अमृतसर, वृत्तसंस्था । देशात गेल्या दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढत आहे. ओमिक्रॉनचा अनेकांना संसर्ग होत आहे. आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर उतरले होते. याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिलीय. अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. करोना संसर्ग झालेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने घेऊन ते ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पंजाबमध्ये…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आयुक्तांच्या चौकशीसाठी अमोल कोल्हे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागात भ्रष्टाचार , अनागोंदी कारभार सुरू असुन अजेंट सक्रिय आहे व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू आहे असा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केलेला आहे . तसेच त्यांनी या भ्रष्टाचार व त्रासाविषयी आवाज उचलण्याचे जळगावकर जनतेला जाहीर आवाहन देखील केलेले आहे . वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेले अभियंता व कर्मचारी यांच्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते म्हणुनच यासंदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी देखील वर्षभरापूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी महानगरपालिका…
मुंबई, वृत्तसंस्था । राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी करोनाचा शिरकाव झाला आहे. ‘शिवतीर्थ’वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. मुंबईतील लोकल ट्रेन इतक्यात बंद होणार नाही, पण नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊनचा प्रस्ताव विचाराधीन: टोपे मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. २००८…
मुंबई, वृत्तसंस्था । ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ग्रामीण भागाशी निगडित ही कामे वेगाने मार्गी लावता येत असल्याची भावना यावेळी श्री. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दुरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थिती लावून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
गुजरात, वृत्तसंस्था । गुजरात गॅस गळतीविमुळे विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान २५ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळ असलेल्या नाल्यात एका अज्ञात टँकरचा चालक विषारी केमिकल टाकत होता. यावेळी विषारी वायूची गळती होऊ लागली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर…
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ५ जानेवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २३८ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिव्यांगांच्या तपासणीच्या कामकाजाची पाहणी केली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. ज्या दिव्यांग बांधवानी ५ जानेवारीचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तसेच ज्यांना परिवहन सेवेच्या (एसटी बस वगैरे) अडचणींमुळे मागील बुधवारी येता आले नाही अशा ३८ दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या काळात म्युकरमायकोसिस आजाराने देखील ‘एन्ट्री’ मारली होती. एका रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थिती मधून बाहेर पडून व सहा महिन्यानंतर आज पूर्णपणे बरा झाला. कृतज्ञता म्हणून रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बुधवार दि. ५ जानेवारी रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी “रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे अविरत सहकार्य लाभले, म्हणून आज मी बरा झालो व माझ्या कुटुंबाला दिलासा मिळाला” अशी भावुक प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली. घनश्याम उखा कोळी (वय ६५, रा. तऱ्हाडी ता. अमळनेर) असे या रुग्णाचे नाव आहे. जून महिन्यात त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली. आजाराचे निदान झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
मुंबई, – राज्यभरात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतंय. त्यातच दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच आता कोरोनावर उपचार देणाऱ्या डॉक्टरांनाही संसर्ग होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुंबईतील सरकारी रूग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील सर जे.जे रूग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोलुंके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जे.जे रूग्णालयातील 62 निवासी डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढली आहे. कोरोना बाधित डॉक्टरांमध्ये जेजे रुग्णालयातील 62, लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये 50, केईएममध्ये 40 आणि नायर रुग्णालयामधील 40 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे डॉक्टरांना कोरोना झाल्याचं…