जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराची मध्यंतरीच्या काळात अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मात्र, तरीही आता भरीव निधीच्या माध्यमातून जळगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे. त्यामुळे आता जळगाव शहर बदलायला सुरूवात झाली असून, त्याचाच भाग म्हणून आज शनिवार, दि.8 जानेवारी 2022 रोजी पिंप्राळ्यातील विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व झालेल्या कामांचे लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. यापुढील काळातही आपण जळगावच्या विकासासाठी सदैव वचनबद्ध राहू, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरोत्थान तसेच दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निधीतून उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळ्यातील प्रभाग क्र.10 मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व झालेल्या कामांच्या…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जळगाव महानगरची कार्यकारिणी मान्यतेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविली होती. त्याला प्रदेश कार्यालयाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यात आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, आठ चिटणीसांचा समावेश आहे. जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे यांची विधानसभा क्षेत्र प्रमुख निवड करण्यात आली आहे तर राहुल टोके कार्यालय मंत्री व राजू बाविस्कर सह कार्यालयमंत्री असतील. कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे, किरण राजपूत, अनिल पवार, आबा चौधरी, अकिल पटेल, भगवान सोनवणे, ॲड. रेखा कोचुरे, दुर्गेश पाटील यांचा समावेश आहे तर संघटन प्रमुख राजू मोरे, सरचिटणीसपदी सुनिल माळी यांच्यासह रहिम तडवी, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख तसेच…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेत विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीचे सदस्यांमध्ये असमान वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात माजीमंत्री एकनाथराव खडसे व जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मंत्रालयातून चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत. चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषदेमध्ये पहिल्या फळीतील सर्वपक्षीय सदस्यांनी लॉबिग करून 25 कोटी रूपयांच्या निधीची कामे आपसात वाटून घेतल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी केली आहे. त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला शुक्रवारी चौकशीचे पत्र देण्यात…
जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतील सफाई कामगारांच्या ५२३ रिक्त पदांसंदर्भात राज्य शासनाने २०१५ मध्ये महापालिकेचा ठराव व आस्थापना खर्चात होणाऱ्या वाढीसंदर्भात अहवाल मागवला होता परंतु पालिकेच्या आयुक्तांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सात वर्षात माहिती रकळवली नाही. मागासवर्गीय समाजावर हा एक प्रकारचा अन्याय असून पालिकेने रिक्त पदे न भरल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा नगरसेवक चेतन सनकत यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. महापालिकेतील सफाई कामगारांची ५२३ पदे व्यपगत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. महापालिकेकडून सध्या मक्तेदारामार्फत साफसफाई करून घेतली जात आहे. त्यासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. हाच खर्च महापालिका सफाई कामगारांची भरती करून का करत नाही असा सवाल…
जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. महापौर तथा माध्यमिक शिक्षिका जयश्री सुनिल महाजन यांना विशेष आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महापालिकेत महापौर दालनात साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनिल दाभाडे, कुमूद प्रकाशनच्या प्रकाशिका संगीता माळी व मेहरुणच्या जय दुर्गा प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक महेश बच्छाव, सुनिल महाजन, आदर्श शिक्षक सागर झांबरे, महेश तायडे, महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललित धांडे उपस्थित होते.
मुंबई : प्रतिनिधी | राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात 1 लाख 41हजार 492 कोरोना आणि 441 ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्ण आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे.त्यामुळे राज्य सरकार कोरोनाबाबतचे निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. आजच नवीन नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबईबद्दल सांगायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे…
जळगाव – मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, एन्डोक्रोनॉलॉजी तज्ञांच्या सहकार्याने पिच्युटरी ग्रंथीतील ट्यूमवर यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्रौढावस्थेतील रुग्णाला अनेक दिवसांपासून डोके दुखण्याची समस्या होती. अचानक त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी बंद झाली, पापणीही पडल्याने नातेवाईक घाबरले, औरंगाबादपर्यंत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यानंतर जळगाव येथील न्यूरोजसर्जन डॉ.स्वप्नील पाटील यांना रुग्णासह नातेवाईक भेटले, रुग्णाची समस्या लक्षात घेवून एमआरआयचा रिपोर्ट पाहिला असता रुग्णाला मेंदूच्या पायथ्याशी ट्यूमर आणि सभोवताली रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. याप्रसंगी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, एन्डोक्रोनॉलॉजी डॉ. चिमु चोपडे यांच्याशी न्यूरोलॉजिस्ट डॉ.स्वप्नील पाटील यांनी चर्चा…
जळगाव, प्रतिनिधी । राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील म्हसावद येथे शेतकी संघातर्फे शासकीय भरडधान्य योजनेचा प्रारंभ करतांना बोलत होते.याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले. तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा प्रारंभ पालकमंत्र्यांनी केला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून पहिल्यांदा माल आणलेल्या शेतकऱ्यांचा…
जळगाव । एमआयडीसी परिसरात २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकातरुणाविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. घरातील काही सदस्य कंपनीत जावून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास तरूणी आपल्या आईसोबत किरणा माल घेण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी सुभाष आकुलकर (पुर्ण नाव माहित नाही) हा तरूणीजवळ येवून मागील भांडणाचे कारणावरून तरूणीचा हात पकडला. तिला शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल. शिवाय तरूणीच्या आईला देखील मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. तसचे तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तरूणीने याप्रकरणी एमआयडीसी…
जळगाव ः प्रतिनिधी देशात कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणे शहरांमधून सुरु झाली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यशासनाने काही मार्गदर्शक तत्वे जारी करत निर्बंधाबाबतच्या सुचना प्रशासनाला केल्या असल्यावरही तालुक्यातील नशिराबाद येथे 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक तत्वांना तिलाजली देत गरज नसलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने उपस्थित राहण्याच्या सुचना करीत प्रशासनाच्या कोरोनासंदर्भात निर्बंधाचा फज्जा उडवित कोरोनालाच आमंत्रण दिल्याचे चित्र पहावयाला मिळाले. याप्रकरणी जि.प. मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. देशासह राज्यात डेल्डा व ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. सदरचे लक्षणे हे तिसऱ्या लाटेचे असल्याचे तज्ञांना वाटत असल्यामुळे या कोरोना लाटाचा…