जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे जाणवत आहे.जिल्ह्यात जी पर्यटनस्थळे आहेत,ती विकसीत व्हावी अशी जिज्ञासा लोकप्रतिनिधींमध्ये असणे आवश्यक आहे मात्र जिल्ह्यातील काही काळ सोडला तर बहुअंशी लोकप्रतिनिधींनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.यासाठी गेल्या ५० वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध झाला असता तर जिल्ह्यातील पर्यटने स्थळे पूर्णपणे विकसीत होऊन पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले असते तसेच राज्य शासनाच्या तिजोरीत निश्चितच भर पडली असती आणि त्याचबरोबर लहान व्यावसायिकांना,महिला बचत गटांनादेखील आर्थिक पाठबळ मिळाले असते व पर्यायाने रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या असत्या.पण याकडे लक्ष देऊन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता बोटावर मोजण्याइतपत लोकप्रतिनिधी सोडले तर कोणालाही त्याची…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी बीसीसीआयकडून परवानगी घेऊन आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सोमवारी 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्या येथे राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ बुधवार, 17 जानेवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर दोन दिवसांचा ब्रेक घेणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 20 जानेवारीला संघ हैदराबादमध्ये एकत्र येणार आहे. 16 सदस्यीय संघ हैदराबादमध्ये आल्यावर लगेचच सराव सुरु होईल मात्र क्रिकबझमधील वृत्तानुसार, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोहली 21 जानेवारी रोजी सराव सत्रानंतर अयोध्येला जाणार आहे. कोहली व अनुष्का शर्माच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका देण्यात…
अक्कलकोट : वृत्तसंस्था काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपुर्वीच काँंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून कांँग्रेसला खिंडार पाडण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. आपल्याला भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान सुशिलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजप या असे म्हणत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले मात्र पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस आमच्या रक्तात आहे,आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा ग्रॅण्ड मास्टर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.सध्याचा विश्वविजेता असलेल्या डिंग लिरेनचा पराभव करत प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत त्याला पराभूत केले.या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-1 भारतीय ग्रंँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद फाईडच्या लाइव्ह रँकिंगमध्ये 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे 2748.3 गुण आहेत तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे. आनंदचे 2748.0 गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे. प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम…
जळगाव : प्रतिनिधी साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे, जसे आहेत तसेच व्यक्त व्हावे अनन्यसाधारणत्व, युनिकपणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी श्रीमती सुमती लांडे, (श्रीरामपूर), कवी म्हणून बालकवी ठोंबरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सीताराम सावंत यांना (इटकी, जि. सातारा) यांना वितरण करण्यात…
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन लवकरच संपणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची असलेली ‘सगे सोयऱ्यां’ची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही.राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत की काय, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार…
चाळीसगाव : प्रतिनिधी घराबाहेर खेळणाऱ्या एका ११ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट खाण्यास देऊन तसेच वडिलांना मारण्याची धमकी देऊन भंगार खरेदी विक्री करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शहरात एका भागात घडली आहे. याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे. पीडित ११ वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. तेव्हा भंगार विक्रेता अशफाक खान रऊफ खान याने चिमुकलीला चॉकलेट व १०० रूपये दिले. चॉकलेट खाण्यास सांगून सांगितलेले चॉकलेट न खाल्ल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी देऊन चिमुकलीला एकाच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अशफाक खान रऊफ खान याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.…
जळगाव : प्रतिनिधी श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. येथील जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी आज(मंगळवारी) हे आमंत्रण अशोक जैन सन्मानपूर्वक प्रदान केले. निमंत्रण आनंददायी व भूषणावह “श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. श्रीराम…
मेलबोर्न : वृत्तसंस्था भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचत मोठी कामगिरी केली आहे. त्याने अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत मोठा अपसेट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. अलेक्झांडरचे या स्पर्धेत वे३१ मानांकन होते. त्याचा पराभव करत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुमित नागल २०१३ नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. सोमदेव देवबर्मनने २०१३ मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. १९८९ नंतर…
आंतरवाली सराटी : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग व रुपरेषा जाहीर केली आहे त्यानुसार, ते २० तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून निघणार असून, २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकारविरोधात शड्डू ठोकलेत. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना आपल्या मुंबई आंदोलनाचा संपूर्ण मार्ग व रुपरेषा जाहीर केली. ते म्हणाले की, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी आम्ही २० जानेवारी रोजी सकाळी ९ वा. आंतरवाली सराटी येथून निघणार. मराठा समाजातील सर्वजण १०० टक्के मुंबईला येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क…