जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील 10 ते 12 सर्वपक्षीय सदस्यांनी आपसात तब्बल 25 कोटी रूपयांचे कामे वाटून घेतली आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे तक्रार केली होती. खडसेंनी गुरूवारी प्रा. डॉ. पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील सर्वपक्षाचे सदस्य एकत्र आले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या तब्बल 25 कोटी रूपयांचे कामांचे वाटप या सदस्यांनी आपसात केले आहे. अन्य सदस्यांच्या गटामध्ये किरकोळ कामे देण्यात आली आहेत. काही सदस्यांनी 1 कोटी रूपयांची कामे घेतली तर काही सदस्यांना केवळ 2…
Author: saimat team
भुसावळ : प्रतिनिधी । पत्रकार अन्यायाविरूध्द वाचा फोडतो व त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, म्हणुनच लेखणीत प्रचंड ताकद आहे, तलवारीने जे घडले नाही असा इतिहास लेखणीने घडवला आहे. म्हणून पत्रकारांनी लेखणीचा वापर जपून करावा. आजही जनतेचा इलेक्ट्रॉनिक माध्यमापेक्षा वृत्तपत्राच्या बातमीवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक वृत्तांकन करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.संजय सावकारे यांनी केले. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पं.स. सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री आ.सावकारे पुढे म्हणाले की, समाज जागृतीसाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. अधिक जागरूक राहून जबाबदारीपूर्वक कार्य करा, चांगली पिढी व सक्षम समाज घडविण्यासाठी पत्रकारांचाही…
जामनेर, प्रतिनिधी । भारतीय भटके विमुक्त आदिवासी व ओबीसी संघर्ष महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुकाध्यक्ष तुकाराम सखाराम काळे (गोपाळ) यांच्या हस्ते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी ठिकाणी जामनेर तालुका उपाध्यक्ष उस्मान शेख,सांडू तडवी,शहराध्यक्ष अमोल लोहार ,उपशहराध्यक्ष ज्ञानेश्वर ताटे,शहर सचिव अतुल महाजन,गोविंद लोहार,पत्रकार गणेश पांढरे,कडू नवघरे,प्रविण ठाकरे,उपस्थित राहून सर्व पदाधिकारी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती साजरी केली व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच यादिवशी पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या वतीने देण्यात आल्या.
जळगाव । वाघनगरजवळील जिजाऊनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली आहे. चोरट्यांना घरात काहीही मुद्देमाल आढळून न आल्याने खाली हात परतावे लागले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाऊनगरात सतीश नाना बाविस्कर (वय-३५, रा. जिजाऊनगर) हे पत्नी अनिता व दोन मुलांसह वास्तव्याला असून ते एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. ६ जानेवारी रोजी सतिष बाविस्कर यांची रात्रपाळीसाठी कामावर होते. त्यामुळे त्यांची पत्नी अनिता ह्या मुलगा अक्षय आणि मुलगी प्रज्ञा यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या मागणीला यश” आरोग्य विभागाने घेतली तात्काळ दखल – आज श्री. स्वामी समर्थ विद्यालय कुंसुंबा येथे १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना लसीकरणला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमोद गंगाधर घुगे ( ग्रा. प. सदस्य ), प्रा. भाऊसाहेब सोनवणे, डॉ.संजय चव्हाण ( आरोग्य अधिकारी, जळगांव तालुका ), डाँ. इरेश पाटील, डॉ. चेतन अग्निहोत्री, डाँ विकास जोशी, डाँ जयश्री सोनार, डाँ सुष्मा महाजन, मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा. हेमंत सोनार, प्रा. सुनील ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेवुन १५ ते १८ वयोगटातील मुलां, मुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
मुंबई, वृत्तसंस्था । अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि ‘अनाथांची माय’ या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने चिंता वाढली आहे. ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचं आवाहन ममता यांनी केलं आहे. हडपसर येथील मांजरी परिसरात असलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेत माईंचं पार्थिव आणण्यात आल होतं. या ठिकाणी अंत्यदर्शन…
जळगाव | शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टिईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहचले आहे. या प्रकरणी ळीसगाव येथील एका शिक्षकांसह दोन जणांना अटक करण्यात आली. मागील महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए.कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार, आशुतोष शर्मा, निशिद गायकवाड आदींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सन २०१९ च्या परीक्षेतील आहे. या अगोदरही सन २०१८ मध्येही गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. या संदर्भात पुणे सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने नाशिक आणि चाळीसगाव येथून अनुक्रमे सुरंजित गुलाब पाटील (रा.तपोवन, नाशिक) आणि स्वप्निल तीरसिंग पाटील (रा.चाळीसगाव) यांना…
फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर शहरातील बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५) रा. विवरे ता. रावेर ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर ता. यावल हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास…
जळगाव प्रतिनिधी । ३१ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल छगन सपकाळे (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल छगन सपकाळे हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहन चालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. अमोल हा गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.…