Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आदित्य ढवळे-पाटील सेवाभावी बहुउद्देशीय संस्था शहरी बेघर निवारा केंद्रातील आठ लाभार्थ्यांवर रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे नुकतीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. आज मंगळवार, दि. ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी या केंद्राला भेट देऊन संबंधित मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून प्रकृतीची विचारपूस केली. महापालिका उपायुक्त श्याम गोसावी, गायत्री पाटील, रोटरी क्लब ऑफ जळगावचे मनोज जोशी, सचिव संदीप शर्मा, अध्यक्ष योगेश गांधी, डॉ. तुषार फिरके, शहर बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, मनोज मराठे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी महापौर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगावातील विविध भागातील जुगार अड्ड्यावरून पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज धाड टाकून ८ ते १० जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधूर वाडा आणि शिरसोली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज दुपारी धडक कारवाई करत सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनदास मेहता हॉस्पीटलच्या बाजूला एका दुकानावर, शनीपेठ परिसरात दोन ठिकाणी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ममूराबाद रोडवरील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेतून 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ममुराबाद रोडवरील चौगुले प्लॉट, मारुती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रसाद संजय कासार (वय – 23) यांचे ममुराबाद रोडवरील हॉटेल श्री च्या बाजूला मोकळ्या जागेत सुरज बँड कंपनीचे पेपर कटींग मशीन लावले होते. 1 ते 15 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरुन नेले. सोमवार, ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । घंटागाड्यांचा दुरुस्ती व शासकीय कर वॉटरग्रेस कडूनच वसूल करावा व मालमत्तांचे फेरमूल्यांकन रद्द करावे याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगरतर्फे आयुक्त कुलकर्णी व महापौर जयश्री महाजन यांना दिले. जळगाव शहर महानगरपालिकेने वॉटरग्रेस कंपनीला संपूर्ण जळगावचा सफाईचा ठेका दिलेला असुन कचरा संकलन करण्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या 143 नव्या घंटागाड्या विनामूल्य उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. धुळे महानगरपालिकेने याच कंपनीला धुळे महानगरपालिकेच्या मालकीची वाहने किलोमीटर दरानुसार भाडेतत्त्वावर दिलेली आहेत . अर्थतातच जळगाव महानगरपालिकेने जनतेच्या व शासनाच्या पैशांची उधळपट्टी केली आहे . एवढे सर्व बेकायदेशीरपणे घडत असताना गेल्या दोन वर्षापासून सर्व वाहनांचा सर्विसिंग कालावधी सुध्दा निघून गेलेला असल्याने व…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणावर किरकोळ कारणावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला झाल्याची घटना २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील तरूणावर किरकोळ वादावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवारी २ जानेवारी रोजी रात्री घडला होता. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निलेश दिलीप गडकर (वय-२१) रा. चिंचोली ता.जि. जळगाव हा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी २ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास निलेश हा घरी असताना त्याच्या…

Read More

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिलेचा एक लाखांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांमंडळींविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील साकळी येथील विवाहितेला १ लाखासाठी सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या शमिमबी शेख अनवर (वय-२२) यांचा विवाहित यावल शहरातील आयशा नगरातील शेख अनवर शेख मुसा यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शेख अनवर शेख मुसा याने विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या…

Read More

गलवान, वृत्तसंस्था । गलवान खोऱ्यात चीनचा ध्वज फडकवल्याच्या दाव्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी या प्रदेशात त्यांचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता त्याच ठिकाणी उभं राहून भारतीय जवानांनी तिथं तिरंगा फडकवला आहे. त्यामुळे आता चीनचे दावे फोल ठरले आहेत. तत्पूर्वी, मीडियाने वृत्त दिले की चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. भारत सरकारने गेल्या गुरुवारी सांगितले की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे स्वतःच्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि असे ठामपणे सांगितले आहे की सीमावर्ती…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल येथे सोमवार दि.3 रोजी यावल येथील माळी क्लास मधे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळी येथील शारदा विद्या मंदिराचे उपाध्यक्ष सुभाष महाजन उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले प्रतिमा पुजनानंतर क्लासमधील विद्यार्थिनींनी आपले लक्षवेधी उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात बऱ्याचशा विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित होत्या.त्या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच शोभनीय दृश्य प्राप्त झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी साने गुरुजी विद्यालयाच्या शिक्षिका विद्या प्रकाश महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे वाटप केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे सुभाष महाजन,शारदा विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ बोरसे सर,…

Read More

धरणगाव, प्रतिनिधी । येथील कै. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय येथे अंध: करातून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन प्रतिमेचे पूजन डॉ अश्विनी वाघ,डॉ.डी एस वाघ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पत्रकार धर्मराज मोरे,योगेश पी.पाटील,अनिल महाजन,रवींद्र पाटील,खैरनार आप्पा,दिपक गायकवाड,उमेश जाधव,नंदू पाटील,संजय चौधरी आदी उपस्थित होते.

Read More