जळगाव, प्रतिनिधी । युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने युवासेना जळगाव महानगर व मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने मूळजी जेठा महाविद्यालय येथे दि 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 दरम्यान 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. महापौर सौ. जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय भारंबे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले व युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीप…
Author: saimat team
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या महाविद्यालय परिषद बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी ताशेरे ओढत विभाग प्रमुखांना फैलावर घेतले. तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुखांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. यापुढे कामात ढिसाळपणा झाल्यास तसेच रुग्णसेवेत हलगर्जीपणा आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल असा इशारा अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिला आहे. तसेच अकार्यक्षम ठरलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांची हकालपट्टी करीत व उप अधिष्ठात्यांची नेमणूक अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी दि. ४ जानेवारी रोजी महाविद्यालय परिषदेत घोषीत केली आहेत. रुग्णालयाच्या कारभारात सुसूत्रता यावी, रुग्णांना उपचार घेतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी डॉ. जयप्रकाश रामानंद प्रयत्नशील आहेत. त्यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा पत्रकार संघात पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी धूम धडाक्यात साजरा होतो. परंतु गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे या कार्यक्रमावर बंधने आली आहेत. पत्रकारितेतले महानुभव यांना प्रमुख वक्ते म्हणुन वैचारिक मेजवानी जिल्ह्यातील सारे पत्रकारांना दिली जाते. या वर्षी पत्रकार दिन मर्यादित स्वरूपात शासनाने जी नियमावली जाहीर केली आहे त्या अनुषंगाने (कोरोना 3 री लाट) मर्यादित स्वरुपात 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी सकाळी 10. 30 वा. जळगाव जिल्हा पत्रकार संघात प्रत्येकाने मास्क लावून, ठराविक अंतर ठेवुन कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने देखील असाच शासनाने दिलेल्या नियमावलीत असाच कार्यक्रम साजरा करावा. निर्बंध उठल्यावर जिल्हा पत्रकार संघा तर्फे…
जळगाव, प्रतिनिधी । दारिद्र्याला कंटाळून कुटुंब प्रमुखांसह चौघांनी विष प्राशन केल्याची घटना भुसावळ येथे मागील महिन्यात घडली होती. या घटनेत तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दुर्देवाने कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. या खंत व गंभीर इतर दोघांना वाचवायचे या जिद्दीसह वैद्यकीय पथकाने उपचार सुरू ठेवले. अन् कुटुंबप्रमुखाच्या पत्नीसह मुलीला तसेच मुलालादेखील मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणले. ही कौतुकास्पद कामगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने केली आहे. भुसावळ येथील वांजोळा रोड परिसरात राहणा-या एका परिवाराने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये परिवारातील मुलगा हा उपचारानंतर बरा…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बु येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील आणि ग्रा.प. सदस्य सुधाकर लक्ष्मण महाजन, यांनी शेंदुर्णी येथे मा.जि प, सदस्य संजय गरुड व मा. जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला, यावेळी गावातील दिलीप नथू पाटील, प्रदीप प्रल्हाद पाटील, पुरुषोत्तम महाजन, आमीन जब्बार तडवी, सुभान सांडू तडवी, जब्बार गफुर तडवी, रहीम मोहिद्दिन तडवी,सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तसेच जि.प.गट संघटक,पहुर-वाकोद शिवसेना राहुल माणिक पाटील हे उपस्थित होते
जळगाव : विशेष प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे काल स्वतः रस्त्यावर उतरले व त्यांनी शहरातील सर्व सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 9 अवैध धंद्यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या.त्यात सट्टा-जुगाराचे साहित्य व लाखो रुपये जप्त करण्यात आले व अनेक जुगारी कारभाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने येथील तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्या कार्याची आठवण झाली.मुंडे साहेब रस्त्यावर उतरले व त्यांनी आपल्याच पोलीस दलातील अधिकाऱ्यांना उघडे पाडले आहे.त्यांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत असतांनाच आता “त्या“ सहा पोलिस निरीक्षकांचे काय ?,अर्थात त्यांच्यावर काय कारवाई होणार ?हा प्रश्न शहरात चर्चेत आला आहे व लोकांना त्याची उत्कंठा लागून राहिली आहे. पोलीस…
जळगाव, दिव्यांग बांधवांसाठी घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधा पत्रिकेत नाव असल्यास संबंधीत संपूर्ण कुटूंबाला 35 किलो धान्य वाटप करण्यात यावे. असा अध्यादेश महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून वर्षभरापूर्वी काढण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही होत नसल्यामुळे दिव्यांग सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी आजपासून उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात दिव्यांग सेनेने जागतिक अंपग दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून यासंदर्भात शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना 35 किलो धान्य मिळण्याबाबतच्या सुचना देण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीबद्दल न्याय न मिळाल्यामुळे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग सेनेने उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात संघटनेचे पदाधिकारी भरत…
यावल , प्रतिनिधी । यावल तालुक्यातून वाहन क्रमांक नसलेल्या तसेच अदृश्य पद्धतीने नंबर प्लेट असलेल्या डंपर वाहनांच्या माध्यमातून अवैध वाळू तसेच गौण खनिज अनधिकृतपणे वाहतूक सर्रासपणे सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी यावल तालुका भिम आर्मी तर्फे फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. भिम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे,जिल्हा संघटक हेमराज तायडे,तसेच सदस्य सचिन पारधे,बबलू गजरे, निखील जोगी,जितू तायडे,रोहित तायडे यांनी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यात भुसावळ-यावल, चोपडा-यावल,भुसावळ-फैजपुर महामार्गावरून तसेच इतर रस्त्यांवरून अवैध वाळू व इतर गौण खनिजाची सर्रासपणे अनधिकृतपणे सुसाट वेगाने…
मुंबई : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला…
पहुर.ता.जामनेर, प्रतिनिधी । येथील जैन स्थानक येथे प पु.महासतीजी मंजुश्री जी आदीठाणा ४यांच्या सानिध्यात७दीक्षार्थींचा अभिनंदन समारंभ मोठ्या उत्साहात आज दि.४रोजी सकाळी संपन्न झाला. पहुर येथील बसस्थानक परिसरातून या दीक्षार्थींची सजविलेल्या वाहनातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व प्रथम वरघोडा कार्यक्रम झाला. यावेळी पपु.महासतीजी मंजुश्री जी यांचे व्याख्यान झाले. विरल निलेश सुराणा(औरंगाबाद),पारसबाई नेमिचंद मोदी(मालेगाव),खुशबू विजय बंब व कोमल विजय बंब(धुळे),मानसी महावीर लुकंड(देवळा),श्वेता विनोद चोरडिया(येवला),अंशिता विनोद बेदमुथा(मांडळ)या दीक्षार्थींचा यावेळी सत्कार तसेच अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी आमदार मनिष जैन व नितिका जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदिप लोढा, पंकज लोढा, प्रितेष लोढा,पवन रुणवाल, बबलु कोचेटा, भैय्या छाजेड, योगेश बेदमुथा, पारस गादीया, आंदीसह संपूर्ण…