जयपूर : वृत्तसंस्था यंदाच्या निवडणुकीत राजघराण्यातील सहा सदस्यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी पाच सदस्यांनी भाजपाच्या तिकिटावर तर एकाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यापैकी चारजणांना जनतेने स्वीकारले आहे. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे झालावाडच्या झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून 52 हजार मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित आहे.वसुंधरा राजे ग्वाल्हेरची राजकन्या आणि धोलपूरची राणी आहेत. जयपूरची राजकुमारी आणि भाजपच्या उमेदवार दिया कुमारी यांनी विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आतापर्यंतच्या गणनेनुसार दिया कुमारी यांनी काँग्रेसचे उमेदवार सीताराम अग्रवाल यांना 71368 मतांनी मागे टाकले आहे. दिया कुमारी ही महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची कन्या. 2019…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत १४ ते १५ जागा लढवणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दावामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा शरद पवार गटाला तर त्यानंतर उर्वरित वाटा काँग्रेसला मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या १४ ते १५ जागा लढवणार आहे. यात बारामती, अमरावती, भंडारा, सातारा,शिरूर,रायगड, रावेर,दिंडोरी आदी मतदार संघांंचा समावेश आहे, असे जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस दाखवणार मोठेपणा दुसरीकडे, महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास निश्चित…
जालना : वृत्तसंस्था जालना येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कांँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर आज(शनिवारी) अज्ञातांनी हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी गाडीत टोपे यांचा चालक होता. तो बालमबाल बचावला. हल्लेखोरांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे. लोखंडी दांडा, ऑईलची बाटली जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्याखाली राजेश टोपे यांची गाडी उभी होती. या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील सापडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर हल्ला केल्याचे समजते. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पाठवले होते, त्या मेल आयडीचा पुरावाच ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर केला आहे. यामुळे शिंदे गटाच्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे गटाने २२ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या एका ईमेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला ईमेल चुकीचा आहे.तो शिंदेंचा नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे बैठकीला उपस्थित…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आडगाव गावातून कत्तलीच्या उद्देशाने ३ बैल पायी हाकत नेत असताना गोरक्षकांनी त्यांना थांबवत शहर पोलिसांना कळविल्यावर त्याठिकाणी जाऊन शहर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. केलेल्या कारवाईचा राग आल्याने शेकडोंचा जमाव रात्री शहर पोलीस स्टेशनला धावून आला. पोलिसांनी कारवाई करु नये, याकरीता अवैध गर्दी गोळा करुन दबाव निर्माण करणे, धमक्या देणे हा प्रकार पोलीस स्टेशनच्या खालील चौकात सुरु होता. त्याठिकाणी सुद्धा जमाव पोलिसांचे काहीच ऐकुन न घेता उलट गोंधळ घालीत होता. त्यामुळे शेवटी पोलीसी खाक्या दाखवत जमावाला पळवून लावले. दरम्यान, अवैध गोतस्कारांची मुजोरी वाढली असून चक्क खाकी वर्दीवर हात उचलला…
मालेगाव : प्रतिनिधी गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याप्रकरणी मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानाची दावा दाखल केला होता. याप्रकरणाच्या सुनावणीला संजय राऊत यांनी आज (२ डिसेंबर) न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीनंतर संजय राऊतांनी दादा भुसेंंवर हल्लाबोल केला आहे. संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिला आहे, असं म्हणत राऊतांनी भुसेंवर टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत म्हणाले, “गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रूपये गोळा केले. हे पैसे शेतकऱ्यांचे असून, त्याच्या पावत्याही आहेत. याचा हिशोब मागितला, तर आम्ही गुन्हेगार झालो…
रायपूर : वृत्तसंस्था भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले आहे. चौथ्या टी-२० सामन्यात ऋतुराजला मोठी खेळी साकारत आली नसली तरीही त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडने विशेष कामगिरी केली आहे.त्याने त्याच्या या कामगिरीसह दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. ऋतुराज गायकवाड हा २० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी, गायकवाडला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ४ हजारचा आकडा गाठण्यासाठी सात धावांची गरज होती, ज्यामुळे त्याने ही खास कामगिरी केली आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर…
धुळे : प्रतिनिधी मराठा आरक्षणावरून काही दिवसांपूर्वी बीडमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. संतप्त आंदोलकांनी काही आमदारांच्या घरासह मालमत्ता आगीच्या हवाली केली होती. या प्रकरणावरून पोलीस प्रशासन ॲक्शनमोडमध्ये आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे तर अनेक आंदोलक पोलिसांच्या रडारवर आहेत. शिवाय बीड येथील हिंसाचार प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता स्वत: जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे सरकारने म्हटले होते पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार…
कर्जत (अहमदनगर): वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास चार महिने उलटले. सध्या निवडणूक आयोगासमोर पक्ष व पक्षचिन्ह कुणाचं? यासंदर्भात सुनावणीही चालू आहे मात्र, यादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केले आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. पवारांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय घडलं? ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया…
कर्जत (अहमदनगर) : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावे, त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करू नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. भुजबळांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व स्तरातून त्यांचा विरोध केला जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे विधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे.तुमच्या नेत्याचा…