अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दिडशे जिवंत काडतुसे

0
2

नागपूर : वृत्तसंस्था

उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा मार्गावरील पुलाखालील नाल्यात १५० पेक्षा अधिक काडतुसे आढळून आली. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक नागरिक लघुशंकेसाठी पुलावर थांबवला. त्याला नाल्यात पिशवीत काडतुसांचा साठा दिसला. त्याने गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त डॉ.अभिजित पाटील, गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सगडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी बॉम्बशोधन नाशक पथकालाही बोलाविले.
बॉम्ब शोध आणि नाशक पथकाने तब्बल तीन तास या परिसराची संपूर्ण कसून पाहणी केली मात्र, अन्य कोणीतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या घटनेचे वृत्त समजताच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले. एटीएसचे अधिकारी येथे आल्याने घातापातासाठी या काडतुसांचा वापर होणार होता का? अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. याबाबत पोलिसांनी अत्यंत गोपनियता बाळगली असून, याप्रकरणाबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here