Author: saimat team

चोपडा – मकर संक्रांति पर्वात सर्वत्र पतंगबाजीचे आकर्षण व पतंग उडविण्याचा मोह लहानथोर सर्वांनाच भुरळ घालतो. या कालावधीमध्ये आकाशात मनमोहक , रंगीत व आकर्षक पतंग उडविण्याची जणू स्पर्धाच अनेकात लागली असते. यासाठी पतंग प्रेमी मंडळी एकमेकांच्या पतंग काटण्यासाठी चीनी मांजा अथवा नायलॉन मांजाचा सर्रास वापर करताना दिसून येतात. या मांजाला काचेची भुकटी लावून धारदार बनवले असते. या मांजामुळे आकाशात उडणारे मुक्या पक्ष्यांचे पंख , पाय , मान कापली जाते. पक्षी मृत्युमुखी पडतात. बऱ्याचदा मांजा झाडांवर अडकून राहतो. तेथे येणारे पक्षी फासात अडकून लोंबकळतात. पतंग उडवल्यानंतर फेकून दिलेला मांजा भटके गुरढोर , कुत्रे यांच्या पोटात खाण्यातून जाऊन त्रास होतो. पतंग काटल्यानंतर…

Read More

जामनेर- प्रतिनिधी     तालुक्यातील नेरी बु!! येथील रहिवाशी आरोपी विजय अनिल रोकडे यास चाकू हल्ला प्रकरणी येथील न्यायाधीश डी. एन. चांभले यांनी एक वर्ष सक्त मजुरी व पांच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्हा बाबत सविस्तर वृत्त असे की, दी.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी नऊ वाजे च्या सुमारास आरोपी विजय अनिल रोकडे याने दारूच्या नसेत फिर्यादी प्रशांत राजू आपार यास नेरी येथील आठवडे बाजारात शिवीगाळ करून धारधार सुरीने त्याच्या पार्श्वभागावर मारून गंभीर दुखापत करून फिर्यादी व त्याचे आई वडीलांसह इतर साक्षीदारांना सुध्दा जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणून या बाबत आरोपी विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन मध्ये…

Read More

पुणे : राजकरणात एकमेकांचे विरोधक असलेले भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांचा घरोबा नुकताच पाहायला मिळाला. कितीही मतभेद असले तरी तेही राजकारणापुरतेच मर्यादित आहेत. याचीच प्रचिती भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यालयात उपस्थितीत लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकतीच याबाबत फेसबुकपेजच्या माध्यमातून माहिती दिली. जगताप पोस्टमध्ये म्हणाले की, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमचे स्वागत केले. दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी मनभेद मात्र नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि शहर विकासासाठी सलोखा ही पुण्याची राजकीय संस्कृतीच आहे. आज या संस्कृतीचे पुन्हा एकद दर्शन झाले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना तिळगुळाचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृहात करण्यात आलं होतं. सदर स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन प्रतिष्ठानाने केले होते. सुमारे ४५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह शशांक दंडे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पेंटिंग ची आवड लावून शिकवणारे श्री. तरुण भाटे, भारत विकास परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या क्षेत्रीय सचिव…

Read More

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ,समस्या सोडवून दुःखी पिडा दूर करून मानवी कल्याण साधण्याचे अवाहन दिंडोरी येथील कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र कृष्णाजी नगर अडावद येथे ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण आणि जागतिक कृषी महोत्सव आढावा प्रसंगी ते बोलत होते. अडावद येथील कृष्णाजी नगरातील श्री स्वामी सेवाकेंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कृषीरत्न आबासाहेब मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.गोपुजन करून आढावा बैठकीस प्रारंभ झाला.यावेळी मार्गदर्शन करतांना आबासाहेब मोरे म्हणाले की,सर्वानी शेती समजून घ्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विषमुक्त अन्न कसे तयार करता येईल यासाठी अन्नावर संस्कार असने…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ऑगस्टमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण बघायला मिळाली आहे. सोने चांदी खरेदीसाठी ही उत्तम वेळ असू शकते. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किंमती गुरुवारी ७० रुपयांनी वाढून ४६,५०० रुपयांवर पोहोचल्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमत सुधारली गेली आहे अशी प्रतिक्रिया आहे. यापूर्वीच्या ट्रेडमध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४६,१६० रुपये किंमतीवर बंद झाले होते.गुड रिटर्न्स या संकेतस्थळाच्या मते, चांदी ९०० रुपयांनी वाढून ६३,६०० रुपये प्रति किलोवर विकली जात होती.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि शुल्क आकारणीमुळे संपूर्ण भारतामध्ये सोन्याचे दागिने, धातूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक यामुळे किंमतीमध्ये बदल दिसून येतो. काय आहे आजचा सोन्याचा भाव? गुड रिटर्नस या वेबसाईट…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथे अजिंठा विश्रामगृहात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली . या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी सर्वानुमते युवराज सुरवाडे यांची निवड करण्यात आली . महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी त्यांचे स्वागत केले . या निवडिबद्दल दिलीप सपकाळे , हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , भारत सोनवणे आदिंनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे .

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागलाच नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । तापी नदीतुन बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांची कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीतून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्राली जप्त करत आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे असलेल्या तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस…

Read More