ९-११, ७-११, ११-९ आणि १२-१० असा पराभव केला आणि देशाला सुवर्ण जिंकून दिले. पुरुष संघातील पहिल्या सामन्यात सौरव घोषालने मोहम्मद आसिम खानचा पराभव केला होता तर महेश मंगाओंकरचा पाकिस्तानच्या नासिर इकबालकडून पराभव झाला. अखेरच्या निर्णायक…
मुंंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकारला मिळणार आहेत. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडून तीन वर्षांसाठी कर्जावर ही वाघ नखं दिली जाणार आहेत, असे सांस्कृतिक कार्य विभागाने या आठवड्यात जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयात हे मौल्यवान शस्त्रं सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली जातील,असे सरकारने म्हटले आहे. लंंडनमधून वाघ नखं परत आणण्याबाबत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघ नखांचे प्रदर्शन…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले आणि ही परंपरा थांबली. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाईनंतर शिवाजी पार्कवर पार पडला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला. यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडूनही पालिकेच्या दादर जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षी मेळाव्याला मैदान देण्यास पालिकेकडून टाळाटाळ झाल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने पालिकेची प्रशासकीय कार्यवाही…
मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आकडेवारीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. भुजबळांनी मांडलेल्या आकडेवारीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. आकडेवारी खरी असेल, तर दाखवून द्या, असे थेट आव्हानच अजित पवारांनी भुजबळांना केले. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय आणि काही संघटनांसह बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ हजर होते. यावेळी इतर मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना छगन…
जळगाव : प्रतिनिधी राज्यभरात गणेश विसर्जन करताना अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. नाशिक, मुंबईसह काही ठिकाणी मुर्ती विसर्जन करताना काहींचा बुडून मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी वाहनांचा अपघातही घडला आहे. केवळ काळजी न घेतल्यामुळे लोकांनी विघ्न ओढवून घेतले आहे. विघ्नहर्त्याला निरोप देताना विसर्जन निर्विघ्न कसे पार पडेल हे पाहिले पाहिजे. खान्देशातही धुळे, जळगाव, नंदुरबारात अप्रिय घटनांमुळे गालबोट लागले आहे. जळगावात वाद, सात जणांवर गुन्हा दाखल कोर्ट चौकात गणपती विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरून मंडळांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मिरवणूकीत रांग लागण्याच्या…