अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीआधी मंदिर खुले होणार असल्यामुळे याकडे संबंध देशाचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर ८००० व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांसह देशभरातून संत,अध्यात्मिक गुरू, सेलिब्रिटी, सनदी अधिकारी, संरक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला कोहली आणि तेंंडुलकर यांच्याशिवाय उद्योगपती मुकेश…
Author: Kishor Koli
पुणे : प्रतिनिधी राज्यातील तीन माजी लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी माजी शिक्षणाधिकारी किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त तुकाराम नामदेव सुपे, विष्णू मारुतीराव कांबळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे आणि किरण आनंद लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार, मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे. सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ आणि ‘जम्मू काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयका’वर चर्चा करताना एक मोठी घोषणा केली. शहा यांनी राज्यात परिसीन झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची घोषणा केली. ज्या लोकांवर गेल्या ७० वर्षांपासून अन्याय झाला, अपमान झाला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यांना हे विधेयक न्याय देईल. आता जम्मू-काश्मीर विधानसभेत १०७ जागा आहेत. मतदारसंघाची पुनर्रचनेनंतर त्यांची संख्या ११४ इतकी झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापित लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आल्याची घोषणा शहा यांनी केली. त्याच बरोबर जम्मू-काश्मीरमधून विस्थापीत झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ३…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो असे बोलले जाते, असा गंभीर आरोप करणारं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी लिहिले आहे. या पत्रात त्यांनी गैरव्यवहाराचे अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यात त्यांनी जळगावातील भ्रष्टाचार प्रकरणावर बोट ठेवले आहे. जळगावात २०२० मध्ये ‘कोविड’ खरेदीत अनियमितता दिसून आली. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला जास्तीचा वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारदेखील आगामी काही दिवसात लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत आहे. बुधवारीच केंद्र सरकारने प्रत्येक अपघात ग्रस्ताला कॅशलेस उपचार सुविधांची घोषणा केली आहे, हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपकडे सर्वाधिक लोकसभेच्या जा गा आहेत. त्या जागा कायम ठेवण्याची तयारी भाजपने केली आहे. याशिवाय, ‘मिशन ४००’ गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्वच राज्यांमध्ये जागा जिंंकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे…
मुंबई : प्रतिनिधी ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकली आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सुरुची अडारकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. यात तिने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सुरुची ही नववधूच्या रुपात पाहायला मिळत आहे. तर अभिनेता पियुष रानडे हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे. सुरुची अडारकरने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा…
वाशिम : प्रतिनिधी आपण राम फळ, सीताफळ पाहिले असेल, पण आता हनुमान फळही शेतकरी उत्पादीत करू लागले आहेत. सीताफळ आणि राम फळ याच प्रजातीचे हे फळ आहे. ते आकाराने देखील मोठं आणि चवीलाही अत्यंत गोड आहे. मागील २० वर्षांपासून या फळाची यशस्वी शेती वाशिम जिल्ह्यातील असोला गावातील शेतकरी विठ्ठलराव बरडे हे करतात. अत्यंत कमी पाण्यात येणारं हे पीक आहे. कोणतेही रासायनिक खत किंव्हा फवारणीची याला गरज नसते, असं ते सांगतात. या फळांचे शास्त्रीय नाव ऍनोना २ असे असून स्थानिक भाषेत त्याच्या आकारामुळे त्याला हनुमान फळ असं नाव पडलंय. या फळात कँसर प्रतिरोध औषधी गुणधर्म असल्याचंही सांगितलं जातं. तर इतरही आजारांवर…
मुंबई : प्रतिनिधी रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ॲनिमल सिनेमा चित्रपटगृहात तुफान कमाई करत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. या सिनेमाला सेंसर बोर्डकडून अडल्ट सर्टिफिकेट मिळालं असतानाही भारतासह जगभरात सिनेमा बंपर कमाई करत आहे. सिनेमाने ६३.८ कोटींची ओपनिंग केली. त्यानंतर सिनेमाची कमाई सतत वाढतेच आहे. ॲनिमल सिनेमाने मंगळवारी हैराण करणारी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ॲनिमल आणि जवान सिनेमाची तुलना केल्यास रणबीरचा सिनेमा वरचढ ठरला आहे. ॲनिमल सिनेमाने यावर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण आणि गदर २ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. ॲनिमल सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला होता, तर जवान सिनेमा गुरुवारी प्रदर्शित झाला होता.…
परळी : वृत्तसंस्था बीड म्हटले की मुंडे कुटुंब आणि दोन भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण आता पंकजा मुंडेंशी असलेला राजकीय संघर्ष संपला असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बीडमधील नागरिकांसाठी हा मुद्दा राजकीय चर्चेचा ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही भावंडांमध्ये असणारा राजकीय वर्चस्वाचा वाद आता संपल्याचं खुद्द धनंजय मुंडेंनीच जाहीर केल्यामुळे आता दोघेही आगामी काळात एकत्र महायुतीचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजि पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण त्यांच्यासमवेतच बीडचे पालकमंत्री…
मलकापूर : प्रतिनिधी शहरातील एका शाळेच्या आवारातील टीन पत्र्यांच्या खोलीतून पोलिसांनी दोन ते तीन प्रिंटिंग मशीन ताब्यात घेतल्या आहेत. या मशीन कुख्यात जग्गू डॉनच्या असल्याचे सांगितले जात आहे. या मशीन बनावट नोटा छापण्याच्या असल्याचेही सांगितले जात आहे. अधिक माहिती अशी की, येथील गणवाडी रोडवरील गुरुद्वाराच्या पाठीमागे एका नेत्याच्या शाळा परिसरात टीनपत्र्याच्या खोलीत दोन ते तीन प्रिंटिंग मशीन आणि ८ते ९ सुटे भाग पोलिसांना आढळून आले. सदरची कारवाई ४ डिसेंबर रोजी रात्री १० सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या मशीन जग्गू डॉनच्या असल्याचे सांगितले जात असून, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रिंटिंग मशीन…