नांदेड : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुरू झालेला असताना आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतली आहे.त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला आहे. छगन भुजबळांनी काल (१० डिसेंबर) इंदापूर येथील ओबीसी एल्गार सभा गाजवली.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी तुफान शब्दफेक केली.त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिल. ते म्हणाले, छगन भुजबळ कुठेही बरळतात. आम्ही त्यांना किंमत देत नाही. त्यांना उत्तर द्यायचे नाही. जरा शहाणा माणूस असेल उत्तर देता येते. ते कामातून गेले आहेत. त्यांनी लवकरच गोळ्या घेतल्या म्हणजे बरे. पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही…
Author: Kishor Koli
पुणे : प्रतिनिधी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. तर, मराठा समाजाला ओबीसीतील कुणबी जातप्रमाणपत्र हवं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. यातूनच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील अशा कृती घडत आहेत. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल (९ डिसेंबर) इंदापूर येथे चप्पल फेकण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. आता, त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत संयमाने आणि शांततेने महाराष्ट्रातील एल्गार मेळाव्यातून आरक्षणाबाबतची भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा झाल्यानंतर, शेतकऱ्यांच्या दूधाला दर मिळावा…
नागपूर : वृत्तसंस्था उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा मार्गावरील पुलाखालील नाल्यात १५० पेक्षा अधिक काडतुसे आढळून आली. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक नागरिक लघुशंकेसाठी पुलावर थांबवला. त्याला नाल्यात पिशवीत काडतुसांचा साठा दिसला. त्याने गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त डॉ.अभिजित पाटील, गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सगडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी बॉम्बशोधन नाशक पथकालाही…
जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी उपोषण,आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले.या लाठीमाराबाबत एक मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना जरांगे पाटील म्हणाले, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही.…
जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रूग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या. घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेशहून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी…
भुवनेश्वर : वृत्तसंस्था काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व ओडिशा आणि रांची येथील कार्यालयात आयकर विभागाची अजूनही झाडाझडती सुरू आहे. साहू यांच्या संबंधीत संस्थांवही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत या छापेमारीत बेहिसाब रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लवकरच हा आकडा २९० कोटींचा आकडा पार करु शकतो, असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळे धन आहे. या व्यतिरिक्त ३ सूटकेस ज्वेलरी सापडली आहे तर, आत्तापर्यंत २५० कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशाच्या सरकारी बँकेच्या खात्यात सातत्याने रोख रक्कम जमा केली जात आहे. छाप्यात सापडलेली रक्कमेत ५००च्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘जगातील कुठलाही प्रशिक्षक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसारखा कलाकार घडवू शकत नाही,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी शमीचे कौतुक केले आहे. वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत शमीने सात सामन्यांत सर्वाधिक २४ विकेट घेतल्या होत्या. तो भारताचा वन-डे आणि कसोटीतील प्रमुख गोलंदाज झाला आहे. आपल्या पडत्या काळात म्हांब्रे यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा उल्लेख शमीने आवर्जून केला आहे.त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये विकेट घेतल्यानंतर तो डोक्यावर चेंडू घासून म्हांब्रे यांना यशाचे श्रेय देत होता. मात्र, शमीच्या यशात आपला काहीच वाटा नसल्याचे म्हांब्रे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले. शमीसारखा दुसरा गुणवान गोलंदाज भारताला मिळेल का, या…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान काल शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने हुकमी अस्त्र बाहेर काढले आहे. शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या. यामध्ये सध्या शिंदे गटात असणाऱ्या आमदारांसहित २३ जणांच्या सह्या आहेत. त्यामुळे ही…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी तसेच विक्रीचे प्रमाण वाढत असून हा मुद्दा शुक्रवारी विधानपरिषदेतदेखील उपस्थित करण्यात आला. राज्यातील ड्रग्जविरोधात पोलीस विभागाची लढाईच सुरू आहे. मात्र जर ड्रग्जविक्री करणाऱ्या आरोपींसोबत कुणी हातमिळावणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल तर कलम ३११ अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांला थेट सेवेतून बडतर्फच करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता. खोपोलीत ७० ते ८० किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी मांडली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी राज्य शासनाची भूमिका मांडली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल…
पहुर, ता.जामनेर : वार्ताहर तालुक्यातील पहूर येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्रीला शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने पितापुत्री गंभीर जखमी झाले. त्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून संतप्त ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको करून रस्ता रोखून धरला. रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले होते. ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (वय ११, रा. पहूर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील शंकर भामेरे हे पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी ही आई, वडील, भाऊ, बहीण, आजोबा, काका यांच्यासह राहत होती. ज्ञानेश्वरी ही डॉ. हेडगेवार विद्यालयात शिकत होती.…