नवीदिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. यासाठी कर्णधारपद के एल राहुलला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत त्यानेच दिले आहे. के एल राहुलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याला दोन आठवडेही शिल्लक नाहीत. अद्याप टीम इंडियाची घोषणा झाली नाही. मात्र आता टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आगरकर यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सामन्यासाठी कर्णधार म्हणून कोणाची निवड करणार यावर चर्चा होत आहेत.भारताचा टी-२०…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे. याशिवाय, ड्रोन सखी योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.ड्रोन उडवणाऱ्या महिलेला दरमहा १५ हजार रुपये आणि सहाय्यकाला १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना १ जानेवारी २०२४…
मुंबई : प्रतिनिधी दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या गंभीर प्रश्नांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. या मोर्चा दरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव येथे, १ डिसेंबर २०२३ रोजी दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेत निवेदन करताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, अवकाळी पावसाने हैराण झाला आहे. कालच्या पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि युवतीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून संबंधित युवतीनेच ओळखीच्या युवकांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे उघड झाले आहे. खुद्द पीडित युवतीकडूनच पोलिसांना अशी माहिती देण्यात आल्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे दौलत बंगल्यात २५ नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा वाजता चार ते पाच दरोडेखोर चेहरा कापडाने झाकून शिरले. त्यांच्याकडे बंदूक आणि चाकू असे शस्त्र होते. घरातील ज्योत्स्ना पाटील (४०) यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत त्यांनी घरातील सोने,चांदीच्या दागिन्यांसह ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ज्योत्स्ना यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांचे हात-पाय…
मुंबई : प्रतिनिधी देशात वातावरणात मोठे बदल घडले असून आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी यासंबंधी अलर्ट जारी केला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हळूहळू ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची चिन्हं आहेत. २ डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या मिचांग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच…
नाशिक : प्रतिनिधी राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर ३०९२ जातीवाचक नावापैकी २९२९ जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यात ग्रामीण भागातील २ हजार ४९० जातीवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहे. ग्रामीण भागात शंभर टक्के काम झाल्याबद्दल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आला होते, त्यावेळी श्री. गमे बोलत होते. विभागीय समितीच्या बैठकीप्रसंगी…
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काल हा निर्णय जाहीर केला. फक्त राहुल द्रविडच नाही तर त्यांच्यासोबतचा अन्य सपोर्ट स्टाफ विक्रम राठोड, टी दिलीप आणि पारस म्हांबरे यांचा देखील कालावधी वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची निवड होण्याची शक्यता आता मावळली आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सलग १० विजयांसह अंतिमफेरी गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला होता पण कर्णधार रोहित शर्मा आणि…
मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या. आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात ते पुढे असे म्हणातात की, बळीराजा हा सातत्याने…
पुणे : प्रतिनिधी राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आता मराठा समाजाकडून सरकारवर दबाव वाढत आहे. अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यावेळी जर राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले नसते तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तेव्हाच मिटला असता असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता आला तेवढा मी केला. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला. त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी…