Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी I येथील डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज दुपारी 4 वाजता अभिनेता- दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान, महाविद्यालय परिसरातील विविध दालनांचे उद्घाटन सकाळी करण्यात आले. जळगावात प्रथमच मोठ्या प्रमाणात फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलसाठी खान्देश व मराठवाड्यातून लघुपट, डाक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, ॲनिमेशन फिल्म या चार प्रकारांत चित्रपट मागवले होते.त्यात महाराष्ट्रातून आलेल्या निवडक 50 लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण होत आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणास स्व.स्मिता पाटील चित्रपट नगरी, मुख्य दालनास दादासाहेब फाळके दालन, स्व. निळू…
वर्धा : वृत्तसंस्था I जिल्ह्यातील आर्वी गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज पुन्हा कदम रुग्णालय परिसरात एक कवटी आढळली आहे. त्यामुळे आर्वी येथील गर्भपात प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. आतापर्यंत एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे आढळल्या आहेत. नागपूर आणि वर्धाच्या फॉरेन्सिक टीमने तपासणी केली होती. काय आहे हे प्रकरण? वर्ध्यामधील आर्वी येथे एका 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. कदम हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. 30 हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. पोलिसांच्या…
मुंबई : प्रतिनिधी I राज्यांना कोरोना लसीचा योग्य पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. 10 दिवस पुरेल इतका साठा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन लसींचा दहा दिवस पुरेल एवढा साठा आहे, असे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. 24 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे तसेच राज्य सरकारचा लस तुटवड्याचा दावा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्र राज्याला 90 लाख लसीच्या डोसची गरज आहे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत 90 लाख लसी डोसची मागणी केली होती. जर पुरवठा झाला नाही…
तिरुवनंतपूरम : वृत्तसंस्था I केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाहीय असे मत व्यक्त केलेय. न्यायालयाने हे वक्तव्य एर्नाकुलम येथील प्रसिद्ध लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलकडून मोठ्या प्रमाणात पार्कींग शुल्क घेतले जात असल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल बोलताना केलेय. या प्रकरणामधील पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने कलामास्सेरी नगरपालिकेकडूनही यासंदर्भातील माहिती मागवली आहे. लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला पार्किंगसाठी पैसे आकारण्याचा काही परवाना देण्यात आलाय का हे महापालिकेने सांगावं, असं न्यायालयाने म्हटलंय. इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पार्किंग असेल या अटीवरच बांधकामास परवानगी दिली जात असल्याने पार्किंगसाठी पैसे आकारणे चुकीचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केलेय.
स्पेन : वृत्तसंस्था I जगात अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र युरोपातील देशांमध्ये मास्क आणि लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतेच स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल. आणि आता या प्रक्रियेला सुरू झालीये. तज्ञांच्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जातोय. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्राडो सांचेझ यांनी साथीच्या काळात लादलेले…
मुंबई, प्रतिनिधी । मुलगी सुंदर असेल तर अनेकांच्या नजरा तिच्यावर भाळतात. असंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतही झालं आहे. या अभिनेत्रीने एक दोन नाही तर चक्क 100 पेक्षा जास्त मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘देवों के देव महादेव` फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया आहे. दिसायला प्रचंड सुंदर. डोळ्यांचे अप्रतिम तेज… अशा मुलीच्या प्रेमात कोणीही पडेल. मालिकेत कायम साध्या आणि सभ्य भूमिकेत असलेली सोनारिका खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 29 वर्षीय सोनारिकाने आतापर्यंत 137 हून अधिक मुलांचे प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला होता की,…
नंदुरबार । येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे (वय 32) हा ट्रांसफार्मर बसण्याच्या ठिकाणी हजर असताना त्या तरुणास जाधव नामक वायरमनने 11 kv च्या एग्रीकल्चर लाईन फिडरच्या वरती झंपर जोडण्यासाठी खांबावरती चढण्यास विनंती केली. जाधव वायरमन यांनी सांगितले मी महावितरणच्या सबस्टेशनच्या ऑपरेटर कर्मचारी यांना फोन करून लाईट बंद करायला लावलेली आहे. तू बिनधास्त चढ काय घाबरू नको असं म्हणत पंकज याला मुख्य थ्री फेज खांबावरती चढण्यास भाग पाडले. पंकज खांबा वरती चढला व जसा त्याने विद्युत वाहक तारांना स्पर्श करतात तो तारांना चिटकला त्यात त्याचे पूर्ण शरीर काळपट झाले व त्याच ठिकाणी पंकज या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये 632.736 अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे 1.466 अब्ज डॉलर्सचे कमी होऊन 633.614 अब्ज डॉलर्सवर आले होते तर 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये 58.7 कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन 635.08 अब्ज…
पंजाब, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यात पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांची आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत सात भाजपा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पार्टीसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. पंजाबही याला अपवाद नाही. पंजाबमध्ये अनेक नेते पक्ष बदलत आहेत. त्यातच आता आणखी एका नेत्याने तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. जोगींदर मान असं या नेत्याचं नाव आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या एका दिवसानंतर शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा…