जळगाव । तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारामधील वाघुर नदीतून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्व नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघूर नदीपात्रात काही ट्रॅक्टर चालक हे विनापरवाना वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार नशिराबाद पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघुर नदी पात्रात धडक कारवाई करत एक विनानंबरचे ट्रॅक्टर पकडले. ट्रक्टर नशिराबाद पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश तुकाराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक जनार्दन तंटू कोळी (वय 58 रा. कोळीवाडा गोंबी, ता. भुसावळ जि. जळगाव) याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत…
Author: saimat team
चाळीसगाव | आपण डॉक्टर असल्याचे भासवून सोने व्यावसायिकाला ५० हजारांत गंडवून अज्ञात भामटा पसार झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रथगल्लीमधील मयुर प्रकाशचंद जैन (वय-३३) हे सोन्याचे व्यापारी असून त्यांची दुकान रथगल्ली येथे आहे. त्यांना ७ जानेवारी रोजी सकाळी ११:४० वाजताच्या सुमारास मयुर प्रकाशचंद जैन यांना ७७४४०४५८०४ या क्रमांकावरून फोन आला. तेव्हा मी शिवशक्ती दवाखान्यातून असिस्टंट डॉ. एस.के.जैन बोलत आहे. माझ्या घरी कार्यक्रम असल्याने मला एक तोळा सोन्याची चैन लागत आहे. त्यामुळे सोने घेऊन आपण शिवशक्ती दवाखान्यात आल्यावर पैसे देतो, असे सांगून त्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यावर मयुर यांनी दुकानातील कारागीर मंगेश याला सोन्याची चैन घेऊन…
जळगाव । अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरातील एकाची ४० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लांबविल्याची घटना ४ जानेवारी रोजी उघडकीस आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उमेश प्रभाकर मराठे (वय-३२) रा. कांचन नगर प्रशांत चौक जवळ हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ बीके ८२६२) ने जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे हनुमान मंदिराजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. त्याचे खासगी काम आटोपल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्यामुळे त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.…
नाशिक, वृत्तसंस्था । गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असतांनाही जिल्ह्यातील विकास थांबला नाही थांबणार ही नाही. तालुका हा विकासाचा केंद्र बिंदू मानून सर्वांना समसमान निधीचे सुत्र समोर ठेवून वर्ष 2022-23 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रु. 414.73 कोटी, आदिवासी उपयोजनेतंर्गत रु. 293.13 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रु. 100.00 कोटी अशी तिनही योजनांसाठी एकुण रु. 807.86 कोटी इतकी आर्थिक मर्यादा शासनाने कळविलेली आहे. वर्ष 2022-23 चा आराखडा तयार करतांना गाभाक्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र, इतर क्षेत्र बाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला असून त्यात 25 टक्के वाढ करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,…
मुंबई, प्रतिनिधी । ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिल्या. कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असूनही दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन मुंबई महानगर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. या क्षेत्रात रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने…
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव आयोजित छात्र गर्जना विद्यार्थी संमेलन कार्यक्रमात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची कार्यकारणी घोषणा करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप जळगाव जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्रमुख अतिथी बालकवी शाळेचे शिक्षक महेश आहेरराव सर, कार्यक्रमासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविपचे जळगाव जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर शहरमंत्री आर्यन सैंदाणे उपस्थित होते. अभाविप जिल्हा प्रमुख यांनी अभाविप मांडणी करत कार्यकर्त्यांना परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो, म्हणून आपण सर्वांना मिळालेली जबाबदारीला योग्य न्याय द्यावा व राष्ट्र कार्यात सामील व्हावे असेही त्यांनी सांगितले. महेश…
भुसावळ | खरेदी खतात खोटे दस्तऐवज सादर करून शेतजमीन भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वळती करण्याच्या प्रकरणी पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्थानकात राजेश गंगाधर जोशी (रा.मॉडर्न रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मंगेश दीपचंद लढ्ढा (रा.बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (रा.गंगाराम प्लॉट,भुसावळ), ब्रजेश राधेश्याम लाहोटी (रा. गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मीता राजेश काकाणे (रा.वरणगाव) या पाचही संशयितांनी रजिस्टर खरेदी खतात लिहून देणार हा शब्द करून लिहून घेणार असा असा बनलून घेत योगेश गंगाधर जोशी यांच्या नावाची स्वाक्षरी नसलेला २ जुलै २०१३ या रोजीचा खोटा व बनावट…
नाशिक, वृत्तसंस्था । ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती…
चाळीसगाव, प्रतिनिधी । पत्रकारीता करताना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. डिजिटल मिडियामुळे आज पत्रकारितेच्या व्याख्या बदलल्या असल्या तरी पत्रकारांच्या ज्या समस्या पूर्वी होत्या त्याच आज देखील कायम आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन मिळावे तसेच ज्येष्ठ पत्रकारांनी केलेल्या सूचना व त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नवीन म्हाडा योजनेत अल्पदरात प्राधान्याने घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी घोषणा आ. मंगेश चव्हाण यांनी केली. ते शिवनेरी फाउंडेशनतर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यात बोलत होते. चाळीसगाव…
उत्तर प्रदेश, वृत्तसंस्था । गेल्या दोन महिन्यांपासून ज्या निवडणुकांची देशभर चर्चा सुरू होती, त्यासाठी अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचं पालन करूनच या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली गेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज त्यासंदर्भातला कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. ६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३…